हज यात्रेपूर्वी सौदी अरेबियाचा मोठा निर्णय: भारतासह 14 देशांवर वीजा बंदी, यात्रेवर काय परिणाम होणार?

Sourabh Patil

Saudi Arabia

Saudi Arabia सौदी अरेबियातील मक्का हे इस्लाम धर्मीयांसाठी सगळ्यात पवित्र धार्मिक स्थळ आहे. प्रत्येक मुस्लिमाने आपल्या आयुष्यात एकदा तरी मक्केला जाऊन हज यात्रा करावी असा धर्मशास्त्रीय नियम आहे. दरवर्षी लाखो मुस्लिम भाविक जगभरातून आणि भारतातून हज यात्रेसाठी मक्केला जातात.

2025 मधील हज यात्रा जून महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, या यात्रेपूर्वीच सौदी अरेबियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सौदी सरकारने भारतासह 14 देशांवरील नागरिकांसाठी काही वीजा प्रकारांवर बंदी घातली आहे. ही वीजा बंदी 13 एप्रिलपासून हज यात्रा पूर्ण होईपर्यंत म्हणजेच जूनच्या मध्यापर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे हज यात्रेपूर्वी भारतीय भाविकांमध्ये चिंता वाढली आहे.

कोणत्या देशांवर बंदी?

सौदी अरेबियाने भारत, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, इजिप्त, सुदान, जॉर्डन, इराक, इथियोपिया, नायजेरिया, अल्जेरिया, ट्युनेशिया, यमेन आणि मोरक्को या 14 देशांवरील नागरिकांसाठी उमराह, बिझनेस आणि फॅमिली वीजा बंदीची (Hajj Visa Ban) घोषणा केली आहे. मात्र, हज वीजा आणि डिप्लोमॅटिक वीजावर बंदी नाही.

हा निर्णय का घेतला?

Hajj pilgrimage Visa ban हजच्या काळात काही लोक उमराह, फॅमिली किंवा बिझनेस वीजाचा वापर करून हज यात्रेला जातात. यामुळे हजच्या वेळेस मक्केमध्ये अत्यंत मोठी गर्दी होते. 2024 मधील हज यात्रेवेळी हीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. उसाच्या प्रचंड तापमानामुळे उष्माघाताने जवळपास 1200 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यात 98 भारतीयांचा समावेश होता. त्यामुळेच सौदी सरकारने अशा अनधिकृत प्रवाशांना रोखण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी ही तात्पुरती बंदी घातली आहे.

हज यात्रेसाठी कसे अर्ज करायचे?

हजला जाण्यासाठी (hajj application) हज कमिटी ऑफ इंडियामध्ये ऑनलाईन अर्ज करावा लागतो. त्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत:

  • पासपोर्टचा स्कॅन फोटो
  • आधार कार्ड
  • 12 वर्षांपेक्षा जास्त वय

सरकारी हज यात्रेच्या तुलनेत खाजगी टूर ऑपरेटर्सद्वारे जाणं महागडं ठरतं. सरकारी माध्यमातून जाणाऱ्यांना 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो, तर खाजगी ऑपरेटरद्वारे 5 लाखांपर्यंत खर्च होतो.

Saudi Arabia हज यात्रेची प्रक्रिया कशी असते?

हज यात्रा ही 40 दिवसांची असते. यातले सुरुवातीचे 10 दिवस मदीना शहरात घालवले जातात. हजमध्ये काही विशेष धार्मिक विधी पार पाडले जातात – जसे की: काबाभोवती सात वेळा प्रदक्षिणा (तवाफ) घालणे. सैतानाच्या प्रतीकात्मक भिंतीवर दगड फेकणे. प्राण्यांचा बळी देणे (ईद-उल-अजहा). झमझम पवित्र पाण्याचे सेवन करणे इत्यादी. हजमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक गटासोबत एक गटनेता असतो जो नियोजन आणि नियमांचे पालन करतो.

यंदाच्या हज यात्रेची माहिती hajj 2025 dates

  • यात्रेची सुरुवात: 3 जून 2025 पासून
  • भारतातून भाविकांचे प्रस्थान: 29 एप्रिल ते 30 मे दरम्यान
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 सप्टेंबर 2024

हे लक्षात घ्यायला हवे की, वीजा बंदी ही फक्त उमराह, बिझनेस आणि फॅमिली वीजावर आहे, हज वीजावर नाही. त्यामुळे ज्यांनी वेळेत हजसाठी अर्ज केला आहे, त्यांना नियोजित वेळेनुसार यात्रा करता येणार आहे.

सौदी अरेबियाने घेतलेल्या या निर्णयामुळे हज यात्रेच्या व्यवस्थापनात शिस्त येईल, गर्दी कमी होईल आणि भाविकांची सुरक्षितता राखली जाईल. तरीसुद्धा या निर्णयाचा संपूर्ण प्रभाव येत्या काळात स्पष्ट होईल.

Leave a Comment