AI जिबली आर्टचा इंटरनेटवर धुमाकूळ! जाणून घ्या त्यामागची कहाणी आणि फ्रीमध्ये फोटो कसे बनवायचे?

Sourabh Patil

ghibli ai

ghibli ai “MS धोनी” ची CSK असो किंवा “विराट” ची RCB असो किंवा “हेराफेरी” मधील बाबू भैया, राजू आणि श्याम – सध्या त्यांच्या एआय-जनरेटेड फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. इंटरनेटवर फिरताना तुम्हीही हे फोटो पाहिले असतील, कदाचित स्वतःही असे फोटो बनवले असतील! या ट्रेंडमधील एक शब्द तुम्ही वारंवार ऐकला असेल – जिबली आर्ट.

सध्या हे “जिबली आर्ट” फिचर इंटरनेटवर चांगलेच चर्चेत आले आहे, कारण ChatGPT ने हे लेटेस्ट AI इमेज जनरेशन फिचर लाँच केले आहे. मात्र, हे फिचर ChatGPT च्या प्रीमियम युजर्ससाठी मर्यादित आहे. तुम्ही जर प्रीमियम युजर नसाल, तरीही निराश होण्याची गरज नाही! या आर्ट फिचरचा उपयोग विनामूल्य कसा करता येईल, त्यामागची कहाणी काय आहे, आणि जिबली आर्टवरून वाद का होत आहेत, हे आपण या लेखात पाहूया.

जिबली आर्ट म्हणजे नेमके काय?

“जिबली” हा शब्द लिबियन अरबी शब्दावरून आलेला असून याचा अर्थ “उष्ण वाळवंट” असा होतो. मात्र, स्टुडिओ जिबली हा जपानी ॲनिमेशन स्टुडिओ देखील आहे, ज्याने तयार केलेल्या खास शैलीतील आर्टवर्कला “जिबली आर्ट” असे म्हणतात.

या स्टुडिओची स्थापना मियाझाकी हयाओ, इसाओ ताकाहाता आणि सुझुकी तोशियो यांनी 1985 मध्ये केली होती. स्टुडिओ जिबलीचा फोकस नेहमीच हाय-क्वालिटी हँड-ड्रॉन ॲनिमेशन आणि जबरदस्त स्टोरीटेलिंगवर राहिला आहे. त्यांच्या स्पिरिटेड अवे, नेबर टोटोरो, हाऊल्स मूव्हिंग कॅसल, प्रिन्सेस मोनोनोके, केकीज डिलिव्हरी सर्व्हिस यासारख्या अॅनिमेटेड चित्रपटांनी जागतिक कीर्ती मिळवली आहे.

ChatGPT च्या Ghibli आर्ट फिचरने कसा बदल घडवला?

सध्या OpenAI च्या ChatGPT ने AI इमेज जनरेशन फिचर लाँच केले आहे, ज्यामध्ये युजर्स आपल्या फोटोंना स्टुडिओ जिबलीच्या खास स्टाईलमध्ये कन्व्हर्ट करू शकतात. मात्र, हे फिचर फक्त ChatGPT प्रीमियम (GPT-4) युजर्ससाठी उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला महिन्याला जवळपास ₹1800 ($20) चा खर्च करावा लागतो.

जर तुम्ही ChatGPT च्या प्रीमियम वर्जनचा वापर करत असाल, तर जिबली आर्ट फोटो तयार करण्याची प्रक्रिया सोपी आहे:

  1. ChatGPT स्टुडिओ उघडा (फोन किंवा डेस्कटॉपवर).
  2. प्लस (+) चिन्हावर क्लिक करा आणि “Photos” ऑप्शन निवडा.
  3. तुमचा फोटो अपलोड करा.
  4. खालीलप्रमाणे काही प्रॉम्प्ट टाका:
    • Make it into an anime frame.
    • Can you turn this into a Ghibli-style photo?
    • Show me in Studio Ghibli Studio style.
    • How would Ghibli AI sketch my features?
  5. काही सेकंदांत तुमचा फोटो जिबली स्टाईलमध्ये कन्व्हर्ट होईल!

ChatGPT शिवाय फ्रीमध्ये जिबली आर्ट फोटो कसा तयार करायचा?

तुमच्याकडे ChatGPT ghibli studio चे प्रीमियम सबस्क्रिप्शन नसेल, तरीही निराश होऊ नका. काही फ्री किंवा कमी खर्चिक AI टूल्स वापरून तुम्ही सहजपणे जिबली आर्ट फोटो बनवू शकता:

1. ग्रॉक AI (Grok AI)फ्री पर्याय!

Elon Musk यांच्या xAI कंपनीने विकसित केलेले ग्रॉक AI हे चॅटबॉट ChatGPT सारखेच आहे आणि यामध्येही AI इमेज जनरेशन फिचर आहे. तुम्ही तेच प्रॉम्प्ट वापरून फ्री मध्ये जिबली आर्ट फोटो तयार करू शकता!

2. मिडजर्नी (MidJourney) – कमी किंमतीत जिबली आर्ट

मिडजर्नी हे AI-आधारित इमेज जनरेशन टूल आहे, जे ChatGPT पेक्षा स्वस्त आहे.

  • यासाठी तुम्हाला ₹600-₹800 महिना खर्च येऊ शकतो.
  • जिबली आर्टसाठी “Ghibli inspired, Hayao Miyazaki style” असे कीवर्ड वापरा.
  • Discord वरून हे टूल वापरता येते.

3. लिओनार्डो AI (Leonardo AI) – फ्री क्रेडिट्ससह उत्तम पर्याय!

हे टूल वापरण्यासाठी कोणतीही सबस्क्रिप्शन घेण्याची गरज नाही.

  • फ्री अकाउंट केल्यावर तुम्हाला Free Credits मिळतात, ज्यामुळे तुम्ही जिबली आर्ट फोटो तयार करू शकता.
  • हे टूल AI आर्टसाठी प्रसिद्ध आहे आणि सुपर-डिटेल्ड जिबली स्टाईल इमेजेस बनवते.

जिबली स्टुडिओने AI ghibli art वर (ghibli art) नाराजी का व्यक्त केली?

जिबली स्टुडिओचे को-फाउंडर मियाझाकी हयाओ यांनी काही वर्षांपूर्वी AI-जनरेटेड आर्टबद्दल कडवट प्रतिक्रिया दिली होती. एका मुलाखतीत त्यांनी AI आधारित अॅनिमेशनला “Insult to Life” (जीवनाचा अपमान) असे म्हटले होते.

त्यांच्या म्हणण्यानुसार:

  • जिबली आर्ट ही मेहनतीने आणि विचारपूर्वक बनवली जाते, पण AI केवळ काही सेकंदांत इमेज बनवते.
  • यात कलाकारांचा सर्जनशीलतेचा अनादर होतो.
  • AI मधील आर्टवर्कला मानवी भावना आणि विचारांची खोली नसते.

सध्या स्टुडिओ जिबलीने अधिकृतपणे AI-जनरेटेड जिबली आर्टवर कोणतेही विधान दिलेले नाही, पण भविष्यात यावर वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तुमच्या मते AI जिबली आर्ट योग्य की कलाकारांचा अनादर?

AI-जनरेटेड ghibli ai जिबली आर्टने लोकांना एक नवीन आनंद दिला आहे. मात्र, या तंत्रज्ञानावर कलाकार आणि स्टुडिओ मालक दोघांचे वेगवेगळे मत आहेत. काहींना हे सर्जनशीलतेला चालना देणारे तंत्रज्ञान वाटते, तर काही कलाकारांना हा त्यांच्या कलेचा अपमान वाटतो.

तुमच्या मते AI जिबली आर्ट योग्य आहे की चुकीचे? तुम्हाला हे AI-जनरेटेड फोटो आवडतात का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये जरूर कळवा!

Leave a Comment