Vasubaras Wishes व्हाट्सएप, इंस्टाग्राम आणि फेसबुक स्टेटस
Vasubaras Wishes in Marathi 2024 वसुबारस, दिवाळीची सुरुवात म्हणून, अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला गायी आणि वासरांसाठी भक्तिभावाने साजरी केली जाते. यावर्षी वसुबारस सोमवार, 28 ऑक्टोबर रोजी येते. या शुभ दिवशी, लोक गाईंच्या पालनपोषणाच्या भावनेचा सन्मान करतात, समृद्धी आणि कल्याण दर्शवतात.
तुमच्या प्रियजनांसोबत व्हाट्सएप, इंस्टाग्राम आणि फेसबुक स्टेटसवर शेअर करण्यासाठी मराठीत वसुबारसच्या काही हार्दिक शुभेच्छा:
मराठीत वसुबारस शुभेच्छा:
“गोमातेचं पूजन, शुभ वसुबारस! ह्या दिवाळीच्या दिवशी आपल्याला सुख-समृद्धी लाभो. शुभ वसुबारस!”
“गाय-वासरांचा हा दिवस, आई प्रमाणे आदर आणि प्रेमभावना. वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!”
“दिन दिन दिवाळी, गाय-बैल ओवाळी, ज्याच्या त्याच्या गाय-बैल, माझ्या मामाचे गाय-बैल. शुभ वसुबारस!”
“गाय-वासरांची सेवा करणे म्हणजे दैवी कार्य आहे. वसुबारसच्या शुभेच्छा, दिवाळी आनंदात साजरी करा!”
गाई आणि वासरांचा सन्मान करून आणि दिवाळीचा पहिला दिवा लावून वसुबारस साजरी करा, आनंद आणि समृद्धीची सुरुवात करा. वसुबारसच्या शुभेच्छा!
पशु हे धन मानून गाय व वासराच्या नात्यातील निखळता, कृतज्ञता, शुद्धता हे गुण स्मरण्याचा दिन वसुबारस गोवत्स द्वादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला, स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया, नमस्कार त्या दिव्य गो देवतेला… वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची वसु बारस म्हणजे पूजा धेनु वासराची दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसनिमित्त मंगलमय शुभेच्छा…
स्नेहाच्या दिव्यात तेवते वात तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनु वासराची.. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त मंगलमय शुभेच्छा!
गोमातेला सांगू आपली गाऱ्हाणी, दुध-दुभत्याची सदा व्हावी वृद्धी, व्हावी कृपा, नांदावी रिद्धीसिद्धी, गोवत्स पूजनाने लाभावी समृद्धी ! दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस निमित्त, आपणांस व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
दारी सजले तुळशी वृंदावन, त्यासवे होई कामधेनूचे पूजन, गोमातेच्या उपकारांचे करुणा स्मरण, साजरा करूया वसुबारस हा सण, वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा
दिवाळीचा पहिला सण, ही दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुख, समृद्धीची व भरभराटीची जावो. वसुबारसनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
गाय आणि वासरांच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता आणि समृद्धी हे सर्व आपणास लाभो…वसुबारसच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवस कृतज्ञता व्यक्त करण्याचा, गाय अन् वासराच्या वात्सल्याचा…! वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या दिवाळीसाठी कन्फर्म केलेले ट्रेन तिकीट कसे मिळवायचे IRCTC च्या विकल्प योजनेबद्दल जाणून घ्या
Samsung One UI 7 Update: Full List of Eligible Galaxy Devices