महाराष्ट्रावर आस्मानी संकट; पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Sourabh Patil

Weather Alert

Weather Alert राज्यात एप्रिलच्या मध्यात हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा वीजांचा कडकडाट, गडगडाटी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील 24 ते 48 तासांत वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विदर्भातसुद्धा पावसाची शक्यता असून उर्वरित महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम राहणार आहे.

पुण्यात तापमानात चढ-उतार; उन्हाचा तीव्र चटका

पुणे शहराचे तापमान 40.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. आजच्या दिवशी कमाल तापमान 40 अंश तर किमान तापमान 20 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, मात्र दुपारी उन्हाचा तीव्र चटका जाणवण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने पश्चिम महाराष्ट्रातील सरासरी तापमान 19.6 अंश ते 42.2 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याचे नमूद केले आहे.

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज

सातारा जिल्ह्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून विजांच्या गडगडाटासह हलक्या सरी कोसळू शकतात. येथे कमाल तापमान 41 अंश आणि किमान तापमान 20 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. सांगलीत उन्हाचा चटका अधिक तीव्र असून कमाल तापमान 40 अंश, किमान 22 अंश सेल्सिअस नोंदवले जाऊ शकते. हवामान विभागाने येथे एक-दोन वेळा गडगडाटी पावसाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही ढगाळ वातावरण राहील आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 39 अंश आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहू शकते.

Weather Alert काय घ्याल खबरदारी?

Maharashtra Weather Update आकाशात विजा चमकत असल्यास झाडांखाली किंवा उघड्यावर थांबू नका. इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे टाळा. गरज नसल्यास प्रवास टाळावा. शेतकऱ्यांनी शेतीची योग्य काळजी घ्यावी.

Leave a Comment