iQOO चा धमाकेदार फोन iQOO Z10 आणि Z10x 20 हजारात भारतात आज होणार लॉन्च

Sourabh Patil

iQOO Z10 launch date

मुंबई | 10 एप्रिल 2025 iQOO Z10 सीरिजमधील दोन नवीन स्मार्टफोन, iQOO Z10 आणि iQOO Z10x, आज भारतात अधिकृतपणे लॉन्च होणार आहेत. या इव्हेंटमुळे स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा उत्साह संचारला आहे. Z10 हा अधिक पॉवरफुल स्मार्टफोन असणार असून यामध्ये Snapdragon 7s Gen 3 चिपसेट देण्यात आला आहे. तर Z10x मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट असणार आहे. दोन्ही फोनमध्ये मोठ्या बॅटऱ्या आणि अनेक अपग्रेड्स असणार आहेत.

हायलाइट्स:

  • iQOO वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमसह गिफ्ट्स आणि कूपन्स जिंकण्याची संधी
  • iQOO Z10 ची किंमत 22,000 रुपयांखाली असण्याची शक्यता
  • iQOO देणार 2 वर्षांचे OS अपडेट्स आणि 3 वर्षांचे सिक्युरिटी पॅचेस

iQOO Z10 launch date, Z10x लॉन्च कसे पाहाल?

  • iQOO च्या अधिकृत वेबसाईटवर लाइव्ह स्ट्रीम पाहता येईल
  • आज दुपारी 12 वाजता लॉन्च इव्हेंट सुरू होणार
  • विद्यार्थ्यांसाठी 500 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध
  • इव्हेंट पाहणाऱ्यांना iQOO गिफ्ट्स आणि ₹1,000 पर्यंत कूपन्स जिंकण्याची संधी

किंमत आणि उपलब्धता (अपेक्षित)

  • iQOO Z10 ची सुरुवातीची किंमत ₹21,999 असू शकते आणि बँक ऑफर्सनंतर ती ₹19,999 पर्यंत कमी होऊ शकते
  • iQOO Z10x ₹15,000 च्या आत उपलब्ध होण्याची शक्यता
  • हे फोन Amazon India आणि mshop.iqoo.com वरून खरेदी करता येतील

iQOO Z10 चे मुख्य स्पेसिफिकेशन्स (अपेक्षित)

  • बॅटरी: 7,300mAh – या सेगमेंटमधील सर्वात मोठी बॅटरी
  • चार्जिंग: 90W फास्ट चार्जिंग
  • प्रोसेसर: Snapdragon 7s Gen 3 (Antutu स्कोअर – 820K+)
  • RAM & Storage: 12GB RAM + 12GB व्हर्च्युअल RAM + 256GB स्टोरेज
  • डिस्प्ले: Quad Curved AMOLED डिस्प्ले, 5,000 निट्स पीक ब्राइटनेस
  • कॅमेरा: 50MP Sony IMX882 मुख्य कॅमेरा (OIS सह), 32MP सेल्फी कॅमेरा
  • OS: Android 15 आधारित Funtouch OS 15
  • AI फिचर्स: AI Erase, Super Document, Note Assist
  • रंग: ब्लॅक आणि सिल्व्हर

iQOO Z10x चे मुख्य स्पेसिफिकेशन्स (अपेक्षित)

  • बॅटरी: 6,500mAh
  • चार्जिंग: 44W फास्ट चार्जिंग + USB-C टू USB-C रिव्हर्स चार्जिंग
  • प्रोसेसर: MediaTek Dimensity 7300 (Antutu स्कोअर – 728K+)
  • RAM & Storage: 8GB RAM + 8GB व्हर्च्युअल RAM + 256GB UFS 3.1 स्टोरेज
  • डिस्प्ले: 120Hz रिफ्रेश रेट, 1,050 निट्स ब्राइटनेस
  • कॅमेरा: 50MP मुख्य कॅमेरा, 4K रेकॉर्डिंग, IR ब्लास्टर
  • OS: Android 15 आधारित Funtouch OS 15
  • AI फिचर्स: AI Documents, AI Translation, AI Erase
  • रंग: Titanium (सिल्व्हरसारखा) आणि Ultramarine (डार्क ब्लू)
iQOO Z10 launch date

iQOO Z10 आणि Z10x हे दोन्ही स्मार्टफोन कमी बजेटमध्ये पॉवरफुल फीचर्स देत आहेत. दमदार बॅटरी, जबरदस्त चिपसेट, आणि AI फीचर्समुळे हे फोन भारतीय ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरू शकतात. iQOO Z10 launch date आजच्या लॉन्चमध्ये या फोन्सबाबत अधिकृत माहिती समोर येणार असून, इच्छुक खरेदीदारांनी 12 वाजता iQOO च्या वेबसाइटवर लॉग इन करून इव्हेंट पाहण्याची संधी गमावू नये.

Leave a Comment