Vaibhav Suryavanshi राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या तिसऱ्याच आयपीएल सामन्यात दमदार शतक ठोकत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी हे यश मिळवणारा वैभव सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.
IPL 2025 सोमवारी झालेल्या गुजरात टायटन्सविरुद्ध (GT vs RR) सामन्यात वैभवने केवळ ३५ चेंडूत शतक झळकावले आणि यूसुफ पठाणचा वेगवान भारतीय शतकाचा विक्रम मोडीत काढला. त्याच्या या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१० धावांचे लक्ष्य फक्त २५ चेंडू राखून पूर्ण केले.
सामन्यात यशस्वी जयस्वालने नाबाद ७०, तर रियान परागने नाबाद ३२ धावा केल्या, मात्र वैभवच्या तुफानी शतकाने त्याला विजयाचा हिरो बनवले.
Vaibhav Suryavanshi च रोहित शर्माकडून सोशल मीडियावर विशेष कौतुक
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने वैभवच्या खेळीवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत सोशल मीडियावरून त्याचे भरभरून कौतुक केले. रोहितने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर वैभवचा फोटो शेअर करत फक्त एकच शब्द लिहिला – “Class”. वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराकडून मिळालेलं हे कौतुक वैभवसाठी मोठी प्रेरणा ठरली आहे.
वैभव सूर्यवंशीचा पराक्रम केवळ राजस्थान रॉयल्ससाठी नव्हे, तर संपूर्ण भारतीय क्रिकेटसाठी आशादायक ठरत आहे. अशाच युवा खेळाडूंच्या जोरावर भारताचा क्रिकेटचा भविष्य उज्वल वाटतो.