शिखर धवनच्या नात्याबाबत खुलासा? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

Sourabh Patil

Updated on:

Shikhar Dhawan

Shikhar Dhawan चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन एका रहस्यमय महिलेसोबत दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. अनेक मीडिया अहवालांनुसार, ही महिला (shikhar dhawan girlfriend) आयर्लंडची सोफी शाइन (Sophie Shine) असल्याचे सांगितले जात आहे.

आता, धवनने अप्रत्यक्षपणे आपल्या नात्याबाबत संकेत दिल्यासारखे वाटत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये, जेव्हा अँकरने त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव विचारले, तेव्हा धवनने सुरुवातीला टाळण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तो म्हणाला, “मी कोणाचे नाव घेणार नाही, पण या खोलीतील सर्वात सुंदर मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे.” त्यानंतर कॅमेरा त्या महिलेकडे वळला, जी धवनसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दिसली होती.

शिखर धवनची मुलगा जोरावरबद्दल भावना, मानसिक संघर्षावर वक्तव्य

शिखर धवनने आपल्या 11 वर्षीय मुलगा जोरावरशी कशा प्रकारे संपर्क ठेवतो याबाबत एक भावनिक खुलासा केला. 39 वर्षीय धवन ऑक्टोबर 2023 मध्ये आपल्या माजी पत्नी ऐशा मुखर्जीपासून घटस्फोटित झाला, पण त्याला मुलाच्या कस्टडी मिळाली नाही.

त्यानं मुलाशी व्हिडिओ कॉल आणि भेटीचा अधिकार मिळवला होता, पण तरीही तो मुलाला भेटू शकत नाही किंवा त्याच्याशी बोलू शकत नाही, असे त्याने सांगितले.

“मी त्याला रोज आठवतो” – धवनचे भावनिक वक्तव्य

ANI पॉडकास्ट वर बोलताना धवन म्हणाला:

  • “माझ्या मुलाला भेटून दोन वर्षे झाली आणि त्याच्याशी शेवटचं बोलून एक वर्ष झालं. हे खूप कठीण आहे, पण आपण जगायला शिकतो.”
  • “मी त्याला दररोज आठवतो आणि आत्मिकदृष्ट्या त्याच्याशी संवाद साधतो. सकारात्मक विचारांद्वारे मी त्याच्याशी बोलत असल्यासारखे वाटते.”
  • “माझं दुःख काहीच मदत करणार नाही, त्यामुळे मी ध्यानधारणा करून आमच्या नात्याला पुन्हा जोडतो.”

“मी फक्त त्याला मिठी मारेल” – मुलाशी भेटण्याबाबत चे Shikhar Dhawan चे उत्तर

जेव्हा त्याला विचारण्यात आले की, जर तुला तुझ्या मुलाशी पुन्हा भेटायचे मिळाले तर तू काय करशील?, तेव्हा धवनने भावनिक उत्तर दिले:

  • “मी प्रथम त्याला मिठी मारेन, त्याच्याशी बोलेन, त्याच्या भावना जाणून घेईन. जर तो रडला, तर मीही रडेन. त्याच्यासोबत प्रत्येक क्षणाचा आनंद घेईन.”

धवनने हेही सांगितले की, त्याचा मुलगा 11 वर्षांचा असूनही त्याने फक्त दोन-सव्वादोन वर्षेच त्याच्या आयुष्यात घालवली आहेत, त्यामुळे त्याच्यासाठी हा वियोग अत्यंत वेदनादायक आहे.

Shikhar Dhawan च्या नव्या नात्याविषयीच्या चर्चांसह, त्याच्या वैयक्तिक संघर्षाची चाहत्यांमध्ये सहानुभूती उमटत आहे. आता चाहते त्याच्या नात्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची प्रतीक्षा करत आहेत.

Leave a Comment