हृतिक रोशनच्या डॅलस शोवर चाहत्यांचा संताप! 1.25 लाख खर्चून 2 तास रांगेत थांबले, तरी फोटोला नकार

Sourabh Patil

Hrithik Roshan

Hrithik Roshan Dallas Show Controversy बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन याने नुकताच डॅलस, टेक्सास येथे एक कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या इव्हेंटनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी आयोजकांच्या अकार्यक्षमता आणि हृतिकच्या वागणुकीवरही नाराजी व्यक्त करत तक्रारी केल्या आहेत.

लाखोंची तिकिटं, तरीही फोटो नाही!

एका युजरने Reddit वर पोस्ट करत सांगितले की Bollywood Celebrity News –

प्रत्येकाने $1500 (जवळपास ₹1.25 लाख) आणि जनरल अ‍ॅडमिशन तिकिटं भरून VIP भेटीसाठी पैसे दिले, पण फोटोही मिळाला नाही.

चाहत्यांच्या मते, हृतिकने 2 तास रांगेत थांबलेल्या अनेकांना फोटोसाठी नकार दिला, आणि फक्त 30 मिनिटांसाठीच कार्यक्रमात हजेरी लावली. त्याला थंडीची तमा नव्हती आणि तो त्रासलेला वाटत होता, असेही एका युजरने लिहिले.

आयोजकांवर आणि हृतिकवर टीका

संबंधित Reddit पोस्टमध्ये म्हटले आहे –

Dallas Show कार्यक्रम अत्यंत खराब होता. बाहेरच्या थंड हवामानात सगळं केलं गेलं, हृतिक फक्त अर्धा तास आला आणि VIP पास असूनही काहीच उपयोग झाला नाही. कोणताही रिफंड मिळत नाही!

दुसऱ्या युजरने लिहिले –

माझी मैत्रीणही कार्यक्रमात गेली होती, ती म्हणते कार्यक्रम भयानक होता. आता हृतिक न्यू जर्सीमध्ये येणार आहे आणि तिथेही अशाच प्रकारची जाहिरात पाहून धक्काच बसला!

काही चाहत्यांनी हृतिकलाही दोषी धरले आणि म्हणाले की –

फक्त आयोजकांना दोष देऊन चालणार नाही, हृतिकलाही जबाबदारी घ्यावी लागेल.

Hrithik Roshan सोशल मीडियावर संतापाचा उद्रेक

या घटनेनंतर सोशल मीडियावर हृतिकच्या कार्यक्रमाबद्दल नाराजगीचा सूर उमटला आहे. लाखोंची रक्कम खर्चूनही योग्य अनुभव न मिळाल्याने अनेक चाहते नाराज झाले आहेत. हृतिक रोशन किंवा आयोजकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, अशा घटनांमुळे स्टार्सच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Leave a Comment