“क्रिकेटपटूंनी मला न्यूड फोटो पाठवले” – अ‍नाया बंगारचा खळबळजनक आरोप; लिंग बदलानंतर आलेले अनुभव उघड

Sourabh Patil

Anaya Bangar

Anaya Bangar माजी भारतीय क्रिकेटपटू आणि माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बंगार यांची कन्या अ‍नाया बंगारने लिंग बदलानंतर अनेक क्रिकेटपट्यांकडून त्रास झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. अ‍नायाने आपल्या संक्रमण प्रवासाविषयी बोलताना, काही क्रिकेटपट्यांनी तिला अश्लील फोटो पाठवल्याचा खुलासा केला असून, क्रिकेटविश्वात ट्रान्सजेंडर व्यक्तींना अधिक समजून घेण्याची आणि आदर देण्याची गरज असल्याचे ती म्हणाली.

समर्थनही मिळाले, पण त्रास अधिक इंडिया टुडेच्या उप चॅनेल ‘लल्लनटॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत अ‍नायाने सांगितले, “काही क्रिकेटपट्यांनी मला अचानक न्यूड फोटो पाठवले. काही लोकांचा पाठिंबाही मिळाला, पण अनेकांनी ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष त्रास दिला.” अ‍नाया पूर्वी आर्यन बंगार या नावाने ओळखली जायची. तिने लिंग बदलासाठी हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) घेतली आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातील संघर्ष मोकळेपणाने मांडले आहेत.

सामाजिक आणि मानसिक संघर्ष अ‍नाया म्हणाली, “मी यशस्वी जैस्वाल, सरफराज खान, मुशीर खान यांच्यासोबत क्रिकेट खेळले आहे. त्यावेळी माझी खरी ओळख लपवावी लागली. कारण वडील Sanjay Bangar प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आहेत आणि मला कोणत्याही गैरसमजांना तोंड द्यावे लागू नये अशी भीती होती.”

ती पुढे म्हणाली, “क्रिकेट विश्व हे असुरक्षिततेने आणि टॉक्सिक मॅस्क्युलिनिटीने भरलेले आहे. एक क्रिकेटपटू समोर सगळ्यांसमोर शिवीगाळ करायचा आणि नंतर एकटं असताना मला फोटो मागायचा. एकदा तर मी माझी अवस्था एका ज्येष्ठ क्रिकेटपटूला सांगितली, त्याने मला कारमध्ये चल म्हणत शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली.”

आंतरराष्ट्रीय धोरणात बदल आणि Anaya Bangar ची कथा

Anaya Bangar ची ही कहाणी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ट्रान्सजेंडर महिला क्रिकेटपटूंविषयी नवीन नियम लागू केले आहेत. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानेही (ECB) आपल्या धोरणात बदल केला असून, ट्रान्सजेंडर महिलांना आंतरराष्ट्रीय आणि उच्चस्तरीय महिला क्रिकेटमध्ये सहभागी होण्यास मनाई केली आहे.

अ‍नायाचे हे धक्कादायक आरोप आणि तिचा संघर्ष केवळ वैयक्तिक नाही, तर तो भारतीय क्रिकेट व्यवस्थेतील मानसिकता आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या स्वीकृतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो.

Leave a Comment