देशातील ३५ FDC औषधांवर बंदी! CDSCO चा कडक निर्णय

Sourabh Patil

CDSCO FDC Ban

CDSCO FDC Ban India News: केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organisation – CDSCO) ने देशातील ३५ फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधांच्या उत्पादन, विक्री आणि वितरणावर बंदी घातली आहे. या औषधांवर कोणतीही सखोल वैज्ञानिक चाचणी न करता परवाने दिल्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण झाल्याचं कारण देत ही कडक कारवाई करण्यात आली आहे.

कोणती आहेत ही FDC औषधे (FDCBannedDrugs)?

FDC म्हणजे अशा औषधांचा समावेश, ज्यामध्ये दोन किंवा अधिक औषधी घटक एका निश्चित प्रमाणात एकत्र असतात. CDSCO ने म्हटले आहे की, अशा अनेक औषधांना सुरक्षितता आणि प्रभावीतेच्या चाचणांशिवाय परवाने दिले गेले. त्यामुळे या औषधांच्या वापरामुळे रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका होऊ शकतो.

वेदनाशामक, मधुमेहावरची औषधे, आणि पोषण पूरक औषधांचा समावेश

बंदी घालण्यात आलेल्या FDC औषधांमध्ये वेदनाशामक, डायबेटीसवरील औषधे आणि काही पोषण पूरक औषधे यांचा समावेश आहे.

DCGI ने पत्राद्वारे दिले आदेश

भारतीय औषध महानियंत्रक (DCGI) डॉ. राजीव रघुवंशी यांनी ११ एप्रिल रोजी एक अधिकृत पत्र जारी करत, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील औषध नियंत्रक अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत. या पत्रात जानेवारी २०२३ मधील आधीच्या कार्यालयीन पत्राचा हवाला देण्यात आला आहे.

CDSCO FDC Ban आणि कायदेशीर कारवाई

राज्य औषध नियंत्रकांना या ३५ FDC औषधांवर तात्काळ बंदी आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राज्यस्तरावर औषध मंजुरी प्रक्रिया तपासण्याचे आणि औषध नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

ही बंदी लागू केल्याने अवैज्ञानिक आणि संभाव्यतः धोकादायक औषधांवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल, असं सीडीएससीओने स्पष्ट केलं आहे.

Leave a Comment