युरोपीय संघाचा दुटप्पी चेहरा! भारत-पाकिस्तान तणावावर भारताला दिला संयमाचा सल्ला, जयशंकरांची भाकीत ठरली खरी

Sourabh Patil

India-Pakistan tensions

India-Pakistan tensions भारत आणि पाकिस्तानमधील तणावावरून युरोपीय संघाने पुन्हा एकदा आपला दुटप्पीपणा दाखवला आहे. जम्मू-कश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack)येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, युरोपीय संघाच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी भारताला संयम बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांचे दोन वर्षांपूर्वीचे विधान पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

एकीकडे युरोपीय संघ रशियाविरोधात आक्रमक भूमिका घेत यूक्रेनला शस्त्रास्त्रे देत आहे, तर दुसरीकडे भारताला शांतीचा संदेश देत आहे. ही भूमिका दुटप्पी असल्याची टीका आता पुन्हा जोर धरत आहे.

काजा कल्लास यांनी दिला ‘संयम’ चा सल्ला

युरोपीय संघाच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरण विषयक उच्च प्रतिनिधी आणि उपाध्यक्ष काजा कल्लास (Kaja Kallas) यांनी गुरुवारी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांच्याशी फोनवर संवाद साधला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (X) वर त्यांनी लिहिले, “भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव चिंतेचा विषय आहे. दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती सुधारण्यासाठी संवाद साधावा. तणाव वाढवून कुणाचाच फायदा होणार नाही.

India-Pakistan tensions जयशंकरांचे जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत

युरोपकडून पाकिस्तानला दहशतवादावर कारवाईसाठी दबाव टाकण्याऐवजी भारताला संयमाचे सल्ले दिले जात आहेत. अशा परिस्थितीत, एस. जयशंकर यांनी जून 2022 मध्ये स्लोवाकिया येथील परिषदेत दिलेले भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी म्हटले होते, “युरोपने ही मानसिकता सोडली पाहिजे की त्यांचे प्रश्न हे जगाचे प्रश्न असतात, पण जगाचे प्रश्न त्यांचे नसतात.

त्यावेळी युक्रेन युद्धात भारताने रशियाविरोधात भूमिका घ्यावी, असा दबाव युरोपकडून येत होता. मात्र, भारताने स्पष्ट भूमिका घेत युरोपच्या एकतर्फी विचारसरणीला प्रत्युत्तर दिले होते.

चीनबाबतही दिले होते स्पष्ट उत्तर

चीनच्या मुद्द्यावरूनही जयशंकर यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यांनी सांगितले होते की, “भारत आणि चीन यांच्यातील तणाव युक्रेन युद्धाच्या आधीपासूनच आहे. या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही चीनबरोबरच्या तणावाचे व्यवस्थापन करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत.

ते पुढे म्हणाले होते, “जर जागतिक स्तरावर पाठिंबा मिळाला तर चांगलेच, पण कोणत्याही संघर्षात केवळ दुसऱ्या संघर्षात मदत मिळावी म्हणून सामील होणे हे चुकीचे आहे. जग अशा प्रकारे चालत नाही.

भारताने घेतलेली भूमिका ठरतेय बरोबर

युरोपीय संघाच्या सल्ल्यानंतर पुन्हा एकदा भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुस्पष्टता आणि एस. जयशंकर यांची दूरदृष्टी अधोरेखित झाली आहे. भारताने जागतिक मंचावर आपली स्वतंत्र भूमिका राखत जगाला आपले धोरण स्पष्टपणे समजावले आहे.

Leave a Comment