Post Office MIS नवी दिल्ली | प्रतिनिधी दरमहा स्थिर उत्पन्न हवा असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची मासिक उत्पन्न योजना (Monthly Income Scheme – MIS) एक उत्कृष्ट पर्याय ठरत आहे. या योजनेत एकदाच रक्कम गुंतवून, दर महिन्याला खात्रीशीर व्याज स्वरूपात परतावा मिळतो. विशेष म्हणजे, पती-पत्नीने संयुक्त खाते उघडून गुंतवणूक केल्यास अधिक व्याजाचा फायदा मिळतो.
Post Office MIS योजनेची वैशिष्ट्ये
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदाराने एकदाच ठराविक रक्कम जमा करावी लागते. या रकमेवर दरमहा व्याज मिळते आणि योजनेचा कालावधी ५ वर्षांचा असतो. मुदतपूर्ती झाल्यावर मूळ रक्कम परत मिळते. सध्या या योजनेवर वार्षिक ७.४% व्याजदर लागू आहे. गुंतवणुकीची मर्यादा ही एकट्या गुंतवणूकदारासाठी ९ लाख रुपये आहे आणि संयुक्त खात्याचा लाभ घेणाऱ्यांसाठी खात्यासाठी मर्यादा ही १५ लाख रुपये इतकी आहे. जर पती-पत्नीने एकत्र गुंतवणूक केली, तर त्यांना अधिक रक्कमेवर व्याज मिळते आणि मासिक उत्पन्नात वाढ होते. Monthly Income Scheme
किती मिळेल उत्पन्न?
Monthly Income Plan उदाहरणार्थ, जर पती-पत्नीने १५ लाख रुपये संयुक्त खात्यात गुंतवले, तर त्यांना वार्षिक ७.४% दराने दरवर्षी ₹१,११,००० व्याज मिळेल. याचा अर्थ, दरमहिना ₹९,२५० आणि ५ वर्षांत एकूण ₹५,५५,००० व्याजाद्वारे उत्पन्नाचा फायदा होऊ शकतो.
पोस्ट ऑफिस बचत खातेही फायदेशीर
Post Office Investment पोस्ट ऑफिस फक्त मुदत ठेवीसाठी नाही, तर बचत खात्यावरही आकर्षक व्याज देते. पोस्ट ऑफिस बचत खात्याचा व्याजदर हा वार्षिक ४% इतका आहे याच्या तुलनेत SBI बचत खात्याचा व्याजदर हा वार्षिक २.७०% इतका आहे तर PNB बचत खात्याचा व्याजदर हा वार्षिक २.७५% इतका आहे. म्हणजेच, पोस्ट ऑफिसचा पर्याय बँकांपेक्षा अधिक फायदेशीर ठरतो.
मुख्य वैशिष्ट्ये :
- ५ वर्षांसाठी एकदाच गुंतवणूक, दरमहा खात्रीशीर व्याज
- एकट्याने ₹९ लाख, तर संयुक्त खात्याने ₹१५ लाख गुंतवणुकीची मर्यादा
- ७.४% वार्षिक व्याज – दरमहिना ₹९,२५० पर्यंत उत्पन्न
- मुदतपूर्तीवर मूळ रक्कम परत
- बचत खात्यावरही बँकांपेक्षा जास्त व्याज