LPG सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ; सर्वसामान्य आणि उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींनाही झळ

Sourabh Patil

Updated on:

LPG price hiked

LPG price hiked देशात घरगुती स्वयंपाक गॅसच्या किंमतीत ५० रुपयांची मोठी वाढ जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली. ही दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांसह उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही लागू होणार आहे.

PM उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींसाठी: दिल्लीमध्ये 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत ₹503 वरून ₹553 झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी: दिल्लीसाठी एलपीजी सिलेंडरची किंमत ₹803 वरून ₹853 करण्यात आली आहे.

राज्यानुसार स्थानिक करांच्या आधारे हे दर वेगवेगळे असतील. ही दरवाढ 8 एप्रिल 2025 पासून प्रभावी होणार आहे.

मागील वेळेस कधी झाले होते बदल?

मार्च 2024 मध्ये एलपीजी दरात 100 रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता पहिल्यांदाच दरवाढ झाली आहे.

व्यापारी गॅस सिलेंडरच्या दरात कपात

गेल्या आठवड्यात सरकारने व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत 41 रुपयांची कपात केली होती. या निर्णयाचा हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यापारी संस्थांना फायदा झाला होता.

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढ

सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साइज ड्युटीमध्येही वाढ केली आहे:पेट्रोलवर उत्पादन शुल्क: ₹13 प्रति लिटर तसेच डिझेलवर उत्पादन शुल्क: ₹10 प्रति लिटर वाढवलं आहे

LPG Price Today तरीही या वाढीचा परिणाम थेट ग्राहकांवर होणार नाही, कारण ही वाढ अंतरराष्ट्रीय दर घसरल्यामुळे कमी झालेले किरकोळ दर समायोजित करून भरून काढली जाईल.

LPG price hiked सरकारच स्पष्टीकरण

हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) यांनी सांगितले की, “सध्याची दरवाढ ही दर दोन ते तीन आठवड्यांनी आढावा घेतल्या जाते, आणि ही वाढ तेल कंपन्यांना झालेल्या ₹43,000 कोटींच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी करण्यात आली आहे.”

दर वाढले असले तरी, सरकारने ग्राहकांवर भार न टाकता, आर्थिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Comment