महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी! ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ लवकरच धावणार, फडणवीसांची मोठी घोषणा

Sourabh Patil

Maharashtra

मुंबई | प्रतिनिधी महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक मोठी आणि आनंददायक बातमी समोर आली आहे. राज्यात लवकरच ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ सुरु होणार असून, या प्रकल्पाची अधिकृत घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पार पडलेल्या ‘वेव्ह्स समिट 2025’ दरम्यान केली. या नव्या सर्किट ट्रेनमुळे राज्यातील ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांना नवी जोड मिळणार आहे.

Maharashtra ऐतिहासिक स्थळांना जोडणारी विशेष सर्किट ट्रेन

‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन’ ही दहा दिवसांची विशेष टूर असेल, ज्यामध्ये प्रवाशांना शिवछत्रपतींच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक किल्ले आणि ठिकाणांना भेट देता येईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. ही ट्रेन राज्यातील सांस्कृतिक वारसा अधिक जवळून अनुभवण्याची संधी उपलब्ध करून देईल.

गोंदिया-बल्लारशा रेल्वे लाईनचं दुहेरीकरण

या कार्यक्रमात फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाची घोषणा करत सांगितलं की, गोंदिया ते बल्लारशा रेल्वे लाईनच्या दुहेरीकरणासाठी तब्बल ४८१९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांतील व्यापार आणि दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. गोंदिया हे मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेलगत असलेले महत्त्वाचे स्थानक असून, या प्रकल्पामुळे संपूर्ण भागाच्या विकासाला गती मिळणार आहे.

१३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास

Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Train या समारंभात फडणवीस यांनी आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितले की, राज्यातील १३२ रेल्वे स्थानकांचा आधुनिक पद्धतीने पुनर्विकास केला जाणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह अनेक महत्त्वाच्या स्थानकांचा समावेश आहे. नव्या सुविधांसह हे स्थानक पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र ठरणार आहेत.

केंद्राकडून महाराष्ट्रासाठी मोठा निधी

फडणवीस म्हणाले, “या वर्षी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून सुमारे २४ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कालावधीत देखील इतका निधी मिळाला नव्हता. सध्याचे सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.”

छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेनसह (Chhatrapati Shivaji Maharaj Circuit Train) गोंदिया-बल्लारशा लाईनचे दुहेरीकरण (Doubling of Gondia-Ballarsha line) आणि १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास हे प्रकल्प महाराष्ट्रातील पर्यटन, व्यापार आणि स्थानिक विकासाला नवी दिशा देणार आहेत. राज्यातील प्रवाशांसाठी हे एक सुवर्णसंधीचे पाऊल ठरेल, यात शंका नाही.

Leave a Comment