मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक – स्वित्झर्लंडला पळून जाण्याचा प्रयत्न फसला

Sourabh Patil

Mehul Choksi

dr mehul choksi नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेच्या ₹12,636 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी (PNB fraud case) आरोपी असलेला गीतांजली ग्रुपचा मालक मेहुल चोक्सी तब्बल सात वर्षांपासून सीबीआय आणि ईडीच्या रडारवर होता. अखेर 12 एप्रिल 2025 रोजी बेल्जियममध्ये त्याची अटक करण्यात आली. तो स्वित्झर्लंडमध्ये पलायन करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.

Mehul Choksi 2018 मध्ये भारतातून पळून गेला

2018 मध्ये मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस येण्याआधीच चोक्सी भारतातून फरार झाला होता. त्याने अँटिग्वा देशाचे नागरिकत्व घेतले होते. मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी, पत्नी आमी मोदी आणि भाऊ नीशल मोदी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची फसवणूक (PNBScam) केल्याचा आरोप आहे.

2021 मध्ये चोक्सीला डोमिनिका देशात बेकायदेशीररित्या प्रवेश केल्याबद्दल अटक झाली होती. त्यावेळी CBI टीमने त्याची कस्टडी घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले की त्याला उपचारांसाठी अँटिग्वामध्ये परतण्याची गरज आहे आणि तो नंतर परत येईल. 51 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर, ब्रिटिश क्वीनच्या प्रिव्ही कौन्सिलने त्याला दिलासा दिला आणि भारताकडे प्रत्यार्पण होऊ शकले नाही.

CBI-ED चे सातत्यपूर्ण शोध मोहीम

चोक्सी डोमिनिकाहून परत अँटिग्वाला गेला आणि तिथेच राहत होता. मात्र CBI आणि ED ने सतत त्याचा पाठपुरावा केला. मागच्या वर्षी त्याचं बेल्जियममध्ये वास्तव्य असल्याची माहिती मिळताच, भारतीय एजन्सींनी त्वरित बेल्जियन अधिकाऱ्यांना सतर्क केले आणि घोटाळ्याशी संबंधित सर्व कागदपत्रे शेअर केली.

स्वित्झर्लंडमध्ये पलायनाचा प्रयत्न

बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला अटक केली तेव्हा तो स्वित्झर्लंडकडे निघाल्याचा खुलासा झाला. त्याची पत्नी प्रीती चोक्सी ही बेल्जियमची नागरिक आहे. चोक्सीने बनावट कागदपत्रे वापरून रेसिडेन्सी कार्ड मिळवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःचा भारत व अँटिग्वाचा नागरिक असल्याची माहिती लपवली.

कर्करोगाचे कारण पुढे केले, पण भारत सरकार ठाम

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात चोक्सीच्या वकिलाने मुंबईतील कोर्टात सांगितले होते की तो सध्या रक्ताच्या कर्करोगावर उपचार घेत असल्याने भारतात येऊ शकत नाही. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहण्याची तयारी दर्शवली. मात्र, भारतीय एजन्सींनी हे नाकारून प्रत्यक्ष प्रत्यार्पणावर भर दिला.

सध्या भारतीय एजन्सीज चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आहेत. त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज करण्याची व प्रत्यार्पणाला विरोध करण्याची तयारी केली आहे. तरीही, इतक्या वर्षांच्या प्रयत्नांनंतर चोक्सीची अटक ही भारतीय तपास संस्थांसाठी एक मोठे यश मानले जात आहे. FraudNews

Leave a Comment