8वीत शिकणाऱ्या वैभव सूर्यवंशीने गाजवला IPL; गुगल CEO सुंदर पिचाईही झाले प्रभावित!

Sourabh Patil

Vaibhav Suryavanshi

Vaibhav Suryavanshi राजस्थान रॉयल्सकडून पदार्पण करणाऱ्या १४ वर्षाच्या वैभव सूर्यवंशीने आपल्या तडाखेबाज खेळीने संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. IPL च्या १८ वर्षांच्या इतिहासातील तो सर्वात लहान वयाचा खेळाडू ठरला आहे. त्याच्या या शानदार कामगिरीचं कौतुक गुगलचे CEO सुंदर पिचाई (Google CEO Sundar Pichai) यांनी देखील सोशल मीडियावरून केलं आहे.

“८वीत शिकणाऱ्या खेळाडूला IPL खेळताना पाहिलं” – सुंदर पिचाई

शनिवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यात वैभव सूर्यवंशीने विस्फोटक खेळी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. सुंदर पिचाई यांनी X (Twitter) वर लिहिलं Sundar Pichai Twit on Vaibhav Suryavanshi –
“Woke up to watch an 8th grader play in the IPL. What a debut!”

IPL 2025 पहिल्याच चेंडूवर षटकार, २० चेंडूत ३४ धावा

राजस्थान रॉयल्सच्या कर्णधार संजू सॅमसनच्या दुखापतीमुळे वैभव सूर्यवंशीला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संधी मिळाली. मैदानात उतरताच त्याने शार्दूल ठाकूरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून धमाका केला.

त्याने २० चेंडूत ३४ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि ३ षटकार होते. अखेर तो आदेन मार्करमच्या गोलंदाजीवर स्टंप झाला. या सामन्यात त्याने यशस्वी जैस्वालसह ८५ धावांची सलामी भागीदारी केली.

RR vs LSG राजस्थानचा पराभव, पण वैभवने जिंकली मनं

राजस्थान रॉयल्सला १८१ धावांचं लक्ष्य होतं, परंतु संघ अवेश खानच्या उत्कृष्ट शेवटच्या षटकामुळे अवघ्या २ धावांनी पराभूत झाला. मात्र वैभव सूर्यवंशीच्या खेळीने संघाच्या हारवरही चांगली छाप सोडली.

१३ व्या वर्षी IPL काढला लिलाव, बिहारचा सुपुत्र ठरला चमकता तारा

बिहारचा रहिवासी असलेल्या वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपये देऊन IPL 2025 च्या मेगा लिलावात खरेदी केलं होतं, तेव्हाही तो फक्त १३ वर्षांचा होता.

त्याचं टॅलेंट याआधीही चर्चेत आलं होतं, जेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-१९ कसोटीत ५८ चेंडूंमध्ये शतक ठोकलं होतं.

Vaibhav Suryavanshi
Photo Credit: iplt20.com/BCCI | Vaibhav Suryavanshi blessed by LSG owner Sanjiv Goenka

IPL मध्ये षटकार आणि चौकार मारणारा सर्वात लहान खेळाडू

या खेळीसह तो IPL इतिहासात चौकार आणि षटकार मारणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. राजस्थानचा पराभव जरी झाला असला, तरी वैभवची कामगिरी संघासाठी आश्वासक ठरली आहे.

संजू सॅमसन पुनः संघात परतल्यावरही वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, असं संकेत संघ व्यवस्थापनाने दिले आहेत.

Leave a Comment