शेतकऱ्यांसाठी दिलासा: डिसेंबर २०२६ पर्यंत ८०% शेतकऱ्यांना मिळणार मोफत वीज – देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

Sourabh Patil

Maharashtra Farmers

Maharashtra farmers वर्धा | प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना डिसेंबर २०२६ पर्यंत दिवसा १२ तास मोफत वीजपुरवठा शेतकरी वीज योजना अंतर्गत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत, शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी ठोस पावले उचलली आहेत. फडणवीस म्हणाले की, “राज्यातील ८०% शेतकऱ्यांना वर्षभर दररोज १२ तास मोफत वीज मिळेल. यासाठी आवश्यक त्या योजना सरकारने राबवायला सुरुवात केली आहे.”

वीज दरात कपात आणि सौर ऊर्जेवर भर

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, २०२५ ते २०३० या कालावधीत सामान्य वीज ग्राहकांचे बिल दरवर्षी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे. त्याचबरोबर, ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज (free electricity) पुरवण्याचा योजनाही हाती घेतली आहे.

वर्धा जिल्ह्याच्या विकासाला चालना

आर्वी येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ७२० कोटी रुपयांच्या विकासकामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये सिंचन प्रकल्प, रस्ते आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. लोअर वर्धा प्रकल्पामधून ५०० मेगावॅट वीज निर्मिती केली जाईल. वाधोणा-पिंपळखुटा उपसा सिंचन योजना लवकरच मंजुरीच्या मार्गावर आहे. तसेच स्थानिक शेतकऱ्यांना अधिक पाणी व सिंचनाची सुविधा मुबलक प्रमाणात मिळणार असल्याचं स्पष्ट केलं.

Maharashtra farmers वर्धा बनणार मध्य भारताचे लॉजिस्टिक हब

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग आणि सिंदी येथील ड्रायपोर्ट यामुळे वर्धा हा मध्य भारतातील महत्त्वाचा लॉजिस्टिक केंद्र बनेल.

यासोबतच, विरूळ नोडला मान्यता देऊन तिथे एमआयडीसी प्रकल्प उभारण्याची घोषणाही त्यांनी केली, ज्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

मुख्य मुद्दे एका नजरेत:

  • डिसेंबर २०२६ पर्यंत ८०% शेतकऱ्यांना १२ तास मोफत वीज
  • ३०० युनिटपर्यंत मोफत सौर वीज – गरीब व मध्यमवर्गीयांसाठी योजना
  • वर्धा जिल्ह्यात ७२० कोटींच्या विकास कामांना सुरुवात
  • लोअर वर्धा व उपसा सिंचन योजनांना गती
  • वर्धा जिल्हा होणार मध्य भारताचे लॉजिस्टिक केंद्र

Leave a Comment