मोठी बातमी! 26/11 चा मास्टरमाइंड तहव्वूर राणा अखेर भारतात; एनआयएच्या ताब्यात चौकशीला सुरुवात

Sourabh Patil

Tahawwur Rana

नवी दिल्ली | 10 एप्रिल 2025 देशाच्या इतिहासातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक असलेल्या 26/11 मुंबई हल्ल्यातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंड तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याला अखेर भारतात प्रत्यार्पित करण्यात आलं आहे. विशेष विमानाद्वारे त्याला राजधानी दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर उतरवण्यात आलं असून, देशभरात या घटनेने खळबळ उडाली आहे.

Tahawwur Rana स्पेशल विमानातून दाखल; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

राणाला घेऊन आलेलं खासगी विशेष विमान गुरुवारी सकाळी भारतीय हवाई हद्दीत दाखल झालं आणि थेट दिल्लीतील पालम विमानतळावर लँड झालं. त्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळ परिसरात तगडा बंदोबस्त करण्यात आला होता. चार इनोव्हा, दोन सफारी गाड्या, जॅमर यंत्रणा, बॉम्ब शोध पथक आणि अनेक सुरक्षा यंत्रणा सज्ज होत्या. सुरक्षा दलांकडून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला होता.

एनआयएकडे ताबा; चौकशीला सुरुवात होणार

तहव्वूर राणाला आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) मुख्यालयात नेण्यात येणार असून त्याच्यावर अधिकृत चौकशीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. 26/11 Mumbai Attack च्या दहशतवादी हल्ल्यात त्याची भूमिका किती खोल आहे, त्याने कोणत्या प्रकारे सहाय्य केलं, याचा तपास लवकरच सुरु होईल.

पाकिस्तानात जन्मलेला, अमेरिकेतून प्रत्यार्पित

पाकिस्तानात जन्मलेला तहव्वूर राणा याच्यावर जगभरात गंभीर आरोप झाले आहेत. अमेरिकेतून त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने दीर्घकाळ प्रयत्न केले आणि अखेर हे प्रयत्न यशस्वी ठरले. अमेरिकेशी झालेल्या सामंजस्यामुळे आणि न्यायालयीन प्रक्रियेअंती त्याला भारतात आणण्यात यश आलं आहे.

26/11 प्रकरणातील नवे खुलासे शक्य

तहव्वूर राणा (Tahawwur Rana) सध्या एनआयएच्या (NIA) ताब्यात असून त्याच्याकडून चौकशीत अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 26/11 हल्ल्याशी संबंधित काही अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं आता मिळण्याची अपेक्षा आहे. राणाच्या प्रत्यार्पणामुळे भारत सरकारला आणि तपास यंत्रणेला मोठं यश मिळालं आहे.

Leave a Comment