Pahalgam terror atack जम्मू-कश्मीरच्या पहलगाम (Pahalgam) येथे मंगळवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रकरणी नवी आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या हल्ल्यात आतापर्यंत २६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आता तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ ते १० दहशतवाद्यांना स्थानिक २-३ लोकांची मदत मिळाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक भाषेत संवाद आणि पोलिस वेशात रेकीचा संशय
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी ५ ते ७ जण हे पाकिस्तानातील दहशतवादी असल्याचा संशय आहे. या दहशतवाद्यांनी स्थानिक भाषेत संवाद साधून कोणालाही संशय येऊ दिला नाही. विशेष म्हणजे, काही स्थानिकांनी पोलिस वेश धारण करून रेकी (टेहळणी) केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
ही टोळी पर्यटकांवर गोळीबार करण्याआधी त्यांची नावे व धर्म विचारत होती, अशी माहितीही समोर आली आहे. हल्ल्यात अंदाजे ५० हून अधिक गोळ्या झाडण्यात आल्या, ज्यामुळे बऱ्याच जणांचा जागीच मृत्यू झाला.
केंद्र सरकारची तत्काळ प्रतिक्रिया, गृहमंत्री अमित शाह श्रीनगरमध्ये
या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) मंगळवारी रात्रीच श्रीनगरला दाखल झाले. त्यांनी नायब राज्यपाल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आज (बुधवारी) ते थेट Jammu Kashmir पहलगाम दौऱ्यावर जाणार आहेत.
The Resistance Front (TRF) या पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
Pahalgam terror atack पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण, दौरे रद्द
मार्च महिन्यातील बर्फवृष्टीनंतर काश्मीरमध्ये पर्यटनाने चांगलीच गती घेतली होती. अनेक देशी-विदेशी पर्यटकांनी पहलगाम, गुलमर्ग आणि सोनमर्ग या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, या हल्ल्यामुळे कश्मीर खोऱ्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे. अनेक पर्यटकांनी आपले दौरे अर्धवट सोडून माघारी परतण्यास सुरुवात केली आहे.
लष्कर आणि पोलिसांची शोधमोहीम सुरू
हल्ल्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू-कश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून शोधमोहीम तीव्र केली आहे. स्थानिक पातळीवर मदतीचा संशय लक्षात घेता, केंद्र सरकार लवकरच कठोर निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.