पाहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; “अमित शहा अपशकुनी, त्यांनी राजीनामा द्यावा”

Sourabh Patil

Sanjay Raut

Sanjay Raut जम्मू-काश्मीरमधील पाहलगाम (Pahalgam attack) येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि विशेषतः गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. हल्ल्याला केंद्र सरकार जबाबदार धरत, राऊत यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

“हल्ल्याची जबाबदारी संपूर्ण केंद्र सरकारची”

राऊत म्हणाले, “पुलवामा हल्ल्यानंतरचा हा काश्मीरमधील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. पुलवामाच्या घटनेचा राजकीय फायदा घेतला गेला, मात्र त्या घटनेमागचं सत्य आजवर उघड झालेलं नाही. आता पुन्हा एकदा, केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये इतका मोठा हल्ला होतो, म्हणजे केंद्रानेच जबाबदारी घ्यावी लागेल.”

Sanjay Raut “पर्यटकांचा जीव धोक्यात, गृहमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी हजारो फोर्स”

राऊत यांनी हल्ल्यावेळी सुरक्षा यंत्रणांतील त्रुटींवरही प्रश्न उपस्थित केले. “पर्यटन हंगाम सुरू असताना हजारोंच्या संख्येने पर्यटक उपस्थित असताना तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता. पण अमित शहा श्रीनगरला उतरले तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी ५०० पोलीस, ७५ गाड्या, बॉम्ब शोधक पथक होते. मग सामान्य जनतेचं रक्षण कोण करणार?” असा सवाल त्यांनी केला.

सैन्य भरती थांबली, निधी ‘लाडकी बहिण’सारख्या योजनांकडे वळवला!

राऊतांनी सरकारच्या संरक्षण धोरणांवरही टीका केली. “सैन्यात सध्या दोन लाख पदं रिक्त आहेत, आणि सरकार सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतंय. संरक्षण खर्चात कपात करून तो निधी केवळ प्रचारकी योजनेत खर्च केला जातोय,” असं ते म्हणाले. “नोटबंदी केली, म्हणाले दहशतवाद संपेल – पण तो तर वाढलाय! संसदेत खोटी माहिती दिली जातेय,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“अमित शहा फेल होम मिनिस्टर, ते अपशकुनी आहेत” – संजय राऊत

संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत निशाणा साधत म्हटलं,

अमित शहा हे फेल गृहमंत्री आहेत. देशभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. ते अपशकुनी आहेत. हे लोक २४ तास सरकारे पाडण्यात व्यस्त असतात, मग जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? ५६ इंचाची छाती कुठे गेली?”

“२७ मृत्यूसाठी जबाबदार कोण?”

हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांसह २७ जणांचा मृत्यू झाला. “एका नवविवाहितेच्या डोळ्यांसमोर तिच्या पतीची हत्या झाली. याला जबाबदार कोण? अमित शहा पाहलगामला गेले म्हणजे त्यावर मेहेरबानी केली का?” असा थेट सवालही राऊत यांनी उपस्थित केला.

हा हल्ला केवळ सुरक्षेतील त्रुटी नव्हे, तर केंद्र सरकारच्या अपयशाचं मूळ प्रदर्शन आहे, असा सूर संजय राऊतांनी आपल्या टीकेतून व्यक्त केला.

Sanjay Raut attacks the central government over the Pahalgam attack

Leave a Comment