Motorola ने भारतात आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 60 Stylus लॉन्च केला आहे. हा Motorola चा पहिला Edge सिरीज फोन आहे ज्यामध्ये इन-बिल्ट स्टायलस देण्यात आला आहे. या स्टायलसच्या मदतीने वापरकर्ते सहजपणे नोट्स घेऊ शकतात, स्केच करू शकतात किंवा एखादी रचना तयार करू शकतात.
हा स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसर, ५०००mAh बॅटरी, आणि 68W वायर्ड तसेच 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. तसेच, यामध्ये AI आधारित विविध फिचर्ससुद्धा देण्यात आले आहेत.
Motorola Edge 60 Stylus ची किंमत आणि उपलब्धता
Motorola Edge 60 Stylus ची विक्री 23 एप्रिलपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट, Motorola च्या अधिकृत वेबसाइटवर आणि Reliance Digitalसह इतर ऑफलाइन रिटेल स्टोअर्समध्ये सुरू होईल.
हा फोन 8GB RAM + 256GB स्टोरेज या सिंगल व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत ₹22,999 आहे. मात्र, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास ग्राहकांना तो moto edge 60 stylus price ₹21,999 मध्ये मिळू शकतो.
फोन दोन Pantone-Validated रंगांमध्ये येतो – Surf the Web आणि Gibraltar Sea.
Motorola Edge 60 Stylus चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
- डिस्प्ले: 6.7 इंचांचा 1.5K pOLED पंच-होल डिस्प्ले
- रीफ्रेश रेट: 120Hz
- ब्राइटनेस: 3000 निट्स पीक ब्राइटनेस
- स्क्रीन प्रोटेक्शन: Corning Gorilla Glass 3
- प्रोसेसर: Qualcomm Snapdragon 7s Gen 2
- RAM आणि स्टोरेज: 8GB RAM + 256GB UFS 2.2 स्टोरेज
कॅमेरा फिचर्स
- मुख्य कॅमेरा: 50MP Sony LYT 700C सेन्सर
- अल्ट्रावाइड कॅमेरा: 13MP
- सेल्फी कॅमेरा: 32MP
- अतिरिक्त सेन्सर: 3-in-1 लाईट सेन्सर
बॅटरी आणि चार्जिंग
- बॅटरी क्षमता: 5000mAh
- चार्जिंग: 68W फास्ट वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग
इतर खास वैशिष्ट्यं
- इन-बिल्ट स्टायलससह AI फिचर्स: Sketch to Image, AI Styling, Instant Shopping with Glance AI
- IP68 रेटिंग: पाण्यापासून आणि धुळीपासून संरक्षण
- मिलिटरी ग्रेड डिझाइन: अधिक टिकाऊपणा
- व्हेगन लेदर बॅक फिनिश
- Dolby Atmos स्टीरिओ स्पीकर्स
- इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर
कनेक्टिव्हिटी ऑप्शन्स
- 5G, 4G, Wi-Fi 6E
- Bluetooth 5.4, GPS, GLONASS
- NFC, USB Type-C पोर्ट
Motorola Edge 60 Stylus हा फोन खासकरून अशा युजर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे ज्यांना काम करताना स्टायलसचा उपयोग करायचा असतो, आणि त्याचसोबत उत्तम परफॉर्मन्स, AI फिचर्स आणि मजबूत डिझाइन हवे असते. मध्यम किंमतीत स्टायलस फिचर असलेला हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.