Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा [2023]

लग्नातील आठवणी या  प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतात.. लग्नगाठ बांधतानाचे क्षण आठवण्याची एक सुवर्ण संधी म्हणजे लग्नाचा वाढदिवस. या दिवशी तुमच्या नात्यांना अधिक मजबूत बनवा… नवरा बायकोंनी एकमेकांना Marriage Anniversary Wishes in Marathi, लग्नाच्या वाढदिवासाच्या शुभेच्छा पाठवून नातं अधिक स्पेशल बनवा.

मुलांनी आपल्या आईवडिलांना लग्नाच्या वाढदिवासानिमित्त शुभेच्छा, Happy Anniversary Mom &Dad in Marathi, देऊन ते तुमच्यासाठी किती स्पेशल आहेत याची जाणीव करुन द्या. Happy Marriage Anniversary dada – Vahini, ….Kaka kaku Marriage Anniversary,  तुम्ही त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची त्यांना जाणीव करुन द्या… आमचे Marathipost.in हे संकेतस्थळ तुमच्या नात्यांना अधिक मजबूत करण्यासाठी नेहमीच नवनवीन शुभेच्छा पोस्ट घेऊन येते. नाती अनमोल असतात, त्याबद्दलच्या भावना व्यक्त करणारे शब्दही तितकेच महत्त्वाचे असतात… म्हणूनच तुमच्या भावनांना शब्दबद्ध करुन आम्ही देत आहोत… या शब्दशुभेच्छांमधून तुम्ही तुमच्या नात्यांना अधिक मजबूत बनवा….

Table of Contents

Marriage Anniversary Wishes in Marathi By Husband | नवऱ्याकडून बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

      1)  तू सोबत आहेस म्हणून हा संसार सुंदर आहे

          तुझ्यासोबत प्रिये अखंड जीवन सुंदर आहे

         प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

   2)  नशीब माझं चांगलं म्हणून तू आयुष्यात आलीस

        संसार माझा सुखाचा करून मैत्रिची साथ दिलीस

        माझ्या अर्धांगिनीस लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

  3) आपलं नातं सगळ्यात सुंदर

कितीही रागावलीस तरी अबोला मात्र क्षणभर

माझ्या प्रिय पत्नीस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

4) तुझे नितळ प्रेम दिवसागणिक वाढतच जातं

तुझ्या असण्यामुळेच तर माझं मन प्रफुल्लीत होतं

माझ्या प्रिय बायकोस लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

5) आवड तुझी माझी अगदीच वेगळी आहे

मी पुर्व तर तू पश्चिम आहेस

तरीही आपला संसार स्वर्गाहून सुंदर केलास

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

6) मी कुठेही असलो तरी माझं मन तुझ्याकडेच ओढ घेतं

घरात आल्यावर मात्र मन शांत होतं..

तुझ्या सहवासात स्वर्गाहून सुंदर वाटतं

माझ्या प्रिय पत्नीस लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7) तू रुसलीस की माझं संपुर्ण जग रुसतं

तू हसलीस की माझं संपुर्ण जग हसतं

आपण सुरु केलेला संसाराचा प्रवास अधिक सुंदर करू

तू फक्त सोबत रहा

प्रिय बायको तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

8) वावर तुझा घरातला नेहमीच बोलका असतो

तुझ्यामुळेच तर हा संसार मला सोपा वाटतो

प्रिय अर्धांगिनी तुला लग्नाच्या वाढदिवासाच्या हार्दिक शुभेच्छा!

9) जशी शिवासह पार्वती, जशी विष्णूसह लक्ष्मी

तशीच तू माझ्यासाठी माझी अर्धांगिनी

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

10) विश्वासाचे नाते कधीची कमकुवत नसते

मनमोकळ्या स्वभावाने ते अधिक मजबूत करायचे असते

तुझा माझा स्वभाव जसा मोकळा ढाकळा आहे

असंच आपण एकमेकांना आयुष्यभर जपायचे असते

प्रिय पत्नीस लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Also Read: मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes for friend in marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi For Wife | बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) प्रिय सखे तू आहेस म्हणून आपला संसार सुखाचा आहे

तुझ्या असण्यात माझं जग आहे

आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायको तुला खूप खूप शुभेच्छा!

2) जीवनभर तूझी साथ लाभो हिच मनोकामना

चंद्र तारे आणेन तुझ्यासाठी तू फक्त सांगना

लाडक्या बायको आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3) तू आहेस म्हणून माझ्या संसाराला अर्थ आहे

तुझ्याविणा हे सगळेच व्यर्थ आहे…

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

4) सोबत तुझी आहे म्हणून…मी बिनधास्त आहे

संसार आणि मुलांना तुझ्याकडेच सोपवीले आहे

चिंता नाही कसली, तू सोबत असताना

सांग सखे काय देऊ लग्नाच्या वाढदिवसाला…

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

5)  उधाण वारा सैरेवैरा तुझेच गाणे गात राहतो

तुझ्या पाणेरी डोळ्यांमध्ये मी माझे प्रतिबिंब पाहत राहतो

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

6) आजचा दिवस खास आहे कारण आज मी एका वाघिणीला घरी आणलं

माझा सांभाळ करायला…

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

7)  सोपं झालं जगणं जेव्हा तूझी साथ लाभली

तू होतीस म्हणून मी आयुष्यात यशस्वी झेप घेतली

संसार करु सुखाचा.. मोठ्यांच्या आशिर्वादाने

आपली जोडी सुखी राहो इतकेच देवाकडे मागणे

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

8) मैत्रिण जेव्हा बायको झाली संसार सुखाचा झाला 

प्रिय सखे तुझ्यासोबत आयुष्याचा प्रत्येक क्षण अनमोल झाला

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

9) तुझ्या हसण्यातला निरागसपणा असाच टिकवून ठेवेन

 तुझ्या आवडीचे सगळे तुला आणून देईन

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

10) संसार झाला सुखाचा तुझ्या साथीने

कारण तू घेतलंस समजून मला निरागस प्रेमाने

प्रिय बायको तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

Also Read: मुलीकडून वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes from Daughter to Father in Marathi

Marriage Anniversary Wishes for Parents in Marathi | आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) आई बाबा तुम्हीच आहात माझ्यासाठी best couple

तुम्हीच आहात आदर्श माझे

तुम्हाला दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

2) मी दादा ताईने तुम्हा दोघांच्या नात्यांतला विश्वास पाहिला आहे

प्रिय आई बाबा तुम्ही तुमच्या संसारासोबत आमच्या मनालाही जपलं आहे

तुम्हाला तुमच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3) कणखर बाबा, मायाळू आई

दोघांनाही मुलांना शिस्त लावायची घाई

आई बाबा तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4) जीथे माया, ममता, विश्वास आहे

तीथे तीथे माझे आईबाबा आहेत

प्रिय आईबाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवासनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

5) कधी रुसता कधी भांडता

पण नेहमी एकमोकांसोबत असता

प्रिय आईबाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवासनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

6) आई म्हणजे प्रेमाचा सागर 

बाबा म्हणजे शिस्तीची भर

तुमच्या दोघांच्या प्रेमाला नाही कशाचीच सर 

 प्रिय आईबाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7) आईची माया, बाबांचं प्रेम

तुम्हाला कसं सांगू माझं किती आहे तुमच्यावर प्रेम

तुमच्या कळजीने नेहमीच मन भरून येते

आयुष्यभर तुमची सोबत मिळावी म्हणून देवाकडे प्रार्थना करुन घेते

आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

8) आई आणि बाबा तुम्ही मला संस्कार दिले

लढण्याची जिद्द दिली, 

सोबत होतात क्षणोक्षणी… आत्मविश्वासाची गुरुकिल्ली दिली

आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

9) बाबा माझे प्रेमळ आई शिस्तीची फार

तुमच्या नितळ नात्याने आम्हाला शिकवलं फार

आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

10) माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे आई बाबा

तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मी पुर्ण करेन

तुमच्या संस्कारांना मी नेहमी लक्षात ठेवेन

आई बाबा तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Also Read: बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Sister in Marathi

Marriage Anniversary Wishes for Brother in Marathi | दादा वहिनीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) दादा वहिनी तुम्ही दोघांनी माझं माहेरपण जपलंय

आईबाबा गेल्यानंतर तुम्हीच तर मला भरभरुन प्रेम दिलंय

तुमची जोडी अशीच कायम राहूदे

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अनेकोनेक शुभेच्छा!

2) दादा वहिनी म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा

कुटुंबातील प्रत्येकाच्या तोंडी तुमचंच नाव असतं

तुम्ही असता म्हणूनच तर काळजीचं कारणच सोडा

दादा वहिनी तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3)दादा आमचा रुबादार, वहिनी आमची सुंदर

नातं तुमचं दोघांचं असच राहो आयुष्यभर

तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4) दिवा-वातीसारखं नातं तुमचं असंच तेजोमय लखलखत राहो

दादा वहिनी तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवाच्या हार्दिक शुभेच्छा!

5) प्रिय वहिनूडी आणि दादुड्या

तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

6) समस्या कसलीही असो उत्तर तुम्हीच आहात

दादा वहिनी तुम्ही दोघेही माझे आईबाबा आहात

तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7) प्राजक्तांच्या फुलांचा सडा अंगणी

दादा राजा अन् वहिनी झाली राणी

तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

8) सुगंध फुलांचा वेचता येत नाही

दादा वहिनीची माया येत नाही

निस्वार्थ प्रेमाचे मुर्तीमंत उदाहरण तुम्हीच आहात

9) तुमच्या प्रेमाची श्रीमंती कोणत्याही मापात मोजता येत नाही.

असेच एकमेंकांना सोबत करा

आमच्यावर भरभरुन प्रेम करा

दादा वहिनी तुम्ही आहात म्हणून कुटुंबात वाहते प्रेमाची धारा

तुम्हाला लग्नाच्या वाढदिवासनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

10) नाती सुरेल बंधांनी उमलून यावी अलगदशी

तुमच्या प्रेममय स्वभावाने घ्यावे आम्हा उराशी

दादा वहिनी तुम्हाल दोघांना लग्नाच्या वाढदिवासानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Marriage Anniversary Wishes for Uncle Aunty in Marathi | काका काकूला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) काका म्हणजे मित्र आमचा

काकी तितकीच मैत्रिण झाली

तुम्ही दोघे आहात म्हणून आम्हा मुलांची चंगळ झाली

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

2) काकीने दिली आईची माया… काकाने बापाचं प्रेम

तुम्हा दोघांमुळेच तर मी आयुष्यात कमावूशकले नेम

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3) घराची शिस्त म्हणजे काका

आणि घरातलं मायाळू व्यक्तीमत्व म्हणजे काकी

तुम्हा दोघांच्या प्रेमानेच तर आम्ही भावंड झालो आयुष्यात यशस्वी

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4) मनमिळावू काकी आमची काका मात्र अबोल

कशी जमली जोडी तुमची सांगता का थोडं सखोल

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

5) काकीच्या हातची पुरणपोळी आणि काकाच्या हातचे धपाटे

कधीच विसरता येणार नाहीत…

आम्ही नेहमीच तुमच्यावर प्रेम करीत राहू

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

6) काकासारखा मित्र नाही अन् काकू सारखी मैत्रिण नाही

आयुष्यात काहीही झालं तरी, मन पहिलं तुमच्याकडे धाव घेई…

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7) काका-काकू सोबत तुमची होती म्हणून 

आयुष्यात यश मिळवता आलं

तुमच्यामुळेच तर मला जगणं नव्याने कळलं

संस्कार केले प्रेमाने… आयुष्य समजावून सांगितलं

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

8) काकू माझी आई झाली, काका झाले बाबा

काकी प्रेमळ आहे मात्र काकाचा रागावर नाही ताबा

प्रेम केलात माझ्यावर जीव ओतून सगळा

काही चुकलं असेल तर माफ करा मला

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

9) आई बाबा नसताना तुम्हीच आम्हाला सांभाळलं

हवं ते सगळं देऊन प्रेमाने समजावलं

तुमच्या या प्रेमाची परतफेड करण कठीण आहे

तुम्ही इतके चांगले आहात म्हणूनच तर मनात तुमची सतत आठवण आहे

काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

10) आयुष्याच्या वाटेवर प्रत्येक प्रश्न सोपा वाटतो

  काका काकू तुम्ही सोबत असता तेव्हा प्रत्येक क्षण मोठा वाटतो

  तुमची साथ अशीच लाभो आयुष्यच्या प्रत्येक क्षणी

   ईश्वराची कृपा असो तुमच्यावर हिच इच्छा मनोमनी

  काका काकू तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Marriage Anniversary Wishes for Mama Mami in Marathi | मामा मामीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) मामा माझा लाडका… मामी लाडकी झाली

प्रेम केलंत माझ्यावर लाड केले अतोनात

प्रिय मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

2) नातं दोन जीवांचं प्रेमळ भावनांन  गुंफवावं

तुम्हा इतके मस्त आहात की कोणीही आपसुक तुमचं व्हावं..

प्रिय मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3) मामी माझे लाड करते, मामा शिस्त लावतो

दोघांच्याही प्रेमाने मी आयुष्यात घडतो

प्रिय मामा मामी तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4) तुम्हा दोघेही कायम असेच प्रेमळ आणि हसरे रहा

तुम्हाला कोणाची नजर नको लागू दे

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

5) संसार सुखाचा व्हावा तुम्हा दोघांचा

आयुष्यभर द्यावा तुम्ही आशिर्वाद प्रेमाचा

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

6)अडचण कोणतीही असो

एकच उत्तर मामा आणि मामी

तुमच्यामुळेच तर भासत नाही आईबाबांची कमी

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

7) असेच जपत रहा एकमेकांना

कारण तुम्ही आहात आमच्या कुटुंबाचे स्वामी

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

8) जोडी तुमची मामा मामी, कुटुंबात आहे भारी

तुमच्यासारखं प्रेम करणारं जगात नाही कोणी

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

9) कधीही हाक दिली की पहिले तुम्ही हजर असता

संयमाने, जबाबदारीने मार्गदर्शन नेहमीच करता

तुम्ही असेच एकत्र रहा, हसळ खेळत सोबत रहा

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

10) लग्न करुन मामीला आणलंस घरी

आम्हाला वाटलं आमची मैत्रिणच आली घरी

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मामा अँड मामी

Marriage Anniversary Wishes for Friend in Marathi | मित्राला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) लग्नगाठ बांधलीस आणि आम्हा मित्रांना परका झालास

तुझ्या मैत्रीसाठी आमचा ग्रुप पोरका झाला

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

2) वाघासारख्या मित्राला वाघिण बायको मिळाली

संसार होवो तुमचा सुखाचा हिच सदिच्छा ईश्वर चरणी

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

3) लग्नाचं नातं नितळ असतं

निखळ प्रेमाने ते सांभाळायचं असतं

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

4) रेशीमगाठी जन्मोजन्मीच्या वरून बांधल्या जातात

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

5) वसंत ऋतू बहरत जातो…निसर्ग अधिक खुलत जातो

तशीच लाभो तुम्हा दोघांना एकमेकांची साथ

तुम्हा दोघांचा असूदे एकमेकांच्या हातात हात

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

6) नात्यांचे महत्त्व तू खूप छान जाणतोस

प्रेमळ साथ लाभली तुला हेही तू मानतोस

तुम्हा दोघांचं नातं असंच सुंदर सहज राहो हिच सदिच्छा

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

7) प्रेमात विश्वास हवा… नात्यात खरेपणा

तुम्हा दोघांच्या राहणीमानात जसा आहे साधेपणा

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

8) विश्वास आणि प्रेमाचं नातं नेहमची सुंदर असतं

तीतक्याच कोमलतेने ते जपायचं असतं

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मित्रा

9) लग्न म्हणजे नातं जीव्हाळ्याचं

इतर नात्यांनी अलवार जपायचं

हैप्पी मॅरेज ॲनिव्हर्सरी मित्रा

10) लग्नाच्या अतूट नात्याने… बांधलं दोन जीवांना

सोबत रहा प्रेमाने, शुभेच्छा तुम्हा दोघांना

मित्रा तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

Also Read: वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Father In Marathi

Marriage Anniversary Wishes for Girlfriend in Marathi | मैत्रिणीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

1) तुला लाभली साथ प्रेमळ…झालीस त्याची आयुष्यभरासाठी

म्हणूनच म्हणतात स्वर्गात बांधल्या जातात लग्नाच्या प्रेमळ गाठी

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

2) श्रावणसरींसारखी सुखद आमची मैत्रिण झाली सौभाग्यवती

तुझा राजकुमार जपेल तुला आयुष्यभरासाठी

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3) दोन जीवांचे नाते सुंदर लग्नगाठ ही बांधली त्यावर

सुंदर जीवनासाठी लाभला तुला सखे या भुतलावर

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4) इंद्रधनूसम सहवास तुझा ग

नेहमी आठवे तू नसताना

राजकुमार तुझा असे नशीबवान मग

आयुष्यभराची साथ देताना

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

5) लाडकी तू मैत्रिण माझी लाडक्या तुझ्या आठवणी

साथ लाभली उत्तम तुला झाली तुझी पाठवणी

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

6) असं म्हणतात लग्नगाठी स्वर्गात बांधतात

आयुष्यभर तू सुखी रहा तुझ्या राजकुमारासोबत

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7) तुझे वैवाहिक जीवन सुखाचे जावो हिच सदिच्छा

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

8) तुझ्यासारखी प्रेमळ सून मिळाली ज्या घराला

ते घर धन्य झाले.. आणि भाग्यवान आहे तुझा नवरा

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

9) नेहमी सगळ्यांची काळजी घेणारी तू

आता नक्कीच सासरच्या प्रत्येक व्यक्तिची काळजी मनापासूनच घेत असशील

अशीच कायम निर्मळ रहा

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

10)  सुंदर दिसण्याने तू नेहमीच सगळ्यांच्या मनात घर करायचीस

सासरच्यांनाही असंच बांधून ठेव तुझ्या प्रेमळ स्वभावाने

लाडक्या मैत्रिणी तुला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Also Read: निरोप समारंभ शुभेच्छा | Farewell Quotes in Marathi

25th Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

1) २५ वर्षांची सोबत तुमची अशीच राहो आयुष्यभर 

उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

2) माझा जन्म झाल्यापासून मी तुम्हा दोघांना छान हसताना पाहतोय

संकट असो वा सण समारंभ नेहमी एकविचाराने वागताना पाहतोय

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

3) आयुष्या वाढो तुमच्या नात्याचे असे रहा एकत्र

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

4) तुम्ही आमच्यासाठी आदर्श आहात, 

आणि तुमचे नाते आमच्यासाठी आदर्श नाते आहे

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

5) तुम्ही एकत्र आहात म्हणून आपलं कुटुंब एकत्र आहे

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

6) २५ वर्षांचा संसार झाला तोही एकमेकांना सांभाळून घेताना

नक्कीच प्रेमळ स्वभाव हे गुपीत असार तुम्हा दोघांचं वागताना 

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

7)  परिस्थिती कशीही असो साथ एकमेकांची नेहमी केली

संकटे आली किती जरी हात सोडला नाही कधी

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

8) नात्यांचा दोर नाजूक असतो

 प्रेमाने तो मजबूत करायचा असतो

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

9) जोडी तुमची दोघांची नेहमीच भावते आम्हाला

तुम्हीच आमचे आदर्श आहात आम्ही सांगू सगळ्यांना

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

10) नेहमी हसरं जोडपं तुमचं नेहमीच प्रेम करता एकमेकांवर

आदर करता एकमेकांचा म्हणूनच आहात आज सोबत

तुम्हा उभयतांस लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

तर हे आहेत सर्वोत्तम marriage anniversary wishes in Marathi आशा आहे की लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असलेले हे मराठी संदेश आपणास आवडले असतील. या लेखातील लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश आपण कॉपी करून लग्न वाढदिवस असणाऱ्या व्यक्ति सोबत शेअर करू शकतात आणि त्यांना सुखी आयुष्यासाठी छानश्या शुभेच्छा देऊ शकतात. आशा आहे आपण या लेखातून उत्तम happy anniversary wishes in marathi शोधून काढल्या असतील.

Also Read: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi