Dr Shirish Valsangkar सोलापूर शहर आणि वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली, जेव्हा शहरातील प्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. Solapur doctor suicide news या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Dr Shirish Valsangkar यांनी राहत्या घरी गोळी झाडून स्वतःला संपवलं
ही दुर्दैवी घटना शुक्रवार, रात्री साडेआठच्या सुमारास घडली. डॉ. वळसंगकर Solapur neurosurgeon यांनी आपल्या सोलापूर येथील राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांच्या कुटुंबीयांनी धाव घेतली असता, त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यानंतर त्यांना तात्काळ वळसंगकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलीस तपास सुरू, आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
neurosurgeon suicide case घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या आत्महत्येमागील नेमके कारण काय, याचा तपास सुरू करण्यात आला आहे. रुग्णालय परिसरात नातेवाईक, सहकारी डॉक्टर्स आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. इतक्या यशस्वी वैद्यकीय कारकिर्दीनंतर त्यांनी असा टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे.
वैद्यकीय शिक्षण आणि यशस्वी प्रवास
डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील आघाडीचे न्युरोसर्जन म्हणून ओळखले जात होते. त्यांनी आपले शालेय शिक्षण डीबीएफ दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथे पूर्ण केले. त्यानंतर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून वैद्यकीय शिक्षण घेतले.
तसेच त्यांनी शिवाजी विद्यापीठातून MBBS व MD, तर Royal College of Physicians, London येथून MRCP ही पदवी प्राप्त केली होती. मराठी, इंग्रजी, कन्नड आणि हिंदी या चार भाषांवर प्रभुत्व असलेल्या वळसंगकर यांचा वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव दांडगा होता.
प्रशिक्षण व कारकीर्द
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर येथे इंटर्नशिप केल्यानंतर कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात बरेच वर्ष सेवा दिली. डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेज, सोलापूर येथे पदव्युत्तर प्रशिक्षण घेतले. नॅशनल न्युरोलॉजी बोर्ड, नवी दिल्ली यांची मान्यता प्राप्त झाली होती. त्यांनी बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे वरिष्ठ रजिस्ट्रार (न्युरोलॉजी विभाग) म्हणून देखील काम पहिले.
डॉ. वळसंगकर यांच्या अचानक जाण्याने सोलापूर शहरात आणि वैद्यकीय वर्तुळात मोठा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या योगदानाची आठवण कायम राहील.