Paris Olympic 2024 ऍथलेटिक्स
पुरुष भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा यासह 29-सदस्यांचे मजबूत भारतीय ऍथलेटिक्स तुकडी Paris Olympic 2024 मध्ये 16 मेडल्स साठी स्पर्धांमध्ये भाग घेत आहेत. Paris Olympic 2024 मधील ॲथलेटिक्स इव्हेंट्स 1 ऑगस्ट म्हणजे आज पासून सुरू होत आहेत आणि 11 ऑगस्ट रोजी संपतील. 48 वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये मेडल्स दिली जाणार आहेत.
Paris Olympic 2024 मधील सर्व track आणि फील्ड इव्हेंट्स आयकॉनिक ‘Stade de France’ येथे आयोजित केले जातील तर रेस वॉक इव्हेंट्स ‘Pont d’Iena’ येथे स्पर्धा होतील. दरम्यान, दोन मॅरेथॉन शर्यती, ‘Les Invalides’ येथे संपण्यापूर्वी ‘Hôtel de Ville’ येथून सुरू होतील.
Table of Contents
Neeraj Chopra Golden Boy
टोकियो Olympic 2020 मध्ये Neeraj Chopra ने भालाफेक (javelin throw) इव्हेंट मध्ये भारताला ॲथलेटिक्समधील पहिले ऑलिम्पिक Gold मेडल पटकाऊन दिले होते आणि इतिहास रचला होता, तो सोनेरी क्षण कोणताच भारतीय विसरू शकणार नाही. तीन वर्षांपूर्वी जपानमध्ये सुरू झालेल positive momentum कायम ठेवण्यासाठी फ्रान्समध्ये त्याला योग्य फॉलो-अप घेण आवश्यक ठरणार आहे.
Neeraj Chopra समोर आपले गतविजेतेपद राखून ठेवण्याचे आव्हान असेल आणि आपल्या सर्वांना विश्वास आहे की तो नक्कीच चांगली कामगिरी बजावेल, आणि पुन्हा एकदा भारताचे नाव गौरवाणे मोठ करेल. टोकियो येथे जिंकल्यापासून, भारतीय भालाफेक Neeraj Chopra ने 2022 मध्ये डायमंड लीगचे विजेतेपद आणि 2023 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुद्धा सुवर्णपदक जिंकले आहे.
Hangzhou Asian Games 2023 मध्ये नीरजच्या मागे रौप्यपदक मिळवणारा किशोर जेना, पॅरिसमधील पुरुष भालाफेक स्पर्धेत दुसरा भारतीय खेळाडू असेल तर अन्नू राणीची नजर हांगझोऊमध्ये सुवर्ण पदक पटकावल्यानंतर महिलांच्या भालाफेकमध्ये पोडियम फिनिशवर असेल.
पॅरिस 2024 मध्ये 29 सदस्यीय भारतीय ऍथलेटिक्स तुकडीमध्ये पुरुष आणि महिला रिले स्पर्धांसाठी 11 धावपटूंचा समावेश आहे.
स्टीपलचेसर अविनाश साबळे यांच्यासह नीरज आणि अन्नू, shot put इवेंट मधील national record holder तजिंदरपाल सिंग तूर, रेस वॉकर प्रियंका गोस्वामी आणि रिले धावपटू मोहम्मद अनस, अमोज जेकब आणि सुभा वेंकटेशन हे भारताच्या टोकियो 2020 च्या तुकडीतून Paris Olympic 2024 मध्ये परतणारे सदस्य आहेत.
महंमद अनस, हा पुरुषांच्या 4x400m रिले संघाचा सदस्य आहे. पदार्पण करणाऱ्यांमध्ये hurdler इवेंट साठी ज्योती याराजी आणि स्टीपलचेसर पारुल चौधरी यांच्यावर लक्ष असेल.
ज्योतीने आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक आणि गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. दरम्यान, पारुलने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत सुवर्ण आणि 5000 मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले.
Paris Olympic 2024 च्या भारतीय तुकडीत 18 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे. भारतीय पुरुष तुकडीसाठी 8 इवेंट’स् असतील आणि महिला देखील अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. रेस वॉक मॅरेथॉन इव्हेंट ही एक एकमेव मिश्र सांघिक स्पर्धा असेल.
Paris Olympic 2024: भारतीय ऍथलेटिक्स संघ
पुरुष संघ:
- अविनाश साबळे (3000 मी स्टीपलचेस)
- नीरज चोप्रा (भालाफेक)
- किशोर जेना (भालाफेक)
- तजिंदरपाल सिंग तूर (शॉट पुट)
- प्रवीण चित्रवेल (triple jump)
- अब्दुल्ला अबूबकर (triple jump)
- सर्वेश कुशारे (high jump)
- अक्षदीप सिंग (२० किमी रेस वॉक)
- विकास सिंग (20 किमी रेस वॉक)
- परमजीत सिंग बिश्त (20 किमी रेस वॉक)
- मोहम्मद अनस (4x400m रिले)
- मोहम्मद अजमल (4x400m रिले)
- अमोज जेकब (४x४०० मीटर रिले)
- संतोष कुमार तमिलरासन (४x४०० मीटर रिले)
- राजेश रमेश (४x४०० मीटर रिले)
- मिजो चाको कुरियन (4x400m रिले)
- सूरज पनवार (रेस वॉक मिश्र मॅरेथॉन)
- जेस्विन आल्ड्रिन (लांब उडी)
महिला संघ:
- किरण पहल (४०० मी.)
- पारुल चौधरी (3000 मी स्टीपलचेस आणि 5,000 मी)
- ज्योती याराजी (100 मीटर hurdle)
- अन्नू राणी (भालाफेक)
- ज्योतिका श्री दांडी (4x400m रिले)
- सुभा व्यंकटेशन (4x400m रिले)
- विथ्या रामराज (४x४०० मीटर रिले)
- MR पूवम्मा (4x400m रिले)
- प्राची (4x400m रिले)
- प्रियांका गोस्वामी (20 किमी रेस वॉक आणि रेस वॉक मिश्र मॅरेथॉन)
- अंकिता ध्यानी (५००० मी.)
Paris Olympic 2024 भारताचे वेळापत्रक:
नीरज चोप्राचे Best थ्रो:
Neeraj Chopra ने 2020 मध्ये Tokyo मध्ये झालेल्या ऑलिंपिक्स गेम्स मध्ये 87.58मी इतका नोंदवला आहे. पण तो त्याच्या वैयक्तिक बेस्ट थ्रो पेक्षा 2.36मी ने कमी आहे. कदाचित नीरज चोप्राच्या आतापर्यंतच्या छोट्या पण घटनात्मक कारकिर्दीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्याने टोकियो 2020 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.
फायनलमध्ये 87.58 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह, नीरज चोप्रा, त्याच्या विसाव्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात, ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट बनला आणि नेमबाज अभिनव बिंद्रानंतर वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरला.
टोकियो 2020 च्या पुरुष भालाफेक फायनलमध्ये जपान नॅशनल स्टेडियमवर नीरज चोप्राचा 87.03 मीटरचा दुसरा-सर्वोत्कृष्ट थ्रो देखील अव्वल पोडियम फिनिशसाठी पुरेसा होता. Czech Republic’s च्या Jakub Vadlejch ने 86.67 मीटर फेक करून रौप्यपदक जिंकले.
30 जून 2022 रोजी स्वीडनमधील स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राची सर्वोत्तम थ्रो 89.94 मीटर आहे. हा एक नॅशनल रेकॉर्ड आहे आणि नीरज चोप्राचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रम आहे.
याआधीचे तीन राष्ट्रीय विक्रम – पावो नुर्मी गेम्स 2022 मध्ये 89.30 मी, पटियाला येथील 2021 इंडियन ग्रां प्री 3 मध्ये 88.07 मी आणि जकार्ता येथे 2018 आशियाई गेम्समध्ये 88.06 मी – हे देखील नीरज चोप्राचे होते.
Top 10 नीरज चोप्राचे Best थ्रो:
Sr.No. | थ्रो (मी.) | स्पर्धा | तारीख |
1. | 89.94m | Stockholm Diamond League 2022 | 30 जून 2022 |
2. | 89.30m | Paavo Nurmi Games (Turku, Finland) | 14 जून 2022 |
3. | 89.08m | Lausanne Diamond League 2022 | 26 ऑगस्ट 2022 |
4. | 88.88m | Asian Games 2023 (Hangzhou) | 4 ऑक्टोबर 2023 |
5. | 88.77m | World Athletics Championships 2023 (Budapest) – Q | 25 ऑगस्ट 2023 |
6. | 88.67m | Doha Diamond League 2023 (Qatar) | 5 मे 2023 |
7. | 88.44m | Zurich Diamond League Final 2022 | 8 सेप्टेंबर 2022 |
8. | 88.39m | World Athletics Championships 2022 (Oregon) – Q | 21 जुलै 2022 |
9. | 88.36m | Doha Diamond League 2024 | 10 मे 2024 |
10. | 88.17m | World Athletics Championships 2023 (Budapest) – F | 27 ऑगस्ट 2023 |