IPL 2025: आयपीएल 2025 सुरू होऊन केवळ दोन आठवडे झाले असताना, मैदानावर खेळाच्या शिस्तीचा भंग होताना दिसत आहे. आतापर्यंत 19 सामने झाले असून, त्यापैकी पाच प्रमुख खेळाडूंवर नियमभंगासाठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामधील एक खेळाडू दोन वेळा दोषी ठरला असून त्याच्या खात्यात 3 डिमेरिट पॉइंट्स जमा झाले आहेत.
आता स्पर्धेची तीव्रता वाढताना दिसत असली तरी, अशा प्रकारच्या घटनांमुळे आयपीएल प्रशासनही अॅक्शन मोडमध्ये आले आहे. उर्वरित 54 सामन्यांसाठी खेळाडूंना आणि संघांना नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक बनले आहे.
IPL 2025 कोणत्या खेळाडूंवर झाली कारवाई?
1. हार्दिक पांड्या (मुंबई इंडियन्स):
30 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) ₹12 लाख दंड ठोठावण्यात आला.
2. रियान पराग (राजस्थान रॉयल्स):
संजू सॅमसनच्या अनुपस्थितीत कर्णधारपद सांभाळणाऱ्या रियान पराग (Riyan Parag) याला चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे ₹12 लाख दंड ठोठावण्यात आला.
3. ऋषभ पंत (लखनौ सुपर जायंट्स):
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हर्स वेळेत पूर्ण न केल्यामुळे ऋषभ पंत (Rishabh Pant) याच्यावरही ₹12 लाख दंड लावण्यात आला.
4. इशांत शर्मा (गुजरात टायटन्स):
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आक्षेपार्ह वर्तन केल्यामुळे इशांत शर्मावर २५% मॅच फीचा दंड आणि १ डिमेरिट पॉइंट देण्यात आला.
5. दिग्वेष राठी (लखनौ सुपर जायंट्स):
‘नोटबुक सेलिब्रेशन‘ केल्यामुळे दिग्वेष राठी याला दोन वेळा दंड ठोठावण्यात आला.
– पंजाब किंग्जविरुद्ध 25% मॅच फी आणि 1 डिमेरिट पॉइंट
– मुंबई इंडियन्सविरुद्ध 100% मॅच फी आणि 2 डिमेरिट पॉइंट्स
पुढील सामने अधिक शिस्तबद्ध होणार का?
आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. त्यामुळे खेळाडूंच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जाते. सध्या नियमभंग झाल्यास तात्काळ कारवाई केली जात आहे. उर्वरित सामन्यांमध्ये खेळाडूंनी अधिक शिस्तबद्ध वर्तन करण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात निलंबनाची कारवाई देखील केली जाऊ शकते.
आता पाहावे लागेल की पुढील सामन्यांमध्ये खेळाडू नियमांचे पालन करतात का, की आणखी कारवाई पाहायला मिळते!