महाराष्ट्रीय लग्नांमध्ये उखाणे घेण्याची परंपरा फार जुनी आहे. त्यामागचा हेतूही तसाच मजेदार आहे. आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं किंवा आयुष्यभरासाठी गाठ बांधली गेलेल्या नवऱ्याचं नाव घेऊ नये अशी जुनी परंपरा आहे. आदर म्हणून त्यांना अहो! म्हणण्याची प्रथा आपल्यात आहे. पण मग इतरांना कळणार कसं की नवरीच्या नवऱ्याचं नाव नेमकं काय आहे. तर म्हणून उखाण्याची परंपरा रुळली.
घरात सत्यानारायणाची पुजा, लग्न, हळदूकुंकू, वटपौर्णिमा, मकरसंक्राती अशा सणांच्यावेळी घरातली जेष्ठमंडळी नव्या नवरीला उखाणं घेण्यासाठी आवर्जुन आग्रह करतात. खरं तर घरात आलेली नव्या सुनेला महत्त्व देण्यासाठी देखील ही परंपरा रुजली असावी. म्हणूनच महिलांसाठी खास उखाणी marathi ukhane for female / वधुसाठी मराठी उखाणी, नवरीसाठी मराठी उखाणी आम्ही या लेखाच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. आशा आहे तुम्हाला ही उखाणी नक्की आवडतील.
१) बालपणीचे दिवस भराभर सरले…. रावांना मी सौभाग्यालंकार म्हणून वरले
२) आईच्या पदराखाली मोठी झाले बाबांच्या मायेमध्ये वाढले..,. रावांच्या घरचे माप आज आनंदाने ओलांडले
३) आईची माया बाबांचं प्रेम…… राव जणू हिरोच दिसतात सेम
४) बहिणीला सिस्टर तर भावाला म्हणतात ब्रदर….. रावांचे नाव घेते आता सोडा माझं पदर
५) नाचताना मोराचा असतोच भारी तोरा …… रावांना आवडतो बदामाचा शिरा
६) हल्ली शेगडी वरचे दूध रोजच करपतं ….रावांना पहिल्यापासून माझं भानच हरपतं
७) वाचन वेडी मी कितीशी पुस्तक वाचून झाली
आता मनच थऱ्यावर नाही जेव्हापासून…. रावांच्या नावाची लायब्ररी आयुष्यात आली
८) पुस्तकाच्या गोष्टी मध्ये राणीराजा असतो
…. रायां मध्ये मला माझा राजा दिसतो
९) मिठाई मध्ये भारी कंदी पेढ्यांचा पुडा
….. रायांसोबत दिसतो माझा लक्ष्मीनारायणाचा जोडा
१०) केळीच्या पानाभोवती सुंदर रांगोळीची नक्षी…..रायांच्या संसारामध्ये तुम्ही सगळे आहात साक्षी
११) टू बीएचके फ्लॅट सोबत हवं एक दुकान ….. राव माझे हट्ट पुरवण्यासाठीच एक ठिकाण
१२) अकरानंतर घड्याळामध्ये वाचतात बारा….. रावांचा जाम भारी तोरा
१३) प्राजक्ताचे फुल अंगणात पडताना पाहिलं…… रावांसाठी मी माझं अख्ख आयुष्यच वाहीलं
१४) पंचपक्वानांच्या ताटाची लज्जतच न्यारी…… रावांचा स्वभावच लय भारी
१५) बनारसी शालू नऊवार इरकल ….. रावांचं नाव नीट ऐका तुमचं पण काळीज जागेवरून सरकल
१६) स्वप्नांच्या झुल्यामध्ये झुलावसं वाटतं …. राया तुमच्या सोबत खूप खूप बोलावंस वाटतं
१७) चांदीची कळशी सोन्याचे ताट…… रायांसोबत बांधली साता जन्माची गाठ
१८) कोल्हापूरचा तांबडा पांढरा आणि सातारी मसाला…. रायांच्या नावासाठी उखाणा हवाय कशाला
१९) अंबाबाईच्या मंदिरामध्ये मागितला नवस….. रावांसोबत येऊ दे सुखाचे दिवस
२०) मटणामध्ये सावजी आणि आवडतो चिकन टिक्का
….. रायांच्या ओठांवर असतो माझ्या ओठांचा शिक्का
२१) काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
….. रावांच्या जीवनात निर्माण करीन आनंद
२२) सूर्याची किरणे पृथ्वीवर प्रकाशमय आनंद धाडतात, ….. राव माझ्या केसात मोगऱ्याचा गजरा माळतात
२३) रिमझिम पावसात नाचत होता मोर…. रावांच्या रूपात माझ्या आई बाबांना जावई भेटला थोर
२४ अंगणातल्या गाईचे साजूकसं तूप…. रावांच्या मिठीत मिळत मला जगावेगळं सुख
२५) पावसाळ्यात उन्हात इंद्रधनुष्य दिसलं
…. रावांच्या नावाचं कुंकू कपाळावर हसलं
२६) आईने दिल्या पाटल्या बाबांनी दिला तोडा……रावांचे नाव घेते आता वाट माझी सोडा
२७) आनंदाच्या या क्षणी तुमच्या सर्वांचा प्रेमाचा आहेर…… रावांच्या मिठी मध्ये मी विसरूनच जाते माहेर
२८) सरीवर सरी पावसाच्या सरी
…. रावांना चहा सोबत आवडते खुसखुशीत खारी
२९) हंड्यावर हंडे सात त्यावर पाण्याचा थंडगार माठ
….. रावांसोबत बांधली आयुष्यभराची जन्म गाठ
३०) साजूक तुपात केला गाजराचा मलाई हलवा
वाट बघून थकले आता कोणीतरी…..रायांना बोलवा
३१) माझ्या साऱ्यास मैत्रिणींना जाम ईर्षा होते जेव्हा मी….. रावांचे प्रेमाने मनापासून नाव घेते
३२) रुबाबदार मिश्यानं मध्ये किती सुंदर दिसते ध्यान….. राव आहे माझं इस्पिकचं
३३) मोबाईल मध्ये आवडतो एप्पल आणि सॅमसंग….. राव आहेत लय भारी हँडसम
३४) चंदनाच्या झाडाला सापाचा वेढा…. राव माझे सातारी कंदी पेढा
३५) पहिल्या पावसात येतो मातीचा सुगंध
…. रावांच्या मिठीत मिळतो वेगळाच आनंद
३६) माता पित्याला प्रदक्षिणा घालून देवाने पृथ्वी प्रदक्षिणा केली ……
रावांच्या प्रेमाने मी पूर्ती न्हावून गेली
३७) फुलात फुल सुगंधी आवडतो मला चाफा
…… राव माझ्यासाठी जन्मभराचा तोफा
३८) सूर्याच्या प्रकाशात चांदणं दिसत नाही…….. रावांना माझ्याशिवाय करमतच नाही
३९) संसारात असावी आवड जशी साखरेची गोडी,
………च्या जीवावर घालेन मणी-मंगळसूत्राची जोडी.
४०) सारीपाटाचा खेळ नेहमी मलाचं जिंकून देतात
हरत असेल मी तर….. राव स्वतःवर डाव घेतात
४१) मुठभर मनामध्ये माझ्या अगणित स्वप्नांचं साठवून ठेवलेलं विश्व म्हणजे……. राव तुम्ही, मागच्या जन्मीची पुण्याई म्हणूनच तर भेटलात या जन्मी.
४२) आईला म्हणतात मदर बाबांना म्हणतात फादर…… रावांचे नाव घेते सोडा माझं पदर
४३) एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात आमच्या…….रावांचा नाद केला तर हात पाय गळ्यात
४४) वाऱ्याने घराची दिवेच विझले पहिल्या पावसात……रावांबरोबर मनसोक्त भिजले
४५) पावसाळ्यात आवडतात चहा सोबत कांदा भजी ….. रावांची मी सगळी सांभाळते मर्जी
४६) पावसाळ्यात मुंबईत साठतं गुडघाभर पाणी…. राव माझे महाराज मी त्यांची पट्टराणी
४७) टाको टाक लगेच बॅग भरायची…….रावांसोबत जीवाची मुंबई करायची
४८) विडा रंगतो तोंडात त्याला पान म्हणतात
…… रावांना माझी जान म्हणतात
४९) कष्टाच्या भाकरी नं दोघांची पोटं भरायची…….. रावांसोबत मला फक्त शेतीच करायची
५०) समुद्रामंदी गेले तवा जाळ्यात भरपूर मासोळी घावली ….. रायान्ना साक्षात मुंबादेवीच पावली.
५१) चांदण्यांच्या सड्यात एक चंद्र हसला ….. रावांच्या रूपात मला माझा चंद्र दिसला
५२) कसल्याही दुखण्यात माझं दव्यावर भागत नाही, नुसतं…. रावांचं नाव घेतलं की मला औषधच लागत नाही
५३) पाण्याच्या थेंबाचा जरी स्पर्श झाला तरी आठवणी गाली हसतात ….. राव जेव्हा टॉवेल बाहेरच विसरतात
५४) स्वप्नातल्या गोष्टीत मी रंगून जाते …. रावांच्या आठवणीने मी हुरळून जाते
५५) आकाशात उंच घार घेते भरारी …. रावांच्या मिशीचा रुबाबच भारी
५६) शिंपल्यातला मोती आज माझ्या मनात रुजला….. रावांच्या नावाने माझा रोम रोम भिजला
५७) पोहायला समुद्र आवडतो
फिरायला निळभोर आकाश
जेव्हा कुशीत निजावंस वाटतं
तेव्हा आवडतो….. रायांच्या हाताचा पाश
५८) चातकाच्या प्रतिक्षेने आभाळातही नभ दाटतं
….. रावांच्या मिठीमध्ये जगाचं सुख भेटतं
५९) सांजे चा लालबुंद सूर्य माझ्या भाळी हसतो
…. रावांचा चेहरा मला कुंकवामध्ये दिसतो
६०) अंगणातला सडा माझ्यावर रुसतो
….. रायांचं नाव घेतलं की लगेच खुदकन हसतो
६१) वाळवंटात वाळवंट नाव त्याच कच्छ
…. रावांचा स्वभाव पाण्यासारखा स्वच्छ
६२) तेंडुलकरचा सिक्सर जातो सीमारेषे पार….. रावांच्या गळ्यात माझ्या मिठीचा हार
६३) पावसाची चाहूल पहिली चातकालाच लागते ….. रावांसाठी मी जीव ओवाळून टाकते
६४) प्रसंग कोणताही असो लगेच मिठी मध्ये धरतात…… राव आमचे माझं तोंड गोड करतात
६५) हवामान खात्यासारखा…… रावांचा स्वभाव असतो
कारण त्यांच्या प्रेमाचा पाऊस कधीही धोधो कोसळतो
६६) प्रेम करायला यांना काढावी लागत नाही सवड…… रावांना आहे स्वयंपाकाची आवड
६७) आकाशात चांदणं हसताना दिसतनिजताना……. रावांच्या मिठीचं पांघरूण असतं
६८) डोंगर माथ्यावर सगळेजण मोठ-मोठी आरोळी देतात….. राव माझी खूप काळजी घेतात
६९) तापलेले दूध लगेच ठेवायचे नसते झाकून…. रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून
७०) ओठांना लिपस्टिक गालाला पावडर डोळ्यांना लावते मस्करा
….. रावांचे नाव घेते कृपया आता माझी थट्टा मस्ती बस करा
७१) एकच कपामध्ये आम्ही दोघे रोज चहा घेतो…… रायांच्या ओठांच्या स्पर्शाने चहा भलताच गोड होतो
७२) कपाट भरलं आहे तरी मला आणतात नेहमीच नवीन साडी ….. रावांनी दाखवली मला चांदोमामाची गाडी
७३) सकाळपासून बसले मी भाजी कांदा चिरीत ….. रावांना आवडतं वांग्याचे भरीत
७४) गुलाबाला माहित आहे सूर्य उगवल्यावर फुलायचं
…… रावांसोबत मला नेहमी झोपाळ्यावर झुलायचं
७५) हृदयाच्या प्रत्येक कप्प्यामध्ये मी ज्यांना मी कोंडले त्या ….. रावांचे नाव मी टॅटू मध्ये गोंदले
७६) समुद्राच्या वाळूवर आम्हाला चालायला आवडतं
फेसाळणाऱ्या लाटेवर आम्हाला पळायला आवडतं
…… राव सोबत असतील तर मला बागडायला आवडतं
७७) देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
……. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा
७८ ) पावसाळा सुरू होणार म्हणून आणली रंगीबेरंगी छत्री
मी गृहमंत्री आणि….. राव माझे मुख्यमंत्री
७९) पाणी थंड गरम राहावं म्हणून आपण वापरतो थर्मास
…… राव माझ्यासाठी आहे लयच खास
८०) घंटी वाजून भरते तिला शाळा म्हणतात
खडूने लिहितात त्याला फळा म्हणतात
मी गाणं गुणगुणले की…… राव मला गाणं कोकिळा म्हणतात
८१) मुलांच्या संगोपनात आज सरली एवढी वर्ष……. रावांमुळेच आहे आजही जीवनामध्ये खरा हर्ष
८२) दिवसभर काम करून करून जीव होतो बेजार
…… रावांची पोर हजार पण आहेत नुसता भुताचा बाजार
८३) श्रीकृष्णाच्या बासरीने सारा निसर्ग हसला…… रावांसोबत जीवनाचा खरा सूर गवसला
८४) पंढरीच्या वारीला लोक पायी पायी जातात……. राव माझे सगळेच लाड मनावर घेतात
८५) दररोज संध्याकाळी देवासमोर मंदिरात लावते मी दिवा
…. रावांचा किती करू हेवा हे देवा त्यांना सुखात ठेवा
८६) वाऱ्याने फुलं पडतात मुले त्यांना वेचतात
….. राव आमचे डीजेवर वेड्यासारखे नाचतात
८७) भर पावसात समुद्रकिनारी फिरायचे आम्ही मनावर घेतले
…. रावां सोबत पावसाने आम्हाला धु धू धुतले
८८) बशीवर बशी काचेची बशी, मी त्यांचं पांघरून आणि…… राव माझी उशी
८९) बाष्पीभवन झालं की त्याला पाण्याची वाफ म्हणतात आमच्या…… रावांना चाळीमध्ये सगळेजण पिंट्या चा बाप म्हणतात.
९०) शेअर मार्केटमध्ये कंपन्यांचं होत असतं मर्जर
मी असते मोबाईल तर …… राव माझे चार्जर
९१) आजारामध्ये बरं व्हायला औषध आणि गोळी लागते
मला फक्त….. रावांच्या कवितेची एक चारोळी लागले
९२) ऊन लागू नये म्हणून वापरतात छत्री
…. रावांच्या प्रेमाची लागत नाही खात्री
९३) मोबाईलवर सर्वांना गुड मॉर्निंग च्या शुभेच्छा देते
माझ्या दिवसाची सुरवात…. रावांच्या सुंदर चेहरा बघून होते
९४) पावसामध्ये थुई थुई नाचत असतो मोर…… रावांना बोलावच लागत नाही वन्स मोर
९५) खोक्यात खोका टीव्हीचा खोका मी त्यांची मांजर आणि….. राव माझे बोका
९६) हृदय काढून बाण मारणे असं त्यांचा प्रेम नसतं….. रावांचे प्रेम सकाळी माझ्या गालांवर दिसतं
९७) पावसाळ्यामध्ये बाजारात विकायला आला होता खेकडा, …. राव माझे काळजाचा तुकडा
९८) रोबोट मध्ये रजनीकांत चे नाव होते चिट्ठी
झुरळाला बघून……रावांना मी मारली घट्ट मिठी
९९) लग्नामध्ये आई-वडिलांनी केले पुण्य वचन ….. रावांना आहे प्रिय पुस्तक वाचन
१००) बाळ रडू लागलं की त्याला शांत करण्यासाठी वाजवतात खुळखुळा ….. रावांच्या प्रेमाचा नादच लई खुळा.
आशा आहे तुम्हाला ही नवरीने घ्यायची उखाणी आवडली असतील. मग तुमच्या मैत्रिणीचे, बहिणीचे किंवा आत्या, मावशीचे ज्यांचे कोणाचे लग्न ठरले असेल त्यांना ही आमची वेबसाईट शेअर करा, म्हणजे त्यांना लग्नात आणि सण समारंभाला उखाणी घेणं सोपं होईल. तुम्ही ही आमची Marathipost.in वेबसाईट WhatsApp, Facebook, Instagram च्या माध्यामातून शेअर करु शकता. आणि कमेंट करुन तुम्ही आम्हाला नक्की कळवा ही आम्ही दिलेली ही उखाणी तुम्हाला कशी वाटली.