या मुस्लिम देशानं केला भारताचा व्हिसा बॅन! कारण वाचून बसेल धक्का

Sourabh Patil

Hajj 2025

Hajj 2025 Annual Hajj pilgrimage: भारत, पाकिस्तानसह 14 देशांवर सौदी अरेबियातून (Saudi Arabia) व्हिसा निर्बंधांची शक्यता वर्तवली जात आहे.

हज यात्रा 2025 जवळ येत असताना, सौदी अरेबिया भारत, पाकिस्तान, बांगलादेशसह 14 देशांवरील उमरा आणि प्रवासी व्हिसांवर तात्पुरते निर्बंध Visa Ban लावण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. 2024 मध्ये झालेल्या गर्दी आणि उष्णतेमुळे घडलेल्या दुर्घटनांनंतर, हज यात्रेचे व्यवस्थापन अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

व्हिसा निर्बंध का लावले जाणार?

सौदी अरेबियाच्या हज आणि उमरा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध राजकीय नव्हे तर केवळ व्यवस्थापकीय (लॉजिस्टिक) कारणांमुळे लागू केले जात आहेत. बऱ्याच वेळा काही लोक उमरा किंवा टुरिस्ट व्हिसावर देशात येऊन अनधिकृतरित्या हज यात्रा करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, अधिकृत कोटा पद्धतीला फाटा दिला जातो आणि व्यवस्थापनावर ताण येतो.

व्हिसा बंदीची तारीख आणि कालावधी

ARY न्यूजसह इतर अहवालांनुसार, 13 एप्रिल 2025 ही उमरा व्हिसा जारी करण्याची अंतिम तारीख ठरवण्यात आली आहे. त्यानंतर 4 ते 9 जून 2025 दरम्यान होणाऱ्या हज यात्रेनंतरच नव्या व्हिसा मंजूर होतील, अशी शक्यता आहे. यात्रेपूर्वी यात्रेकरू एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच येण्यास सुरुवात करतात, यामुळे व्हिसा निर्बंध लवकरच लागू होण्याची शक्यता आहे.

Hajj 2025 कोणते देश प्रभावित होणार?

ही तात्पुरती व्हिसा बंदी खालिल 14 देशांवर लागू होऊ शकते:

दक्षिण आशिया: भारत(India), पाकिस्तान, बांगलादेश
मध्य पूर्व: इजिप्त, इराक, जॉर्डन, येमेन
उत्तर आफ्रिका: अल्जीरिया, मोरोक्को, ट्युनिशिया
सहारा खालचा आफ्रिका: इथिओपिया, नायजेरिया, सुदान
आशिया: इंडोनेशिया

2024 मध्ये काय घडलं होतं?

2024 च्या हज यात्रेदरम्यान, अत्यंत उष्णता आणि गर्दीमुळे 1200 हून अधिक यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याचे अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे यावर्षी हज व्यवस्थापनात सुधारणा करणे अत्यावश्यक झाले आहे.

Leave a Comment