Ubar जाहिरात प्रकरण: ट्रॅव्हिस हेडला होणार जेल? RCBनं दाखल केला कोर्टात खटला, ब्रँडची खिल्ली उडवण्याचा आरोप

Sourabh Patil

Travis Head

Travis Head आयपीएल 2025 दरम्यान प्रसिद्ध झालेल्या Uber Moto च्या एका जाहिरातीमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड झळकलेल्या या जाहिरातीतून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघाची प्रतिमा मलीन केल्याचा गंभीर आरोप करत RCBने थेट दिल्ली उच्च न्यायालयात Uber विरोधात खटला दाखल केला आहे.

‘रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू’वरून वाद

RCBच्या मालकीच्या रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दाखल केलेल्या याचिकेनुसार, Uber ने आपल्या 5 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या जाहिरातीत ‘रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू’ असा मजकूर वापरून संघाच्या नावाची खिल्ली उडवली आहे. ही जाहिरात Uber Moto बाईक टॅक्सी सेवा प्रमोट करण्यासाठी ‘हैदराबादी’ मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आली होती.

या जाहिरातीत ट्रॅव्हिस हेडला बेंगळुरूच्या स्टेडियमबाहेर दाखवले आहे, जिथे एक बोर्ड “बंगलोर विरुद्ध हैदराबाद” असे दाखवले जाते. पण नंतर तो मजकूर बदलून “रॉयली चॅलेंज्ड बेंगळुरू” असं विनोदी शैलीत दाखवलं जातं. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड त्याला ओळखतो आणि हेड Uber Moto वरून निघून जातो. ही जाहिरात प्रचंड व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली.

RCBचा दावा – ब्रँड इमेज धोक्यात

RCBने कोर्टात म्हटलं की, ही जाहिरात Ubar advertisement त्यांच्या लोकप्रिय ब्रँडचा उपहास करत तयार करण्यात आली आहे, ज्यामुळे संघाच्या प्रतिमेला आणि चाहत्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांनी या जाहिरातीवर बंदी आणि नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

Uberचं उत्तर – Travis Head चा विनोदी आशय, ब्रँडचा थेट वापर नाही

Uberने कोर्टात आपली बाजू मांडताना सांगितले की, ही जाहिरात संपूर्णपणे विनोदी पद्धतीने तयार केली आहे आणि बेंगळुरूच्या वाहतूक कोंडीवर भाष्य करण्याचा हेतू होता. कंपनीने स्पष्ट केलं की, जाहिरातीत RCBचा ट्रेडमार्क थेट कुठेही वापरलेला नाही, त्यामुळे त्यांना जाहिरात मागे घेण्याची गरज वाटत नाही.

Uberने हेही सांगितले की, ही जाहिरात SRH आणि RCB यांच्यात 13 मे रोजी होणाऱ्या सामन्यानिमित्त सर्जनशील अभिव्यक्ती म्हणून तयार करण्यात आली होती. आता ती जाहिरात 10 दिवसांपूर्वीपासून ऑनलाईन आहे आणि मोठ्या प्रमाणात सोशल मीडिया कव्हरेज झाली आहे.

Leave a Comment