Ladki Bahin Yojana महाराष्ट्र सरकारकडून महिला सशक्तीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे हजारो महिलांना घरखर्चासाठी आधार मिळत आहे. मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्याच्या विलंबामुळे अनेक महिलांमध्ये चिंता आणि उत्सुकता निर्माण झाली होती. आता यावर अखेर पडदा पडला आहे.
महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana April Installment) 2 मे 2025 पासून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
तटकरे म्हणाल्या, “या योजनेतून पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यांमध्ये दर महिन्याला 1500 रुपये जमा करून त्यांना आर्थिक मदत दिली जाते. एप्रिल महिन्यासाठीही ही रक्कम महिलांच्या खात्यात पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पुढील 2 ते 3 दिवसांत सर्व लाभार्थींना ही रक्कम त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.”
Ladki Bahin Yojana सरकारचा निवडणूकपूर्व वादा पूर्ण होणार कधी?
या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी सरकारचा संकल्प अधिक मजबूत होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारमधील तीनही पक्षांनी हा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं. तरी अद्याप या वाद्याचा अंतिम निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आलेला नाही.
लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची आर्थिक मदत योजना ठरत असून, त्याचा लाभ दर महिन्याला मिळणाऱ्या हप्त्याच्या स्वरूपात हजारो महिला घेत आहेत.