गुडन्यूज! सागरिका घाटगे आणि झहीर खान झाले आईबाबा, पुत्र ‘फतेहसिन्हा’चं प्रेमळ स्वागत

Sourabh Patil

Sagarika Ghatge

Sagarika Ghatge क्रिकेट आणि मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल सागरिका घाटगे आणि माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खान (Zaheer Khan) यांच्या घरी आनंदाचा क्षण आला आहे. हे दोघं नुकतेच आईबाबा झाले असून त्यांना गोंडस पुत्ररत्न प्राप्त झालं आहे.

सोशल मीडियावरून खुद्द सागरिकाने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. तिने बाळाचा एक फोटो पोस्ट करत पहिली झलक दाखवली आणि त्याचबरोबर बाळाचं नावही जाहीर केलं आहे.

बाळाचं नाव ठेवलं – फतेहसिन्हा खान

सागरिका आणि झहीरने आपल्या लेकाचं नाव ‘फतेहसिन्हा खान’ असं ठेवलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये सागरिका म्हणते, “प्रेम, प्रार्थना आणि कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही आमच्या लाडक्या लेकाचं स्वागत करत आहोत.” या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

२०१७ मध्ये सागरिका घाटगे आणि झहीर खान विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या सहजीवनाला आता आठ वर्षं पूर्ण होत असतानाच त्यांच्या आयुष्यात हा नविन पाहुणा आला आहे. सागरिका (Sagarika Ghatge) वयाच्या ३९व्या वर्षी आई बनली असून तिच्या घरी आता गोड पाळणा हलला आहे.

क्रिकेट आणि सिनेसृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव

या आनंददायी बातमीमुळे क्रिकेट आणि बॉलीवूड (Bollywood News) क्षेत्रातील अनेक नामवंतांनी सागरिका आणि झहीरला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव होत असून, चाहते देखील आनंद व्यक्त करत आहेत.

फतेहसिन्हा खान या छोट्याच्या आगमनाने झहीर-सागरिका यांच्या कुटुंबात नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे. आमच्या वेबसाईटतर्फेही या नव्या आईबाबांना आणि छोट्या पाहुण्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Comment