IPL 2025 चा उर्वरित हंगाम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर आता क्रिकेटच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. BCCI लवकरच इंडियन प्रीमियर लीग 2025 चं नवीन सुधारित वेळापत्रक जाहीर करणार आहे.
BCCI सध्या भारत सरकारकडून अंतिम मंजुरीची वाट पाहत असून त्यानंतर उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. हंगामातील एकूण १७ सामने उर्वरित आहेत आणि चेन्नई सुपर किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद वगळता इतर सर्व संघ अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आहेत.
IPL 2025 गुणतालिका (मे ९ पर्यंत):
- गुजरात टायटन्स – १६ गुण (नेट रन रेटमुळे अव्वल स्थान)
- रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – १६ गुण
- पंजाब किंग्ज – १५ गुण
- मुंबई इंडियन्स – १४ गुण
IPL पुन्हा कधी सुरू होणार?
PTI वृत्तसंस्थेनुसार, IPL पुन्हा १६ किंवा १७ मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व फ्रँचायझींना मंगळवारपर्यंत (१३ मे) त्यांच्या खेळाडूंना परत बोलावण्यास सांगण्यात आलं आहे.
IPL Final चे ठिकाण बदलणार?
PTI च्या माहितीनुसार, अंतिम सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर नियोजित होता. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचा धोका असल्याने अंतिम सामना अहमदाबादमध्ये हलवला जाऊ शकतो. सध्या तरी प्लेऑफच्या सामने कुठे होणार, यामध्ये कोणताही बदल नाही.
Live Updates: IPL 2025 Resume च्या नव्या वेळापत्रकासंबंधी सर्व अपडेट्स आणि अधिकृत घोषणा लवकरच जाहीर होणार आहेत. आमच्या वेबसाइटवर या बातमीचे Live अपडेट्स नियमितपणे पाहायला मिळतील.