UPSC Result 2024 केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्राचा अर्चित डोंगरे (Archit Dongre) देशात तिसऱ्या क्रमांकावर येत अत्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
शक्ती दुबे (Shakti Dubey) याने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून, हर्षिता गोयल दुसऱ्या क्रमांकावर आहे. अर्चित डोंगरेने मिळवलेले हे यश महाराष्ट्रासाठी विशेष अभिमानास्पद ठरले आहे. विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी एकूण १,००९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
UPSC Result 2024 – टॉप १० यादी
- शक्ती दुबे
- हर्षिता गोयल
- अर्चित पराग डोंगरे (महाराष्ट्र)
- शाह मार्गी चिराग
- आकाश गर्ग
- कोमल पूनिया
- आयुषी बन्सल
- राज कृष्ण झा
- आदित्य विक्रम अग्रवाल
- मयंक त्रिपाठी
एकूण 1009 उमेदवारांची निवड; IAS, IPS, IFS मध्ये होणार नेमणूक
या वर्षी UPSC CSE 2024 मध्ये एकूण 1009 उमेदवारांची निवड झाली असून, यामध्ये IAS, IPS, IFS आणि केंद्र सरकारच्या विविध सेवांमध्ये नेमणूक केली जाणार आहे. या परीक्षेच्या मुलाखती जानेवारी ते एप्रिल 2025 दरम्यान पार पडल्या. आयोगाने यासोबत २३० उमेदवारांची राखीव यादी देखील प्रसिद्ध केली आहे.
अर्चित डोंगरेचं यश – महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण
अर्चित डोंगरे याचं हे यश वैयक्तिक यशापलीकडे जाऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायक ठरलं आहे. UPSC सारख्या कठीण परीक्षेसाठी लागणारी चिकाटी, सुसंगत अभ्यासपद्धती आणि मानसिक संतुलन याचे उत्तम उदाहरण म्हणजे अर्चितचे यश.
त्याच्या या कर्तृत्वामुळे राज्यभरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. हजारो यूपीएससी स्पर्धकांसाठी तो एक नवा आदर्श ठरला आहे.
UPSC CSE Final Result यू.पी.एस.सी. वेबसाइटवर म्हणजेच http//www.upsc.gov.in वर देखील उपलब्ध असेल. गुण १५ दिवसांच्या आत वेबसाइटवर उपलब्ध होतील.
प्रवर्गानुसार उमेदवारांची संख्या:
- सामान्य प्रवर्ग (General): 335
- आर्थिक दुर्बल घटक (EWS): 109
- इतर मागासवर्गीय (OBC): 318
- अनुसूचित जाती (SC): 160
- अनुसूचित जमाती (ST): 87
एकूण निवड झालेले उमेदवार: 1009
यामधून स्पष्ट होते की विविध सामाजिक गटांमधून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार यश मिळवत आहेत. UPSC कडून यासोबतच 230 उमेदवारांची राखीव यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या यशस्वी उमेदवारांची IAS, IPS, IFS आणि अन्य केंद्रीय सेवांमध्ये लवकरच नेमणूक होणार आहे.