Trump tariff नवी दिल्ली | 10 एप्रिल 2025 — चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या व्यापार संघर्षाचा अप्रत्यक्ष लाभ भारतीय ग्राहकांना होणार आहे. अमेरिकेने चीनवर लादलेल्या आयात करामुळे अनेक चिनी कंपन्यांनी भारतात आपलं उत्पादन स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा थेट परिणाम म्हणजे भारतात स्मार्टफोन, टीव्ही, फ्रिज यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती झपाट्याने घटण्याची शक्यता आहे.
Trump tariff चा कर झटका आणि भारतात गुंतवणुकीकडे वळलेले चिनी उत्पादक
अमेरिकेने चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर तब्बल १२५% टॅरिफ (कर) लागू केल्यामुळे, अनेक चिनी इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. भारतातील उत्पादन खर्च तुलनेने कमी असल्यामुळे या कंपन्यांना येथे व्यवसाय विस्तार करणे फायदेशीर वाटत आहे. यामुळे देशातील ग्राहकांना कमी किमतीत दर्जेदार इलेक्ट्रॉनिक उपकरणे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
घरगुती उत्पादनामुळे कमी होणार दर
टीव्ही, रेफ्रिजरेटर, स्मार्टफोनसारख्या वस्तूंचं उत्पादन थेट भारतात होऊ लागल्यास, उत्पादन खर्चात लक्षणीय घट होणार आहे. परिणामी या वस्तू ग्राहकांना स्वस्तात मिळणार आहेत. यामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोठी स्वस्ताई येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्पर्धेचा फायदाही ग्राहकांना मिळणार
चिनी (China) कंपन्यांना भारतीय (India) बाजारात टिकून राहण्यासाठी स्थानिक उत्पादकांशी टक्कर द्यावी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी स्वस्त दरात अधिक फीचर्स असलेल्या प्रॉडक्ट्सची रेलचेल होणार आहे. येत्या काही महिन्यांत टीव्ही, स्मार्टफोन, फ्रिजच्या किमती घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इन्व्हेंटरी सायकलनुसार मे-जूनपासून ऑर्डर्स सुरू होणार
अमेरिकेतील मागणी कमी झाल्यामुळे चिनी उत्पादक भारतीय कंपन्यांना स्वस्त दरात घटक पुरवण्यास तयार आहेत. येत्या मे-जूनपासून भारतीय कंपन्या नवीन ऑर्डर्स देण्यास सुरूवात करतील, ज्याचा फायदा २-३ महिन्यांच्या इन्व्हेंटरी सायकलनंतर बाजारात दिसून येईल. Trump tariff