अक्षय्य तृतीयेच्या आधी सोने १ लाख रुपये प्रति १० ग्रॅमच्या पार; वाढलेल्या दरामुळे खरेदीवर परिणाम होणार का?

Sourabh Patil

Gold Price

Gold Price अक्षय्य तृतीयीसारख्या (Akshaya Tritiya) शुभमुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर देशभरात सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅमसाठी तब्बल १ लाख रुपये झाले आहेत. इतक्या उच्च दरामुळे ग्राहकांची खरेदीची मानसिकता बदलण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरीही गुंतवणुकीसाठी सोन्याची मागणी कायम राहील, असा विश्वास सराफा व्यापाऱ्यांना आहे.

Gold Price मध्ये अचानक वाढ का?

वेल्थमिल्स सिक्युरिटीज प्रा. लि.चे संचालक आणि इक्विटी तज्ज्ञ क्रांती बठिणी यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे, विशेषतः गेल्या सहा महिन्यांमध्ये.

“जिओपॉलिटिकल अस्थिरता, व्यापार शुल्क संघर्ष, अमेरिकन डॉलरमध्ये घसरण आणि मध्यवर्ती बँकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी या सगळ्या कारणांनी सोन्याचे दर वाढले आहेत,” असं ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या वर्षी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी १,०४० टन सोने खरेदी केले असून अजूनही त्यांची खरेदी सुरू आहे. त्यामुळे सोन्याचे दर आणखी वाढले आहेत.

सोनं की शेअर बाजार – काय निवडावं?

Tradejini चे COO त्रिवेश यांनी सांगितले की, कोणतीही गुंतवणूक पूर्णतः धोका-मुक्त नसते. मात्र, सोनं ही गुंतवणुकीची एक सुरक्षित वाट मानली जाते, विशेषतः आर्थिक अनिश्चिततेच्या काळात.

“सोनं ही सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिली जाते. महागाई, चलन घसरण आणि बाजारातील मोठ्या घडामोडींमध्ये सोनं हा एक ‘सेफ हेवन’ मानला जातो,” असे त्यांनी सांगितले.

भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये सोनं ही केवळ गुंतवणूक नसून संपत्तीचं प्रतीक आणि शुभकारक गोष्ट मानली जाते.

आता सोन्यात गुंतवणूक करावी का?

सध्याच्या घडीला सोनं विक्रमी उच्चांकावर (Gold Price Today) असल्यामुळे मोठ्या प्रमाणात एकरकमी गुंतवणूक टाळावी, असं त्रिवेश सांगतात. त्याऐवजी, थोड्याथोडक्या हप्त्यांमध्ये डिजिटल गोल्ड किंवा ETF च्या स्वरूपात गुंतवणूक करावी.

“Jar, SIP यांसारख्या प्लॅटफॉर्म्सद्वारे नियमित आणि छोट्या हप्त्यांमध्ये गुंतवणूक करणे अधिक शहाणपणाचं ठरेल,” असं ते म्हणाले.

सोनं आणि शेअर मार्केट – कोणता पर्याय चांगला?

२०१४ ते २०२४ या कालावधीत सोन्याने सुमारे १७८% परतावा दिला, तर निफ्टी ५० निर्देशांकाने सुमारे १८५% परतावा दिला आहे. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर बाजारात किंचित आघाडी आहे.

मात्र, बाजारात मोठी घसरण होत असताना सोनं भांडवलाचे संरक्षण करतं, म्हणून अशा अस्थिर काळात सोनं गुंतवणुकीतील स्थिरता प्रदान करतं.

संतुलित पोर्टफोलिओची गरज

त्रिवेश यांच्या मते, “सोनं हे शेअर्सची जागा घेऊ शकत नाही, पण संतुलित पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्थिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणुकीला बळकटी मिळते.”

Gold Price hit Rs 1 lakh per 10 gm ahead of Akshaya Tritiya

Leave a Comment