IndiGo crew इंडिगो क्रू सदस्यावर बाळाचे सोन्याचे गंठन चोरी केल्याचा आरोप, बंगळुरू विमानात (Bengaluru Airport) घडलेली घटना, एफआयआर दाखल, बंगळुरू विमानात घडलेली घटना, एफआयआर दाखल
थक्क करणाऱ्या घटनेत, थिरुवनंतपूरम ते बंगळुरू जाणाऱ्या इंडिगो फ्लाइटमधील (Indigo Flight) एका क्रू सदस्यावर पाच वर्षांच्या मुलाचे सोन्याचे गंठन चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाच्या आईने, प्रियंका मुखर्जी यांनी, विमानतळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चोरीच्या या तक्रारीनंतर केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (KIA) पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून तपास सुरू आहे.
IndiGo crew फ्लाइट 6E 661 मध्ये घडला प्रकार
या प्रकरणावर इंडिगो एअरलाइन्सने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, “थिरुवनंतपूरमहून बंगळुरूला जाणाऱ्या फ्लाइट 6E 661 मध्ये आमच्या कर्मचाऱ्याशी संबंधित घटनेबाबत आम्हाला माहिती आहे. आमच्या ग्राहकाने या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आम्ही अशा घटनांना अत्यंत गांभीर्याने घेतो आणि संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत,” असे इंडिगोने TOI ला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.