Table of Contents
एका कलियुगी पित्या कडून आपल्या सावत्र मुलाची हत्या
पहिल्या पतीपासून मुले, सावत्र बापाला कळताच पत्नीला व मुलाला बेदम मारहाण, मुलाचा मृत्यू ठाण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठाण्यात एका कलियुगी पित्याने आपल्या सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून त्याची हत्या केली. दुसऱ्या लग्नानंतर मुलाची आई त्याला काही दिवसांपूर्वी कोलकाताहून घेऊन आली होती. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका बापाने आपल्या सावत्र मुलाचा शारीरिक छळ करून खून केल्याचा आरोप आहे.पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील चितळसर परिसरात ही घटना घडली. येथे अल्पवयीन मुलाच्या आईने पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर आरोपीशी लग्न केले होते. लग्नानंतर ती पतीसोबत राहत होती. काही आठवड्यांपूर्वी ही महिला तिचा चार वर्षांचा मुलगा मोहम्मद आर्यन याला कोलकाताहून तिच्या घरी घेऊन आली होती.पोलिसांनी सांगितले की, आरोपीला महिलेच्या मागील लग्नापासून मुलाची माहिती नव्हती.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, महिला जेव्हा मुलाला घेऊन आली तेव्हा दोघांमध्ये भांडण झाले.पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी दिलशाद मुलाच्या उपस्थितीने नाराज होता आणि त्याने मुलाची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.
पोस्टमार्टम अहवालात वडिलांचे कृत्य उघड
पहिल्या पतीपासून मुले, सावत्र बापाला कळताच मुलाची निर्घुण हत्या एका माथेफिरू बापकडून करण्यात आली आहे. मुलाच्या मृत्यूनंतर पोलिसांनी रविवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली.मात्र, मृतदेहाच्या शवविच्छेदनाच्या अहवालात मुलावर गंभीर शारीरिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.त्याच्या बरगड्या आणि हाडे अनेक ठिकाणी तुटल्याचे आणि पोटात अंतर्गत जखमा असल्याचेही आढळून आले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू होता.
पोलिसांनी सांगितले की, दिलशाद असे आरोपीचे नाव असून त्याला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली.भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३ (हत्या) अन्वये चितळसर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय न्याय संहिता ( BNS ):
भारतीय न्याय संहिता ( BNS ) हा भारतीय प्रजासत्ताकातील अधिकृत फौजदारी संहिता आहे. भारतीय दंड संहिता ( IPC ) ची जागा घेण्यासाठी डिसेंबर 2023 मध्ये संसदेने पारित केल्यानंतर 1 जुलै 2024 रोजी ते अंमलात आले, जे ब्रिटिश भारताच्या काळातील होते.
हे पण वाचा:
1 thought on “पहिल्या पतीपासून मुले, सावत्र बापाला कळताच पत्नीला व मुलाला बेदम मारहाण, 4 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. ठाण्यातील धक्कादायक घटना”