धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल [2024] | Thank you for Birthday Wishes in Marathi

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल Thank you birthday wishes in marathi

आपल्या प्रती भावना व्यक्त करणारी व्यक्ती आपल्यावर प्रेम, माया करीत असते. प्रेम करणारी, काळजी करणारी व्यक्ती प्रत्येक वेळेस आपल्या भावना व्यक्त करत नाहीत. परंतु, आपल्या जीवनातील एखाद्या खास क्षणी ती व्यक्ती आपल्यावरील प्रेम व्यक्त करून इच्छीते.

मग ते शुभेच्छा देऊन, भेटवस्तू देऊन किंवा प्रत्यक्ष गाठ-भेट घेऊन. अशा आपल्या प्रियजनांना आपणही आपले नाते अधिक घट्ट होण्याच्या दृष्टीने आपुकीने आभार मानने गरजेचे असते. त्याने नात्याची वीण अधिक घट्ट होते.

Marathipost.in च्या मदतीने घेऊन आलो आहोत तुमच्या साठी धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल, वाढदिवस आभार मराठी , आभार मेसेज, Vadhdivas Aabhar, Thank you for birthday Wishes in Marathi, Reply for Birthday Wishes in Marathi.  चला तर मग तुम्हाला दिलेल्या शुभेच्छांसाठी खालील आभार संदेश पाठवून आभार व्यक्त करू शकता.

आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल | Thank you For Birthday Wishes in Marathi

वाढदिवस आभार Marathi

 • व्हॉट्स अपच्या दुनियेतील संदेशापेक्षा तुम्ही दिलेली मला वाढदिवसाची वैचारिक भेट फारच अमूल्य आहे. माणसामाणसातील ओढ आपल्यातील कायम आहे. अशीच आपुलकी राहू द्या. मला वाढदिवसाबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार.
 • आपल्या कार्यालयातील बदलली सर्व माणसे, बदलले सर्व माहोल, तरीही आपल्यातील आपुलकी मात्र कायम आहे. माझ्या जन्मदिनी तुमच्या लाभलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास आहेत. वाढदिवसाबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार.
 • माझ्या वाढदिवशी तुम्ही दिलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद!. तुम्ही माझा वाढदिवसाचा खास दिवस आणखी खास बनवलात.
 • ज्यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे खूप आभार. कालचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता आणि तुम्हीं त्या खास दिवसाचा महत्त्वाचा भाग होता.
 • तुमच्यासारखे मित्र मिळाल्याबद्दल मी मला खूप धन्य समजतो. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद!. 
 • माझ्या चेहऱ्यावर जे काही हसू आहे, ते तू मला पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांमुळे आहे. याचा अर्थ माझ्यासाठी तुमच्या शुभेच्या खूप मोलाच्या आहे, सर्वांचे खुप खूप आभार.
 • तुझ्या वाढदिवसाच्या संदेशाने माझा वाढदिवस आणखी खास बनवला. मला आनंद झाला की तु माझा वाढदिवस लक्षात ठेवला तुझे मनापासून आभार.
 • माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही माझ्या वाढदिवसा साठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद! म्हणणे ही छोटी गोष्ट आहे, पण तरीही तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.
 • माझ्या आयुष्यातील हे नवीन वर्ष तुमच्या शुभेच्या शिवाय अपूर्ण राहिले असते. तुम्ही सर्वजण माझे मित्रपरिवार आहात याबद्दल मी खूप आभारी आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.
 • माझ्या वाढदिवशी तू नाही आलास, पण तुझ्या शुभेच्छा माझ्या पर्यंत पोहचल्या. मी तुझा ऋणी आहे, खूप खूप धन्यवाद!.
 • आपण सर्वांनी मिळून माझ्यावर जो शुभेच्छांचा वर्षाव केला आहे त्याने मी पूर्णत: ओथंबून गेली आहे. आपलं प्रेम असच राहो, हीच प्रार्थना. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्यात त्याबद्दल आभारी आहे. 
 • प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या शुभेच्छांद्वारा तुम्ही जे प्रेम, स्नेह मला दाखवलत त्यासाठी मी शतश: ऋणी आहे
 • माझा जन्मदिन इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केला की मी तो कधीच विसरु शकत नाही. मी भारावूवन गेलो आहे. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्यात त्याबद्दल आभारी आहे. 
 • तुमच्यासारखे सहकारी मला लाभले याचे मी भाग्य समजते. कामातील आणि वैयक्तीक आयुष्यातील प्रत्येक क्षणी आपली लाभलेली साथ मोलाची आहे. आपण दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • ऑफीसच्या व्यस्त कामातूनही वेळ काढत तुम्ही माझा वाढदिवस साजरा केलात, मला भरभरून शुभेच्छा दिल्यात हे मी कधीच विसरणार नाही. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्यात त्याबद्दल आभारी आहे. 

Also Read: मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes for friend in marathi

मैत्रिणींनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार | Thanks for Birthday Wishes in Marathi

धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल

 • माझ्या लबाड मैत्रिणींनो, तुमचं हसणं खिदळणं माझ्यासाठी अमृत का प्याला है, तुमच्या शुभेच्छांनी आणि भेटवस्तू नेहमी अधिकच तरुण झालेले आहे तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार!
 • लहानपणी खेळलेला भातुकलीचा खेळ मला अजूनही तसाच आठवतो आपल्या दोघींच्या भांडणात तिसऱ्याने घेतलेली मज्जा आपल्या दोघींचा राग मिटवून जाई. माझा वाढदिवस न विसरताच मला शुभेच्छा देतेस त्यासाठी तुझे आभार!
 • दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाची वाट पाहत असते कारण तुमच्या शुभेच्छा आणि तुमचं माझ्यासाठीच सरप्राईज गिफ्ट तुमच्यामुळे माझा वाढदिवस खऱ्याखुऱ्या अर्थाने साजरा होतो. शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद!!
 • माझ्या वाढदिवसासाठी तू केलेली कविता म्हणजे आठवणींचा उजाळा आहे तुझ्या शुभेच्छांमुळेच माझा दिवस अविस्मरणीय झालेला आहे प्रिय मैत्रिणी शुभेच्छांसाठी धन्यवाद!
 • न विसरता तुम्ही सगळ्याजणी माझ्या वाढदिवसाचे प्लॅनिंग करता आणि मला खुश करता त्यासाठी मी तुमची शतशः ऋणी आहे सेलिब्रेशन साठी आणि शुभेच्छा साठी आभारी आहे
 • तू दिलेला टेडीबिअर आणि तुझ्या शुभेच्छा तुझ्या इतक्याच गोड आहेत, तुझ्यासाठी पाणीपुरीची ट्रीट बाकी आहे शुभेच्छांसाठी मनापासून आभारी आहे.
 • मैत्रीण हवी तर तुझ्यासारखी जी मनकवड्यासारखं सार समजून घेते. तुझ्याशिवाय मला समजून घेणारं कुणी नाही. माझ्या वाढदिवसाला तू दिलेली भेट मी कधीच विसरणार नाही. प्रिये, त्यासाठी मनापासून धन्यवाद!. 
 • केक कापायला आली नाहीस म्हणून रागावले होते, पण तुझ्या हृदय जिंकणाऱ्या शुभेच्छेने तुझ्यावरचा राग गिळला. सखे, तुझ्या शुभेच्छा माझ्यासाठी महत्त्त्वाच्या आहेत. मनापासून तुझे आभार.
 • माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी तू कधीच सोडत नाहीस. माझ्या आयुष्यात आनंदाचा वर्षाव करण्यात तू कमी नसतेस. तुझ्या शुभेच्छांनी माझा दिवस खूप छान गेला. त्यासाठी तुझे खरंच मनापासून आभार.
 • तुझ्यासारखी मैत्रीण मिळण्यासाठी भाग्य लागतं. जे मला मिळालं आहे. तुझ्या प्रेमळ विचारांची बरसात माझ्यावर करत रहा. कालच्या तुझ्या दिलखेच शुभेच्छांसाठी तुझे खूप आभार.

बहिण भावांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार | Birthday Thank you Message Marathi

 • तुम्ही दिलेली भेटवस्तू आणि भेटकार्ड पाहून मन आठवणींच्या हिंदोळ्यात रमत गेलं, वर्षानुवर्ष माझ्यावरचं प्रेम तुमचं असाच वाढत राहो तुमच्या शुभेच्छांसाठी आभार
 • ताई आणि दादा तुम्ही दिलेले प्रत्येक भेट कार्ड मी आजही जपून ठेवलेल आहे. माझ्या हॉस्टेलच्या जीवनात तुमच्या शब्दांचा खूप मोठा आधार आहे. न चुकता मला वाढदिवसा दिवशी शुभेच्छांचा वर्षाव करता, पण या वेळच्या शुभेच्छांनी माझं वर्ष सुंदर जाईल. खूप खूप आभार.
 • तुमच्या शुभेच्छांपेक्षा तुम्ही माझ्या आयुष्यात असण हे माझ्यासाठी खास आहे. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्यात त्याबद्दल आभारी आहे. 
 • धन्यवाद! मानून मला तुमचा राग ओढवून घ्यायचा नाही. पण दादा तुझ्या संस्कारात मी मोठा होतोय.  तुम्ही माझ्यासाठी शुभेच्छा देऊन माझा दिवस खूप सुंदर केलात. त्यासाठी तुमचे खूप आभार. 
 • तुम्ही दिलेल्या मजेशीर शुभेच्छा माझ्या कायम लक्षात राहतील. अशाच गंमतीशीर शुभेच्छा पाठवत रहा आणि माझा दिवस सुंदर करत रहा, तुमच्या शुभेच्छांसाठी आभार
 • तुमचं प्रेम आणि आपुलकी माझ्या मनात कोरली आहे. तुमच्या शुभेच्छांनी ती फुलली आहे. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्यात त्याबद्दल आभारी आहे. 
 • आभार मानून मला तुम्हांला परक करायचं नाहीय, तुम्ही माझी माणसं आहात. आपल्या नात्यातील गोडवा असाच राहो. तरीही छान शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद!.
 • शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला. खरेच आपण वेळात वेळ काढून मला शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार. 
 • चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या पाठीशी तुम्ही नेहमी उभे राहता. आपला स्नेह मी जाणतो. तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी ऊर्जा आहेत. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्यात त्याबद्दल आभारी आहे. 
 • माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा, असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत, धन्यवाद!!

Also Read: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi

वाढदिवसानिमित्त आई वडिलांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार | Birthday Aabhar in Marathi

 • तुमचे आभार काय मानणार मी, तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या शुभेच्छा म्हणजे माझे आशीर्वादच आहेत. असंच माझ्यावरती प्रेम करत रहा ,प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव करत रहा. आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार. 
 • माझ्यासारख्या वात्रट मुलाला तुम्ही सांभाळता हीच खूप मोठी गोष्ट आहे, माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करताय मला अजून काय हवं ? मला दिलेल्या शुभेच्छांसाठी मी तुमचा शतशः आभारी आहे.
 • माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही मला नवीन नवीन भेटवस्तू देता आता तुमच्या वाढदिवसाला भेटवस्तू देण्याकरता मी सक्षम झालेला आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणार, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!
 • जन्मदात्यांनीच दिलेल्या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच. असंच प्रेम माझ्यावर करत रहा. शुभेच्छांसाठी आभार.
 • मी काय तुमचे आभार मानणार, मी तुमचा ऋणी आहे तुमच्या शुभेच्छा म्हणजे माझ्यासाठी जॅकपॉट आहे. भरभरून प्रेम माझ्यावर करत रहा. शुभेच्छांसाठी आभार.
 • चातकाप्रमाणे वाट पाहणारा मी तुमच्या शुभेच्छा आल्यावर तृप्त होतो, मन सुखावून जाते तुमच्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार.
 • शुभेच्छा देण्यात तुमच स्थान अव्वल तर आहेच, शिवाय माझ्या हृदयातही ते उच्चपदावरतीच आहे तुमच्या शुभेच्छांनी आपलं नातं अधिक घट्ट होत आहे खूप खूप आभार
 • तुम्ही माझं दैवत आहात तुम्हीच माझे विश्व आहात माझा वाढदिवस तुम्ही ज्या पद्धतीने साजरा करता तुम्हाला साठी अवस्मरणीय असतो मला अजून काय हवं तुमच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार
 • आई बाबा, या तुमच्या लाडोबा तुम्ही दिलेल्या शुभेच्छा मनापासून आवडल्या. तुमच्या प्रेमाच्या वर्षात भिजायला मला नेहमीच आवडतं तुमच्या लाडोबा कडून खूप खूप आभार
 • आई तुझा धपाटा आणि बाबांचा ओरडा मला काही नवीन नाहीये पण माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छांनी मात्र मला खूप  आनंदित केलं मनापासून धन्यवाद!.
 • तुमच्या शुभेच्छा मला आभाळाएवढ्या मोठ्या वाटता. त्यातून ओथंबून वाहणारं तुमच प्रेम मला कायमच दिसत. अशीच प्रेमाची बरसात करा. तुमच्या शुभेच्छांसाठी मनापासून आभार.
 • रात्रीचे १२ वाजण्याची घंटा आणि अगदी त्याच ठोक्याला येणाऱ्या तुमच्या शुभेच्छा म्हणजे माझा जन्म दिवस उत्साहित जातो. तुमच्या शुभेच्छांनी नवचैतन्य लाभत. तुमच्या शुभेच्छांसाठी आभार. 
 • तुमच्या शुभेच्छा म्हणजे नव ऊर्जा नवचैतन्य. उत्साहाने दिवसाची सुरुवात, वर्षभराची शिदोरी खूप काही देऊन जातात असेच पाठीशी राहा अजून काय म्हणून तुमच्या शुभेच्छांसाठी मनःपूर्वक आभार
 • तुमच्या शुभेच्छांनी माझ्या जन्मदिनाची सुरुवात होते. प्रत्येक जन्मदिनी तुमचे विचार मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या आजच्या विचारांवर चालण्याचा माझा प्रयत्न नक्कीच असणार आहे आई बाबा तुमच्या शुभेच्छा साठी खूप खूप धन्यवाद!
 • इतर भेटवस्तूंपेक्षा मला तुमच्या शुभेच्छा जास्त भावतात. सुसंस्कारीत विचार माझी जडणघडण करत आहेत. माझ्या वयासोबत तुमच्या विचारांची देखील व्याप्ती वाढत आहे. असाच माझा वाढदिवस साजरा करत रहा, त्यासाठी तुमचे खूप आभार.

Also Read: निरोप समारंभ शुभेच्छा | Farewell Quotes in Marathi

आजी-आजोबांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार | Dhanyavad Marathi Thank you

 • आजी माझ्यापेक्षाही तुझ्या सर्व इच्छा पुर्ण होवोत, तुझ्यासारखी आजी प्रत्येकाला मिळावी हीच सदिच्छा. तुझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असाच माझ्यावर राहू दे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • तुम्ही नेहमी आनंदी राहावे तुमचे आशीर्वाद मला मिळावेत एवढीच माझी इच्छा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • आजी आज तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आठवतो आहे. मला तुझाच नातू असण्याच कौतुक आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • माझ्यावर ज्यांनी चांगले संस्कार केले ते माझे आजी आजोबा. आज तुम्ही माझ्यावर गोड गोड पाप्यांचा आणि शुभेच्छांचा वर्षाव केलात. त्यासाठी मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. 
 • आजी – आजोबा तुम्ही दोघांनी मला  योग्य मार्ग, योग्य विचार आणि चांगले संस्कार केलेत. आज तुमच्यावर विचारांवर मी चालतो आहे. मला न विसरता शुभेच्छा पाठवल्यात त्यासाठी मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे. 
 • घरचे रागावले की तुम्ही दोघे त्यापासून आमचा बवाच करायचा. आज तुमच्या शुभेच्छा वाचून पुन्हा ते दिवस आठवले. न विसरता तुम्ही मला शुभेच्छा पाठवल्या त्यासाठी मी तुमचा मन:पूर्वक आभारी आहे.
 • आजोबा, तुम्ही माझ्यासाठी  देवळात जाऊन  प्रार्थना केलीत. न चुकता वाढदिवसाला मला शुभेच्छा पाठवल्यात त्यासाठी मी तुमचा मनपूर्वक आभारी आहे.
 • माझ्या प्रेमळ आजी-आजोबांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा दिवस खूप चांगला गेला आहे. न चुकता वाढदिवसाला मला शुभेच्छा पाठवल्यात त्यासाठी मी तुमचा मन:पूर्वक आभारी आहे.
 • आजी तू सांगायचीच आणि बाबा नकला करायचे. तुमच्या गोष्टींमधून माझ्यावर चांगले संस्कार व शिकवण मिळाली. असच प्रेम आणि कौतुक रहा. तुम्ही पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • पैशाने तू कधीच कोणती गोष्ट विकत घेऊन दिली नाहीस. वैचारिक मेवा तू मला देत आलीस. वाढदिवसानिमित्त तू दरवर्षी एक संकल्प करायला लावतेस. आज तुझ्यामुळेच मी आहे. आजी, तू दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास आहे. मनापासून धन्यवाद!. 

वाढदिवसानिमित्त काका काकूंनी दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार

 • आयुष्यात तुमची लाभलेली साथ लाखमोलाची आहे म्हणून मी आज माझ्या पायावर भक्कमपणे उभा आहे काका काकू तुम्ही दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार
 • तुम्ही माझ्यासाठी दैवत आहात. माझा वाढदिवस न विसरता तुम्ही साजरा करता काका काकू खूप खूप आभारी आहे
 • माझ्या खरोखर आई-वडिलांनंतर तुमचं स्थान मोलाच आहे. तुम्ही मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे म्हणजे खूप काही आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद!
 • आयुष्याच्या योग्य वळणावर मला तुमची योग्य साथ मिळाली तुमच्या दोघांचेही मार्गदर्शन मला मुलाचे आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आभार
 • न विसरता मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात मला अजून काय हवं तुम्हा दोघांचे खूप खूप आभार
 • काका काकू तुमच्या छत्रछायेखाली वाढलेला मी तुम्हाला कधीच विसरणार नाही. माझ्या वाढदिवसासाठी तुम्ही बनवलेला केक सुंदर होता. तुम्ही दिलेल्या खास शुभेच्छांसाठी खूप खूप आभार
 • माझा वाढदिवस आणि तुमच अन्नदानमला खूप काही शिकवून जातं.  तुम्हाला माझंही आयुष्य लाभो तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आभार
 • तुम्ही दिलेल्या माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा लाखमोलाच्या आहेत. काका काकू तुमचे  आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहोत. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. शुभेच्छांसाठी धन्यवाद!
 • तुमच्या शुभेच्छांमुळे माझा दिवस उत्साही केलेला आहे सुंदर गेलेला आहे. ते माझ्यासाठी ऊर्जा समान आहेत. असेच पाठीशी राहा शुभेच्छांसाठी आभार
 • काका, माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा. असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहूदेत धन्यवाद!.
 • मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखे अप्रतिम कुटुंब आहे. शुभेच्छा दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद!.
 • काकी, तुमचे अमूल्य शब्द नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील. मुलासारखा माझ्यावर प्रेम करता. आभार काय मानणार मी तरीही खूप खूप धन्यवाद! .
 • या जगात मला तुमच्या शिवाय दुसरं कोणीही नाही. तुम्हीच माझा विश्वा आहात तुम्ही दिलेल्या शुभेच्छा मला आशीर्वाद सारखे आहेत त्यासाठी खूप खूप आभार.

Also Read: Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

फेसबुक मित्रमैत्रीणींनी पाठवलेल्या शुभेच्छांसाठी आभार 

 • सोशल मिडीयावरील आपली मैत्री इलेट्रॉनिक माध्यमांतील जरी असली तरी आपली मैत्री घट्ट आहे, हे आपण मला दिलेल्या शुभेच्छांमधून जाणवले. अशीच आपुलकी राहू द्या. तुम्ही पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • आपण दिलेल्या शुभेच्छांचा मी मनःपूर्वक मनापासून स्वीकार करतो असेच आशीर्वाद माझ्यावर राहू देत ही देवाकडे प्रार्थना करतो. आपल्या शुभेच्छा मला नेहमीच आठवणीत राहतील. असेच प्रेम माझ्यावर राहु देत. तुम्ही पाठवलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी खूप आभारी आहे. 
 • ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो असेच आशीर्वाद माझ्यावर राहूदेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 • शुभेच्छा वाचून मी भावूक झालो इतक्या हृदयात बसणाऱ्या आहेत. या  अद्भूत शुभेच्छांबद्दल, माझ्या सर्व मित्रांचे मनापासून आभार.  माझ्यावर एवढे प्रेम केल्याबद्दल आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद! 
 • माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र, आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे
 • आपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे असेच आपले प्रेम आमच्यावर राहो हीच मनी सदिच्छा तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच खूप सुंदर होत्या  हा वाढदिवस माझ्या नेहमीच लक्षात राहील
 • फेसबुकवरील आपलं नातं  ऑनलाईन पुरतं तरी असलं तरी, मैत्री आपली निखळ आहे. माझ्या वाढदिवसा निम्मीत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल  तुमचे सर्वांचा आभार व्यक्त करतो माझ्या जन्मदिनी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार  असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 • आजच्या सोशल मिडीयाच्या जगातही माणसं न भेटता एकमेकांचे चांगले मित्र होऊ शकतात हे आपण काल पाठवलेल्या शुभेच्छांमधून मला समजलं. कुणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल की तुमच्यासारखी जिवाभावाची  माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार.
 • आयुष्याच्या या वाढत्या वयाच्या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या मैत्रीचा बहर मला सुखावत आहे. तुमच्या सारख्या हितचिंतकांच्या शुभेच्छा मनात नवी उमेद निर्माण करतात. माझ्या जन्मदिनी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार असेच प्रेम माझ्यावर राहू देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 
 • फेसबुकवरील चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती आहात. माझ्या जन्मदिनी मला आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार.
 • फेसबुकवरील मैत्री फार काळ टिकत नाही असे म्हणतात. पण वर्षानुवर्षे माझ्या वाढत्या वयाला आपण न चुकता शुभेच्छा देता याचे मला कौतुक वाटते. तुमच्यासारखी चांगली  माणसं कमावली. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून आभार!
 • एकमेकांना न भेटताही  आपण एकमेकांचे चांगले मित्र आहोत. मी जर आयुष्यात काही कमावले असेल ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं ! आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार ! 
 • वाढत्या तंत्रज्ञानामुळे मोबाईल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटतोय. पण तेही महत्त्वाचे आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन तुम्ही माझा दिवस अधिक चांगला बनविला आहे. आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल धन्यवाद!!
 • माझा आनंद द्विगुणित केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार !आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे. आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन मनापासून धन्यवाद!!
 • वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,आशिर्वाद दिले, त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.!असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा धन्यवाद!!
 • आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे मी व्यक्त करू शकत नाही.  तुमच्या व्यस्त जीवनातून आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या  हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो!
 • आपली मैत्री ठरवून देखील विसरता येत नाही. आपल्या शुभेच्छांमुळे माझा जन्मदिन अधिक चांगल्या प्रकारे खुलून गेला. असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद!!

Also Read: भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes for Brother in Marathi

खास मित्राने दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार

 • तुझं माझं भांडण थोडक्यात मिटवलंस आणि माझा वाढदिवस आनंदात साजरा केलास, मित्रा काय सांगू तुला खूप आनंद झाला . वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार
 • काल दणक्यात माझा वाढदिवस सेलिब्रेट केलास.  खूप आनंद झाला. मित्रा तू दिलेल्या शुभेच्छांसाठी खूप खूप आभार
 • माझे तुझ्यातले गैरसमज लवकर  मिटवलेस  तू आहेसच तसा गुणी, मित्रा तुझ्या शुभेच्छासाठी आभार
 • मी तुझ्यासाठी खूप खास आहे हे तू दिलेल्या शुभेच्छा वरूनच मला समजले अजून जास्त काय लिहू शुभेच्छांसाठी आभार
 • नात्यातली सही झालेली गुंफण तुझ्या शुभेच्छांनी  घट्ट केलीस यातच सर्व आलं शुभेच्छांसाठी धन्यवाद!
 • तू दिलेला शुभेच्छा मधले शब्द जरी महत्त्वाचे नसले तरी तुझ्या भावना महत्त्वाच्या आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी आभार
 • कायम लक्षात राहतील असे तु क्षण मला दिले आहेस वाढदिवसही साजरा केलास तू दिलेल्या शुभेच्छांसाठी आभार.
 • मैत्रीपेक्षाही माणुसकी जपणारा तू खासच आहेस तू दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी लाखमोलाच्या आहेत शुभेच्छांसाठी धन्यवाद!
 • कालच्या मैफिलीतील तुझे बोल अजूनही कानात  गुंजत आहेत . मित्रापेक्षा माणूस म्हणून तू नेहमी उजवा आहेस. तू दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी खास आहेत त्यासाठी आभार
 • तुझ्या  येण्याने मैफिलीत बहार आली. तुझ्यावरचा रुसवा सोडण्यास  तूच मदत केलीस. मित्रा, तू दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद!.

आपल्या प्रियजनांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांना उत्तर देतानाचे हे आभार संदेश तुम्हाला नक्कीच आवडले असतील. मग वाट कसली बघताय? तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत हे सर्वोत्तम मॅसेजेचचं हे ठिकाण नक्की शेअर करा.. त्यांनाही त्यांच्या भावना शब्दात मांडलेल्या पाहून नक्कीच छान वाटेल.

इथे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि प्रत्येक नात्यासाठीच्या भावना शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत. यांचा नक्की आनंद घ्या आणि तुमच्या नम्र भावना धन्यवाद संदेश, धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल , Thank you for birthday wishes in Marathi,  आभार वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल तुम्ही तुमच्या मित्रपरिवारापर्यंत, नातेवाईकांपर्यंत, भाऊ बहिणींपर्यंत पोहोतवा…

Also Read:

Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes from Daughter to Father in Marathi

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Sister in Marathi

Sharing is caring

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top