शुभ रात्री शुभेच्छा मराठी | Good Night messages In Marathi 2024

शुभरात्री शुभेच्छा मराठी

रात्री झोपताना आपल्या प्रियजनांना  शुभ रात्री शुभेच्छा मराठी स्टेटस / Good Night Wishesh पाठवण्यासाठी  आम्ही घेऊन आलो आहोत शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये ते तुम्ही WhatsApp, Instagram, Facebook आणि अन्य सोशल मिडियावर पाठवू शकता. Good night messages Marathi

दिवसभर आपण सगळेच आपापल्या कामात Busy असतो.  आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या मित्र नातेवाईकांना वेळ देणे यावेळी शक्य होत नाही.  पण रात्री झोपण्याआधी आपण त्यांना Good night messages and Quotes in Marathi पाठवून त्यांची आठवण काढतो, हे त्यांना सांगू शकतो.  आम्ही Marathipost या पोस्टच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्तम शुभ रात्री शुभेच्छा.. या शुभेच्छा तुम्ही तुमच्या मित्र, मैत्रिणी,  नातेवाईकांना पाठवून तुमच्या मनातील भावना व्यक्त करु शकता. यात आहोत प्रेमळ भावना व्यक्त करणारे…  Romantic Good night message in Marathi, प्रेमाची ग्वाही देणारे शुभ रात्री शुभेच्छा मराठी, Good night love message in Marathi,   मजेदार शुभरात्री शुभेच्छा! 

 • चांदण्यांच्या मंद प्रकाशात तुमचा चेहरा उजळून जावा

तुमच्या कष्टाला यशाचा सुगंध यावा

शुभ रात्री 

 •  प्रमाणिक माणसांना थोडे कष्ट करावे लागतात

पण यश हे मिळतेच

तुमच्याही आयुष्यात यशाचा दिवस लवकरच उगवेल

शुभ रात्री 

 • आज आणि उद्याच्या दरम्याने ही रात्र आहे

ही रात्र छान जाईल आणि उद्याही चांगला जाईल

शुभ रात्री 

 • उद्याची पहाट घेऊन येईल सोनेरी किरणे

तुमच्या मनमोहक हसण्याने भरलेली सकाळ

आणि तुमच्या उज्ज्वल यशाची खात्री

शुभ रात्री 

 • तुमच्या आठवणीत बरंच काही सुचतं मनातल्या मनात

जाणिव होते आपलेपणाची आणि बरच काही

आत्तासाठी शुभरात्री

 • आराम करा… शांत झोप घ्या

उद्या पुन्हा नव्याने ऊर्जा एकवटून

ध्येयाकडे झेप घ्यायची आहे

शुभ रात्री

 • दिवसभराच्या विचारांना विश्रांती द्या

तुमच्या सकारात्मकतेला काम करु द्या

शुभ रात्री

 • शांत आरामदायी झोपेवर त्याचाच अधिकार असतो

ज्याने दिवसभर प्रामाणिकपणे काम कलेले असते

जसे की तुम्ही…

शुभ रात्री

 • चंद्राच्या प्रकाशात तुझ्या रंगाला अधिक तेज चढते

कायम असेच निरागस रहा… 

कारण यानेच तुमचे व्यक्तिमत्व इतरांपेक्षा वेगळे भासते

शुभ रात्री

 • शांतपणे उशीवर आपले डोके ठेवा 

आणि तुमच्या सगळ्या चिंतांना आराम द्या….

उद्याच्या सुंदर दिवसाने नव्या आयुष्याची सुरुवात करा

शुभ रात्री

 •  आजचा दिवस जरी संपला असला

तरी आजची रात्री बाकी आहे,

तुमच्या सगळ्या इच्छा आकांशा पुर्ण होवेत

त्यासाठी माझी सदिच्छा काफी आहे…

शुभ रात्री

 •  आजच्या रात्री ध्येय्याची स्वप्ने पहा

उद्याचा दिवस तुमचाच असेल…

तुम्ही नेहमी आशावंत रहा…

शुभ रात्री

 • शांत झोप घ्या… मोठी स्वप्ने बघा..

शुभ रात्री

 •  स्वप्नांना चढूदे सत्याचे रंग

तुमचे कष्ट यशस्वी व्हावे आणि तुम्ही व्हा आनंदात दंग

शुभ रात्री

 • आयुष्यात पुन्हा अनुभवावी बालपणीची झोप

निरागस हास्याने.. दुसऱ्याने जगण्याचे बळ देणारी

शुभरात्री

 • सर्वात गोड व्यक्तीला गोड स्वप्नांसाठी 

प्रकाशमय शुभेच्छा

शुभरात्री

शुभ रात्री शुभेच्छा मराठी

मजेदार शुभ रात्री शुभेच्छा मराठी

 • शांत झोपा आणि ढेकूणांना चावू देऊ नका

तुमचे रक्त मौल्यवान आहे

कारण ते कष्टाच्या घामाने बनलेले आहे

शुभरात्री

 • उबदार गोधडीत स्वतःला गुंडाळून

स्वप्ननगरीत प्रवेश करण्यास तयार असाल तर

लगेच डोळे बंद करा… झोपी जा!

शुभ रात्री

 • झोपणायापुर्वी तुझ्यासोबत बोलल्यावर चांगली स्वप्ने येतात,

तुझ्या सकारात्मक वृत्तीप्रमाणे माझी स्वप्नेही सकारात्मकच असतात

शुभरात्री

 • शांत झोपा आणि तुमच्या प्रिय व्यक्तीची स्वप्ने

रंगवण्यास तयार व्हा! शुभ रात्री

 •  आजुबाजूला घोरणारी व्यक्ती असताना

शांत झोप अनुभवणे म्हणजे समुद्रात कोरडं राहण्यासारखंच आहे

तरीही तुम्हाला शुभरात्री…

 • शांत झोपा… ढेकूण चावत असतील तर

तुम्ही त्यांना परत चावा… काहीही झालं तरी आपण हार मानायची नाही

शुभ रात्री

 • प्रिय मित्रा… तुला झोपेत वाईट स्वप्न पडले

तर मला प्लिज उठवू नकोस… 

मला माझी झोप प्रिय आहे

शुभ रात्री

 • झोपताना आठवणीने अलार्म सेट करायला विसरु नका

नाहीतर उद्या सकाळी ८ वाजता अलार्म स्नूझ करायला कोण उठणार?

शुभ रात्री

 • तुमची स्वप्ने तुमच्यासारखीच विचित्र आणि भयावह असूदे!

शुभ रात्री

 • मनसोक्त झोपा… आणि अशा जगात उठा जीथे

सोमवारची सकाळ अस्तित्वात नाही…

शुभ रात्री

 • आज रात्री तुमची स्वप्ने जगावेगळी नसतील

हिच शुभेच्छा… शुभ रात्री

 • शांत झोप आणि कमी घोरण्याने 

इतरांचीही शुभ रात्र होते….

 • रात्रीची वाट तू सायंकाळपासून पाहतोस

कारण तुला रात्रीच झोपण्याची परवानगी आहे असं सांगतोस

शुभ रात्री

 • एकदा पलंगाखालीसुद्धा वाकून बघा… असं म्हणतात

चांगल्या माणसांच्या पलंगाखाली भुतं असतात…

शुभ रात्री

 • शांत झोपा.. भीती वाटलीच तर बाजूच्याला उठवा

 फक्त मला फोन करु नका… शुभ रात्री

Romantic शुभ रात्री शुभेच्छा मराठी

 • दिवसभर माझ्या चेहऱ्यावरील हास्याचे कारण तूच आहेस

मला नेहमीच खास वागणूक देण्यासाठी धन्यवाद

शुभ रात्री

 • माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे… 

हे सांगितल्याशिवाय मला झोपच येत नाही… शुभ रात्री

 •  तुझा चेहरा पाहिल्यावर दिवसभराचा उत्साह वाढतो

तसंच तुला Good night म्हटल्यावर मला शांत झोप येते

 • आज रात्रीच्या गोड स्वप्नांसाठी तयार आहात ना?

मग उशीवर डोकं टेकवून शांत झोपा… शुभ रात्री

 • माझ्या आयुष्यात तूझ्यासारखा  प्रेमळ जोडीदार आहे,  यासाठी 

मी प्रत्येक रात्री देवाचे आभार मानते.. शुभ रात्री

 • माझ्या स्वप्नात तू येशील असे वचन दे…

आणि शांत झोप… मी तुझी वाट पाहतेय.. शुभरात्री

 • लवकर झोप म्हणजे स्वप्नात आपण लवकरच भेटू

शुभ रात्री… जीवलगा

 • आपण एकत्र घालवलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण मनात जपून

उद्याच्या सुंदर सकाळी उत्साहाने उठण्यासाठी ….शुभरात्री

 •  आपण उद्या भेटण्याच्या मधे आजची रात्री आहे

आशा करते उद्याची पहाट लवकरच होईल… शुभरात्री जीवलगा…

 • आजची रात्र हा दुरावा सहन कर…

 उद्याची पहाट आपल्याला आयुष्यातील सुंदर दिवस घेऊन येईल

शुभ रात्री

 • माझ्या आयुष्यातील सगळ्यात खास व्यक्तीला … शुभ रात्री
 •  उद्याची सुंदर पहाट तुमचा उत्साह द्विगुणीत करेल

शुभ रात्री

 प्रियकर/ प्रेयसीसाठी काव्यमय शुभ रात्री शुभेच्छा मराठी

 • आठवण तुझी यावी, धुंद धुक्या सारखी

अलगद विरुन जावी, धुंद धुक्या सारखी… शुभ रात्री

 • दुरावा तुझ्या माझ्यातला श्रावणातील उन्हाप्रमाणे असावा

क्षणात अबोल होताना क्षणात गप्पांना रंग चढावा… शुभ रात्री 

 • तू असताना समोर माझ्या… विचारांची गर्दी होते

शब्द निसटती हातोहाती, शब्दांशी मग पुन्हा नव्याने मैत्री होते.. शुभ रात्री

 • तुला पाहता सुर गवसले, हरवले होते जे जगण्यातून

क्षणात सारे शब्द उमटले… काव्याच्या या जलधारेतून.. शुभ रात्री

 • काव्य स्पुरावे तुला पाहता..

तुला पाहता उत्साह यावा शब्दांना.. शुभ रात्री

 • माझ्या अंतरीचे सुर तुला कळू लागले

नजरेने नजरेचे देणे घेणे जमू लागले… शुभ रात्री

 •  तू रुसता शब्दही रुसती… तुझ्यासवे हसते काव्य

तूझ्या सुंदर चेहऱ्यावरती आपसूक शब्दबद्ध होते काव्य… शुभ रात्री 

 • माझ्या हसण्याचे गुपीत तू आहेस

माझ्या मनीचे शब्दांत गुंतलेले कवित्त तू आहेस

तू आहेस म्हणून स्पुरते काव्य…

काव्यामधले पुष्प तू आहेस… शुभ रात्री

 • शब्द गुंतण्याची मज्जा काव्य ऐकवताना येते..

विचारांची मज्जा तू समजावताना येते.. शुभ रात्री

 • हातावरच्या रेषांमध्ये तुझे नाव शोधत राहते…

तू समोर आल्यावर मात्र स्वतःमध्ये हरवून जाते.. शुभ रात्री

 • फुलांच्या संगतीने शब्दांची स्वारी यावी

सुगंध विचारांचा लेऊन भरजरी….

तसाच ऋतू प्रेमाचा यावा तुझ्या माझ्या आयुष्यावरी.. शुभरात्री

 • साथ तुझी लाभता…विचारांना दिशा मिळाली

आयुष्याला रंग लाभले इंद्रधनूचे… शुभ रात्री

 • प्रेमात विसरलो मी स्वताःला नाव तुझे येते ओठी

सांग सखे हे काव्य रचू मी शब्दांची नाव झाली छोटी… शुभ रात्री

 • श्रावणसरींनी निसर्गाला पुन्हा नव्या जीवनदान मिळावे

तसेच काही तुझ्या येण्याने माझ्या जगण्याला अर्थ मिळावे… शुभ रात्री

 • छतावरच्या टपोऱ्या गारांना… कोणीतरी सांगावे जाऊन

तुझ्या इतके टपोरे डोळे कोणाकडेच नाहीच म्हणून.. शुभ रात्री

 • वाट तुझी पाहताना, मी मला विसरुन जावे

हवेतील गारवा स्पर्शताना तुझ्यात स्वतःला शोधून पहावे… शुभ रात्री

 • रोज पाहतो मी चंद्राला, तुझ्या चेहऱ्याचा आभास होतो

गोड गुलाबी थंडीमध्ये तुझ्या सहवासाचा भास होतो… शुभ रात्री

 • माझ्या विचारांना तू काबीज केलेस, कसे शोधू स्वतः स्वतःला

तुझ्या आठवणींनी उरलो आहे, कविता स्पुरते जेव्हा मनाला… शुभ रात्री

 • अलगद वाऱ्याची झुळूक येते, तुझी आठवण घेऊन

विचार तुझ्याकडे पाठवताना शब्दही जाते घेऊन.. शुभ रात्री

 • आकाशातल्या ताऱ्यांना हेवा वाटेल, तुझ्या व्यक्तिमत्वाच्या चमकण्याने

सारे तेजोमय होऊन जाई तुझ्या अस्तित्वाच्या प्रकाशाने… शुभ रात्री

 • मी विचारांमध्ये हरवण्याचे कारण तू आहेस

मी स्वतःमध्ये नसण्याचे कारण तू आहेस… कसे सांगू इतरांना?

माझ्या असण्याचे कारण तू आहेस.. शुभ रात्री

 • जेव्हा वीज चमकते, तेव्हा ढगांचा ढगांना स्पर्श होतो

नक्कीच त्यांचा एकमेकांशी काहीतरी परामर्श होतो… शुभरात्री

 • पाऊस येतो घेऊन तुझ्या आठवणींच्या सरी

  मी अलगद भिजत राहतो, मनात दरवळत राहतात सरीवर सरी… शुभ रात्री

 • जगण्याला  नव्याने अर्थ दिलास

तुझ्या व्यक्तिमत्वाने मनाला स्पर्श केलास

कसे उलगडू हे कोडे मनाचे…नव्या स्वप्नांचा उत्कर्ष दिलास…. शुभ रात्री

 • सुंदर सुरांनी सजलेली भुपाळी, कानी पडावी पहाटेच्या वेळी

तितकीच तूही सुंदर भासतेस, जेव्हा भेटतेस प्रत्येक वेळी… शुभ रात्री

 • विश्वास नात्यांतला डोळ्यांतून जपावा

न सांगताही अर्थ उमगावा… शुभरात्री

 • तुझ्या जीव गुंतला अन् मी न माझी राहिले

कसे सांगू सख्या तुला स्वप्न तुझे पाहिले… शुभ रात्री

 • चंद्र जसा चांदणीसंगे, भुंगा जसा फुलासंगे

तू तसा माझ्यासंगे आयुष्यभर राहशिल ना? शुभ रात्री

 • नजरेने नजरेचे गुपीत सारे उलगडावे

तू समोर येताच माझ्या, मी जगाला विसरावे… शुभरात्री

 • नाते तुझे माझे शब्दांच्या पलिकडले

गुपित तुझ्या माझ्या प्रेमाचे नजरेने उलगडले… शुभ रात्री

 • झुळूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले

तुझ्या स्पर्झाची जाणिव होताच भाळले मन खुळे… शुभ रात्री

 • दिवसभर माझ्या विचारातच असतोस.. 

नक्की तू घरी कधी जातोस? … शुभ रात्री

 • तुझे टपोरे डोळे नेहमीच मला भुरळ घालतात

कितीही सावरायचं म्हटलं तरी तुझ्या जवळ नेतात… शुभ रात्री

 • चांदण्यांची आरास तुझ्यासाठी सजवली आहे

तू स्वप्नात येशिल म्हणून आज मी खोली सजवली आहे…शुभ रात्री

 • मन हळूच तुझ्याकडे येऊ पाहतंय, 

स्वप्नात भेट होईल म्हणून सांगतंय.. शुभ रात्री 

 • नक्षिदार चांदण्यांच्या चित्राप्रमाणे भासतेस तू नक्षत्रांप्रमाणे

आठवण तुझी येते तेव्हा…मनातच असतेस तू नेहमीप्रमाणे… शुभ रात्री

 • काळ्याभोर आकाशात तारे चमचमती वेगाने

तुझे विचार जसे माझ्या मनात उमगतात निखळ प्रेमाने.. शुभ रात्री

 •  अंदाज तुझ्या बोलण्याचा मला उमगत नाही सखे

कितीही प्रयत्न केला तरी… 

तुझ्याविना मन कशातच रमत नाही सखे… शुभ रात्री

 • वेगळ्या वाटेचा वाटसरू मी

तुझ्या दिशेने अलगद वळलो..

मी मला समजावता समजावता

तुझ्यामुळेच स्वतःला कळलो… शुभ रात्री

प्रिय सख्या शुभ रात्री शुभेच्छा मराठी

 • आयुष्यभराचा सहवास हवा आहे

तुझा प्रेमाचा हाथ हवा आहे

कसं सांगू सख्या तुला

तुझ्या सारखा जोडीदार मला प्रत्येक जन्मात हवा आहे…शुभ रात्री 

 • तुझ्यासोबत असते तेव्हा नेहमीच मी मला स्पेशल वाटते

तुझ्या सहवासाने मी  स्वतःतच रममान होते

आयुष्यभराची साथ देशील ना सख्या? 

भविष्याचे स्वप्न छान वाटते…शुभ रात्री

 • आवाज पाखरांचा रुंजी मनात घालतो

तू सोबत असतोस तेव्हा मनास गारवा वाटतो

सांग कसे पाहू तुझ्या डोळ्यात सख्या

पाहता निरागस डोळ्यात तुझ्या अंगावर शहारा दाटतो… शुभ रात्री

 • त्या सांजवेळी सखा भेटला

लेऊन फुल सोनेरी…

मी त्याच्याच विचाराच मग्न होते… 

कशी पोहोचू नदी किनारी… शुभ रात्री

 • रात्रीची निरव शांतता तुझ्या आठवांचा सूर आळवते

मनात उठते वादळ अन् मग 

मन तुझ्या दिशेने सैरावैरा पळत सुटते.. शुभ रात्री

 • मन माझे मोरपिसी स्वप्न जणू

मन माझे शिशिरातील इंद्रधनू.. शुभ रात्री

 • आवाज दाहीदिशांना तुझ्या नावाचा घुमत राहतो

मी एकटी असताना तूच मनात दाटत राहतो

कसे सांगू सांग सख्या..माझ्या प्रेमाचे गुपीत तुला

तुझ्याच विचारांत गुंतले मन हे अन् त्यावर

तुच पहारा देत राहतो… शुभ रात्री

 • नवा सूर्य नव्या आशा 

नवी स्वप्ने नव्या दिशा….नवा उत्साह प्रेमाचा

आजची रात्री शांत झोपा..

आता वेळ झालाय प्रेमळ स्वप्नांचा… शुभ रात्री

 • आठवण तुझी येते तेव्हा मन अधीर होऊन जाते

कसे सांगू सांग सख्या

जगण्यातलं प्रत्येक सुख क्षणभंगुर होऊन जाते

शुभ रात्री

 • रंगले रंगात तुझ्या, आठवणींनी केले बावरे

तुझ्या विचारातच गुंतले आहे 

कसे सांगू तुला सख्या रे!. शुभ रात्री

 • झोपताना ज्याचा चेहरा पाहून झोपते

 त्याचीच स्वप्ने येतात म्हणे

खरंच असं असेल तर मला तुझा चेहरा पाहून रोज झोपायचंय!

सुंदर सुंदर स्वप्नांसाठी… शुभ रात्री

 • प्रत्येक दिवस सारखा नसतो 

पण आपण ठरवलं तर प्रत्येक दिवस आनंदाचा असूच शकतो

आजची रात्र संपू दे फक्त

आनंदाचा करू दिवस उद्याचा… शुभ रात्री

 • काळोख्या रात्री शांत वाटते 

मनात तुझी आठवण दाटते

तुही माझी आठवण काढत असतोस का रे…

कारण सतत मला तसेच वाटते… शुभ रात्री

 • तुला पाहण्यासाठी मन सतत तुझ्याकडे धावते

डोळ्यात तुझे रुप साठवावेसे वाटते

भेट होते तेव्हा शब्द संपून जातात

उगीच मनात मात्र हळवे सूर उमटतात… शुभ रात्री

 • रात्रीची वाट पाहते तुझे स्वप्न पाहण्यासाठी

स्वप्नात का होईना पण तुला मिठीत घेण्यासाठी.. शुभ रात्री

 • हो तुझ्याच विचारात मी गुंतले आहे

तुझ्याकडेच मन हे धावते आहे…

कसे सावरु मी सांग सख्या स्वतःला

झोप लागत नाही, तुझाच फोटो पाहते आहे… शुभ रात्री

 • आवाज तुझा कानात माझ्या घुमत राहतो

तुझ्या हळूवार बोलण्याने मन रमत राहते

किती तरी वेळा प्रयत्न करते सांगून टाकावे सगळे

पण मनात कायम एक भीती दाटते… शुभ रात्री

 • विश्वास तुझ्या प्रेमातला नेहमीच मला जाणिव करुन देतो

एका निखळ निरागस नात्याची सुरुवात करुन देतो… शुभ रात्री

आपल्याला जर या Romantic Good Night Messages Marathi  प्रेयसी, प्रियकराला पाठवायच्या शुभरात्री शुभेच्छांचा खजिना, नातेवाईकांना शुभरात्री शुभेच्छा आणि खास व्यक्तिंना पाठवाच्या शुभ रात्री शुभच्छांचा खजिना आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जरूर शेअर करा व आम्हाला फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्राम वर जरूर फॉलो करा.

Sharing is caring

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top