Deloitte Internship 2025 Deloitte India ने 2025 साठी ‘Digital Excellence Centre (DEC)’ मध्ये इंटर्नशिप कार्यक्रम सुरू केला असून, संगणक विज्ञान किंवा तत्सम शाखेतील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या इंटर्नशिपअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹30,000 स्टायपेंड दिले जाईल.
Deloitte Internship चे स्वरूप – QA Engineer Intern
या इंटर्नशिपमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना QA Engineer Intern म्हणून काम करण्याची संधी मिळेल. त्यांच्या मुख्य जबाबदाऱ्या खालीलप्रमाणे असतील:
- स्वयंचलित चाचणी स्क्रिप्ट लिहिणे
- टेस्ट केसेस डिझाइन करणे व अंमलात आणणे
- सॉफ्टवेअरमधील दोष ओळखून नोंदवणे
- UX व विकास टीमसोबत सहकार्य करणे
- सुरक्षित आणि स्केलेबल सिस्टिम आर्किटेक्चर प्रशिक्षण
पात्रता निकष
इंटर्नशिपसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांनी खालील पात्रता निकष पूर्ण केलेले असावेत:
- मॅन्युअल आणि ऑटोमेटेड टेस्टिंगचे चांगले ज्ञान
- JIRA सारख्या bug-tracking टूल्सची माहिती
- SDLC (Software Development Life Cycle) ची समज
- समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता, टीमवर्क आणि शिकण्याची तयारी
इंटर्नशिपचे फायदे
- दरमहा ₹30,000 स्टायपेंड
- उद्योगातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
- Deloitte University चे ऑनलाइन लर्निंग रिसोर्सेस
- प्रोफेशनल्स आणि क्लायंट्सशी नेटवर्किंगची संधी
- यशस्वी सहभागासाठी सर्टिफिकेट ऑफ कम्प्लिशन
- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना फुल-टाइम नोकरीची संधी
इंटर्नशिप कालावधी आणि कामाचे स्वरूप
- कालावधी: 2 ते 6 महिने (प्रोजेक्टनुसार बदल)
- कामाची पद्धत: हायब्रीड किंवा ऑन-साइट (लोकेशननुसार)
- योग्य उमेदवार: अंतिम वर्षाचे विद्यार्थी व नुकतेच पदवीधर झालेले
Deloitte Internship 2025 साठी अर्ज कसा कराल?
स्टेप 1: आपले रिझ्युमे अपडेट करा – तांत्रिक कौशल्ये, प्रोजेक्ट्स आणि शैक्षणिक यश नोंदवा
स्टेप 2: आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा – मार्कशीट्स, ओळखपत्रे, सर्टिफिकेट्स
स्टेप 3: Deloitte Careers Portal वर जा आणि “QA Engineer Intern” साठी अर्ज करा
स्टेप 4: ऑनलाईन टेस्ट, टेक्निकल मुलाखत आणि HR फेरी पूर्ण करा
उद्योजकतेकडे वाटचाल करणाऱ्यांसाठी उत्तम संधी
Deloitte सारख्या जागतिक कंपनीसोबत काम करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करण्याचा अनुभव मिळतो. यामुळे त्यांचे तांत्रिक कौशल्य वाढते आणि करिअर संधी अधिक मजबूत होतात. हे इंटर्नशिप प्रोग्राम केवळ एक अनुभव नसून, भविष्यातील एक वळण ठरू शकते.
अधिक माहितीसाठी Deloitte Careers Portal भेट द्या