Delhi Capitals आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेली मॅच एक अजब थ्रिलर ठरली. या मॅचमध्ये सुरुवातीपासूनच लखनऊ सुपर जायंट्सचे पारडे जड दिसत होते. अगदी 99% शक्यता लखनऊच्या विजयाकडे झुकलेली असताना, दिल्ली कॅपिटल्सने असा काही कमबॅक केला की क्रिकेट चाहत्यांना विश्वासच बसेना! या रोमांचक सामन्यात नेमकं काय झालं, लखनऊ कडून कोणत्या चुका झाल्या आणि दिल्लीने ही मॅच कशी खेचून आणली हे सविस्तर पाहूया.
टॉस आणि पहिली इनिंग – लखनऊचा धडाका आणि कोलॅप्स
दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनऊच्या बॉलिंग लाईनअपमध्ये तितकी ताकद नसल्यामुळे आणि ड्यूचा प्रभाव पडू शकतो हे लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला. मात्र, लखनऊने पहिल्या बॅटिंगचा फायदा घेतला आणि आक्रमक सुरुवात केली.
मार्करम आणि मिशेल मार्शची आक्रमक बॅटिंग: मार्करम आणि मिशेल मार्शने सुरुवातीला स्ट्राईक फिरवत खेळला. पहिल्या पाच षटकांत 46 धावा जोडल्या. त्यानंतर मिशेल मार्श आणि निकोलस पूरन या जोडीने सामना आपल्या हातात घेतला आणि दिल्लीच्या गोलंदाजांवर तुटून पडले.
???? मिशेल मार्श – 21 चेंडूत अर्धशतक
???? निकोलस पूरन – 24 चेंडूत अर्धशतक
ही जोडी मैदानावर तुफान फटकेबाजी करत होती. 13व्या षटकाच्या शेवटी लखनऊचा स्कोर 161 वर पोहोचला होता आणि 250+ धावसंख्येचा अंदाज वर्तवला जात होता. पण याच ठिकाणी लखनऊने मोठी चूक केली आणि सामना त्यांच्या हातातून निसटला.
ऋषभ पंतचा फ्लॉप शो आणि लखनऊचा कोलॅप्स
ऋषभ पंत (Rishabh Pant), जो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण पंतने पहिल्या पाच चेंडूंत एकही धाव काढली नाही आणि सहाव्या चेंडूवर कुलदीप यादवने त्याला त्रिफळाचीत केलं. यानंतर लखनऊच्या बॅटिंगमध्ये घसरण सुरू झाली. IPL 2025
???? पंत आऊट झाल्यावर लगेचच पूरन आऊट
???? अक्षर पटेलने बाउंड्री रोखल्या आणि कुलदीप यादवने आणखी दोन विकेट्स घेतल्या
???? स्टार्कच्या अनुभवामुळे टेलएंडर गोलंदाजांची विकेट्स पटकन गेल्या
मात्र, शेवटी डेविड मिलरने दोन षटकार मारत लखनऊचा स्कोर 209 वर पोहोचवला. जर पंत आणि पूरन अधिक वेळ मैदानावर राहिले असते, तर हा स्कोर सहज 230+ गेला असता.
दिल्ली Delhi Capitals ची डगमगती सुरुवात आणि फाफ-अक्षरची पार्टनरशिप
दिल्लीची इनिंग सुरू झाली तेव्हा लखनऊ Lucknow Super Giants च्या विजयाचा अंदाज जवळपास निश्चित होता.
???? पहिल्या षटकात शार्दुल ठाकूरने दोन विकेट्स घेतल्या
???? दुसऱ्या षटकात समीर रिजवीही बाद – दिल्लीची तीन विकेट्स फक्त सात धावांवर गेल्या!
यानंतर कर्णधार अक्षर पटेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी भागीदारी करत दिल्लीचा डाव सावरला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये 43 धावा जोडल्या आणि सामन्यात काही प्रमाणात स्थैर्य आणलं. पण लखनऊच्या बॉलर्सनी परत जोर लावला आणि अक्षर-प्लेसिसच्या विकेट्स घेतल्या. यामुळे पुन्हा लखनऊच्या विजयाची शक्यता 95% वर गेली. पण इथूनच मॅच फिरली!
विपराज निगम आणि आशुतोष शर्माची जादू
दिल्लीच्या इनिंगमध्ये सगळ्यात मोठी चमत्कृती घडवली विपराज निगम आणि आशुतोष शर्माने.
???? विपराज – 20 वर्षांचा युवा खेळाडू, आयपीएल डेब्यू मॅच
???? 15 चेंडूत 39 धावा – जबरदस्त फिनिशरची भूमिका निभावली
विपराजने स्पिनर्सवर हल्लाबोल केला आणि दिल्लीला मॅचमध्ये परत आणलं. त्याने रवी बिश्नोईच्या षटकात 17 धावा काढल्या आणि शाहबाज अहमदच्या ओव्हरमध्ये 15 धावा जोडल्या. या खेळीमुळे दिल्लीचा आत्मविश्वास पुन्हा उंचावला.
आशुतोष शर्माचा तडाखा – सामना दिल्लीच्या बाजूने फिरला!
आशुतोष शर्मा Ashutosh Sharma मागील हंगामात पंजाब किंग्जकडून खेळला होता, पण त्याला रिलीज करण्यात आलं होतं. या सामन्यात त्याने एक गोष्ट ओळखली – हीच ती वेळ, जेव्हा आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं आहे.
???? विष्णुच्या षटकात सलग तीन षटकार आणि एक चौकार – 16 धावा
???? दिल्लीला शेवटच्या 12 चेंडूत 22 धावा हव्या होत्या
19व्या षटकात प्रिन्स यादव गोलंदाजीला आला आणि कुलदीप यादव बाद झाला. त्यामुळे आशुतोष स्ट्राईकला आला आणि त्याने षटकार ठोकत आपली अर्धशतक पूर्ण केलं!
शेवटच्या षटकातील थरार आणि दिल्लीचा विजय
शेवटच्या षटकात दिल्लीला 6 धावा हव्या होत्या.
???? पहिला चेंडू – मोहित शर्मा चुकला, पंतने स्टंपिंगचा चान्स सोडला
???? दुसरा चेंडू – मोहितने सिंगल घेतला
???? तिसरा चेंडू – आशुतोष शर्माने षटकार ठोकून दिल्लीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला!
ऋषभ पंतच्या चुका लखनऊला महागात पडल्या
ऋषभ पंतने या सामन्यात बऱ्याच चुका केल्या, ज्या लखनऊसाठी घातक ठरल्या:
❌ बॅटिंगमध्ये फेल – 0 धावा
❌ कॅच सोडला – आशुतोष शर्मा जिवंत राहिला
❌ स्टंपिंग मिस – मोहित शर्मा नाबाद राहिला
निष्कर्ष – दिल्लीचा ऐतिहासिक विजय
Delhi Capitals ने 99% हरलेली मॅच 1% शक्यता असताना जिंकली! विपराज निगम आणि आशुतोष शर्माने अपराजेय खेळी करत आयपीएलमधील एक ऐतिहासिक विजय मिळवला. ऋषभ पंतने काही चुका केल्या, ज्या लखनऊच्या हारचं कारण ठरल्या.
तुमच्या मते कोणता टर्निंग पॉइंट ठरला? तुमच्या प्रतिक्रिया खाली नक्की सांगा!