वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी धक्कादायक बातमी! ताहिरा कश्यपला पुन्हा ब्रेस्ट कॅन्सर, म्हणाल्या – “राउंड 2, पण मी तयार आहे”

Sourabh Patil

Tahira Kashyap

Tahira Kashyap फिल्ममेकर आणि अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप हिला पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झाला असल्याची माहिती तिने स्वतः दिली आहे. २०१८ मध्ये पहिल्यांदा ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाल्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया (mastectomy) देखील करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा कॅन्सरने तिला ग्रासले आहे, परंतु ती निराश न होता पुन्हा लढण्यास सज्ज आहे.

‘राउंड २ फॉर मी… आय स्टिल गॉट धिस’

वर्ल्ड हेल्थ डेच्या दिवशी (World Health Day) ताहिराने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. तिने लिहिले –

Seven-year itch or the power of regular screening – it’s a perspective. I’d like to go with the latter and suggest the same for everyone who needs to get regular mammograms. Round 2 for me… I still got this.

तिने कॅप्शनमध्ये लिहिले –

When life gives you lemons, make lemonade. When life becomes too generous and throws them again at you, you squeeze them calmly into your favourite kala khatta drink and sip it with all the good intentions…

Tahira Kashyap
Image Source: Tahira Kashyap Instagram

आयुष्मान खुरानाने व्यक्त केली भावना

Ayushmann Khurrana Wife Health Update ताहिराच्या या लढ्याबद्दल आयुष्मान खुरानाने आधीच तिच्या धैर्याचं कौतुक केलं आहे. तिने पहिल्यांदा जेव्हा कॅन्सरबद्दल सांगितलं, तेव्हा आयुष्मानने रुग्णालयात लपून रडल्याचंही तो एका मुलाखतीत म्हणाला होता. पण ताहिराचं धैर्य आणि प्रेरणादायी प्रवास त्याच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिलं आहे.

गुनीत मोंगा, ट्विंकल खन्ना आणि ताहिराचा मेहुणा अपारशक्ती खुराणा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पोस्टवर कमेंट केली आणि ताहिरा लवकर बरे होण्याची इच्छा व्यक्त केली.

२०१८ मध्ये स्टेज ४ कॅन्सरचे निदान झालेल्या आणि २०२१ मध्ये कॅन्सरमुक्त घोषित झालेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कमेंट केली, “शब्द नाहीत बाळा! फक्त प्रेमाची शक्ती आणि प्रार्थना पाठवत आहे.”

Leave a Comment