GST on UPI payments UPI व्यवहारांवर GST? : केंद्र सरकारने युनिक पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून होणाऱ्या ₹2,000 पेक्षा जास्त रकमेच्या डिजिटल व्यवहारांवर वस्तू आणि सेवा कर (GST) लावण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. gst on upi payments above 2000 मीडिया रिपोर्टनुसार, अशा मोठ्या व्यवहारांना GSTच्या कक्षेत आणण्याची शक्यता आहे.
UPI व्यवहारांवर 18 टक्के GST लागू होणार?
प्रस्तावित योजनेनुसार, जर एखादा UPI व्यवहार ₹2,000 पेक्षा जास्त असेल, तर त्यावर 18% GST आकारण्याचा विचार केला जात आहे. डिजिटल पेमेंट्सना अधिक पारदर्शक बनवणे आणि आर्थिक शिस्तीची अंमलबजावणी करणे, हे यामागील प्रमुख उद्दिष्ट आहे.
हा GST दर सध्या अधिकांश डिजिटल सेवांवर लागू असलेल्या दरासारखाच (18%) असू शकतो. सध्या यासंदर्भात अंतिम निर्णय किंवा अंमलबजावणीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
GST on UPI payments P2P आणि व्यापारी व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
रिपोर्टनुसार, प्रस्तावित GST धोरणात व्यक्ती ते व्यक्ती (P2P) आणि व्यापारी व्यवहार (Merchant Transactions) हे दोन्ही प्रकार समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांपासून ते मोठ्या ग्राहकांपर्यंत सर्वांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशातील GST Collection संकलनात फेब्रुवारी 2025 मध्ये 9.1% वाढ झाली असून, एकूण ₹1.84 लाख कोटी रुपये एवढे संकलन नोंदवले गेले आहे.
आधिकृत आकडेवारीनुसार:
- केंद्रीय GST: ₹35,204 कोटी
- राज्य GST: ₹43,704 कोटी
- समाकलित GST (IGST): ₹90,870 कोटी
- उपदान उपकर (Compensation Cess): ₹13,868 कोटी
gst on upi news जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला, तर डिजिटल व्यवहार करणाऱ्यांसाठी ही मोठी आर्थिक बाब ठरू शकते. सध्या सरकारच्या विचाराधीन असलेल्या या योजनेबाबत अंतिम निर्णयाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.