बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi

या पोस्टमध्ये बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश,  Birthday wishes for wife in Marathi  यांचा समावेश करण्यात आला आहे. बायकांना नवऱ्याकडून काय हवं असतं? तर आदर, प्रेम, कौतुक इतकंच ना? या प्रत्येक भावनेने शब्दबद्ध केलेल्या या सर्वोत्तम birthday wishes marathipost.in च्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  तुम्ही तुमच्या  प्रिय बायकोला तिच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना या शुभेच्छासंदाशांचा वापर करा… आणि  मग बघा ती तुमच्या नव्याने प्रेमात पडेल.

तुमच्या आयुष्यभराची सोबतीण तुमची बायको.. तिचा वाढदिवस खास करण्यासाठी तुम्ही या शुभेच्छा संदेश वापरु शकता आणि त्यांचा खास दिवस अधिक खास करु शकता…

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश!

 1. मैत्रिण होतीस जोडीदार झालीस

आईची माझ्या सुन बनून आलीस

संसार माझा केलास सुखाचा

माझ्या मुलांची आई झालीस

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. घराला घरपण देणारी गृहलक्ष्मी आहेस तू

प्रत्येक नात्याला आपलेपण देणारी प्रेमळ सून आहेस तू

माझ्या मनात घर करणारी मनकवडी आहेस तू

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

 1. तू आयुष्यात आलीस आणि आयुष्य सुंदर झालं

तू सोबत होतीस म्हणून संसारात सुख आलं

अशीच नेहमी सोबत रहा, कायम प्रसन्न रहा

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. मी खूप भाग्यवान आहे,

तुझ्यासारखी मैत्रिण मला बायको म्हणून लाभली

प्रिय सखे तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 1. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कायम असंच खुलत रहाव

प्रिय बायको तुला हवं असलेलं सगळं नेहमीच तुला मिळत रहावं

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 1. मला लाभली साथ तुझी अन् सोनं झालं जीवनाचं

तुझ्या साथीने या सुरमयी झालं गाणं संसाराचं

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
मला लाभली साथ तुझी अन् सोनं झालं जीवनाचं तुझ्या साथीने या सुरमयी झालं गाणं संसाराचं प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. मैत्रिण जेव्हा बायको होते तेव्हा

सगळंच कसं सोपं होतं… मनातलं न सांगताच

तुला समजून जातं

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. मी समुद्र तू नदी आहेस

शांत समरस आणि निवांत आहेस

आजचा दिवस तुझ्यासाठी जीतका खास आहे

तितकाच तो माझ्यासाठीही खास आहे

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. माझी सखी तू प्रिये

तूच माझा प्राण आहेस

तुझ्याविना हे जगणं, कल्पनाच सारी अशक्य आहे

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. माझ्या जगण्याला नवा अर्थ देणाऱ्या

माझ्या बायकोस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 1. कुटुंबातील प्रत्येकाला जपतेस

घरातलंही तूच करतेस

तरीही तुझी वेगळी ओळख निर्माण केलीयस

तुझ्या कष्टाच्या जोरावर

अशा हरहुन्नरी बायकोस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटास आधी तू झेलण्याचं सामर्थ्य ठेवतेस

कधी कधी मलाच कळत नाही, इतकं प्रेम कुठून आणतेस

शांत स्वभाव पण तीतकीच उत्साही….

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. वेळ कशीही असो… चांगली किंवा वाईट

सोबत तुझी कायम होती

म्हणूनच मला कधीच कोणाची गरजच नव्हीत

प्रिय बायको तुला वाढदिवासाच्या खूप खूप शुभेच्छा!

 1. जगण्यात आनंत आहे कारण आयुष्यात तू आहेस

माझ्या हसण्याला अर्थ आहेस कारण त्याचे कारण तूच आहेस

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 1. मी रणरणत्या उन्हातली दुपार आहे सखे…

तू सुंदर मनमोहक पहाट

माझे भाग्य उजळवलेस, येऊन माझ्या घरात..

प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय पाणसखे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 1. तुझ्या डोळ्यातले प्रेम मला भावनाविभोर करते

तुझा प्रेमळ स्वभाव माझ्या मनात भरतो

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या अनन्य शुभेच्छा!

 1. तू असतेस सोबत तेव्हा कसलीच चिंता भासत नाही,

तूझ्या दूर जाण्याने मात्र मनात आनंद उरत नाही

नेहमी सोबत राहशील ना, चुकल्यास माफ करशील ना?

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 1. माझ्या चुका समजून घेतेस

इतकं निर्मळ कसं प्रेम करतेस…

माझ्यासारख्याचा संसार तू निटनेटका करतेस

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. आरोह अवरोह संगितात असतात

ताल अन् ठेका नृत्यात असतात

तू सोबस असलीस की प्रत्येक क्षण अविस्मरणीय होतात

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. अलगद वाऱ्याची झुळूक होऊन,

आयुष्य माझं व्यापून टाकलंस….

सांजवेळीचे क्षण निर्मळ वाटती… तूच तर माझं जगणं निर्मळ केलंस

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. आयुष्य सुखकर होताना तू सोबत होतीस

म्हणून तर कसली मला चिंता नव्हती

घर संसार मुलांना तूच सांभाळलंस

तुझ्या सहवाने तू मला सावरलस

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. कप बशीचा संसार प्रत्येक दिवसाचा

हंडा कळशीचा संसार प्रत्येक दिवसाचा

तसंच काहीसं तूझं आणि माझं

संसार सुखाचा अनेक जन्मांचा

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुझा सहवास आहे

तुझं असणंच मुळात  खास आहे

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. आभाळ भरून येताना भावनाही मनात दाटतात

तू दूर असताना चिंता मनात घर करतात

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. तुझे टपोरे डोळ मनात ठाण मांडतात

तुझ्यासोबतचे क्षण हवेहवेसे वाटतात

तू आहेस म्हणून मझ्या असण्याला अर्थ आहे

तू नसताना मात्र सारेच व्यर्थ आहे

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. पावसाळ्यातली रिमझिमती पहाट तू आहेस

माझ्या मनावर हळूवार रेंगाळणारं मोरपीस तू आहेस

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. हळुच येणारी वाऱ्याची झुळूक तुझ्याच सारखी भासते

जू जवळ येतेस तेव्हा मात्र मला नवीच तू भासते

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. चिमण्यांच्या आवाजात पहाट उजाडते

तुझ्या आवाजाने माझी सकाळ होते

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. हळूवार स्पर्झाची जाणीव झालीस तू

माझ्या भावनांवरील फुंकर झालीस तू

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. रात्रीच्या चांदण्या लुकलुकतात तेव्हा

तुझ्या चेहऱ्यावरची लालीमा आठवते

किती प्रेम आहे तुझं माझ्यावर

याची मला जाणिव करुन देते

प्रिय प्राणसखे तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बायकोला वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा!

 1. जेव्हापासून तू आलीस माझ्या आयुष्यात

प्रत्येक दिवस सुंदरच आहे

नाही म्हणून चालणार नाही… उद्याचं जेवण मला हवं आहे..

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. तूच माझं आयुष्य, तूच माझं जगणं आहेस

सकाळ संध्याकाळ आरती तुझी गाईन मी

कधीच रागावू नकोस इतकंच माझं मागणं आहे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. तू रागावतेस तेव्हा जगबुडी आल्यासारखं वाटतं

कारण सकाळ संध्याकाळ पाणी, लादी, कपडे, भांडी

सगळं मलाच करायचं असतं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. तू सोबत असताना प्रत्येकजण नमून घरासमोरुन जाईल

वाघिण सोबत असताना नडायची कोणाची हिंमत होईल

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. आकाशात जसे चंद्र सूर्य तारे

तू चिडलीस की घरात वाहतात स्तुनामी वारे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. गुण जुळले २४ आणि झालं आपलं लग्न

२४ चे ३६ करण्यात आपण झालो मग्न

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. लग्नाचं वाचन सात जन्मांचं

प्रेमळ नातं तुझंनी माझं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. आकाशात दिसतो सप्तरंगी इंद्रधनुष्य

प्रत्येक रंगाची गोड सरमिसळ

मी तुझा पाव आणि तू माझी मिसळ

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. पाखरांचा थवा एकत्र राहतो

तितकेच आपण सोबत राहू

याच नाही प्रत्येक जन्मात….

एकमेकांशी संसार करत राहू

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 1. विमान उडतं आकाशात घेऊन उंच भरारी

नखले माझी बायको तिची अदा न्यारी

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हे हि वाचा: वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ | Birthday Wishes for brother in marathi

बायकोला वाढदिवसानिमित्त Romantic शुभेच्छा!

 1. फुलांतील सुंगाध जसा वेगळा करता येत नाही

तुलाही माझ्यापासून कोणी वेगळे करु शकणार नाही

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. नातं तुझं माझं….प्रेमळ शब्दांनी गुंतवायचं

अलगद भावनेनं गुंफून जात स्वतःच स्वतः सोडवायचं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तुझी साथ असावी प्रत्येक जन्मात सखे

तु नसलीस तर कसे जगू जीवन सखे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. गृहलक्ष्मी घरची तूच आहेस बायको

कुटुंबातली प्रिय व्यक्ती तूच आहेस बायको

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. रोज नव्याने तू पुन्हा पुन्हा खुलत रहा

स्वप्नांना गवसणी देण्या स्वच्छंदी बनून उडत रहा

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. सागर किनारे क्षितीजाची नजर भेट

प्रत्येक ऋतूतील सुंदर अशी नक्षी थेट

तूच आहे माझं आय़ुष्य, माझ्या जगण्याची दिशा

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. मनातलं सारं तुला कळतं

शब्दांतले मौन तुला कळतं

जाणतेस तू मला पुरेपुर

सांग सखे तुला माझं प्रेम कसं कळतं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. सोनफुलांचा सडा अंगणात पसरला

तुझ्या निरागस हास्याचा सडा माज्या मनात पसरला

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तू सोबत असताना प्रत्येक क्षण विलक्षण सुंदर असतो

जसं तुझं हसणं आहे तितकाच तो क्षण निरागस असतो

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. जगाच्या अंतापर्यंत साथ तुझा देईन

संकट कोणतंही असो तुझा हात हाती घेईन

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. आईची कर्तव्यदक्ष सून झालीस

बाबांची लाडकी लेक झालीस

ताईची प्रिय नणंद झालीस

कसं सांगू तुला सखे…. माझं संपुर्ण आयुष्य झालीस..

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. सूर्योदयाची लालीमा आहेस तू

श्रावणातली दवबिंदूतली सफर आहेस तू

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. डोंगमाथ्यावर चढतो सूर्य, भासते क्षितीज सोनेरी

तुझ्या कपाळी कुंकू माझ्या नावाचं, गालात खुलते चाफेकळी

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. आवाज तुझा मधुर… हास्य तुझे गोड

संस्कारांनी सजलीस सखे…

चुकलं असलं काही माझं तर रुसवा लगेच सोड

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. स्वप्नांना गवसणी घालून साथ देऊ एकमेकांना

संसार करू सुखाचा साथ देऊ एकमेकांना

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणं जमत नाही

कसं सांगू सखे तुझ्या शिवाय कुठेच मन रमत नाही

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. माझ्या आयुष्यात आलीस आणि आयुष्य सुंदर केलं

तूझ्यासारखी सहचारिणी भेटली आणि जगणं सुंदर झालं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. अर्धांगिनी तू माझी व्यापलंस पुर्ण आयुष्य

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. प्राणप्रिये तू माझी कसं सांगू तुला?

किती खास आहेस तू माझ्यासाठी…

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. प्रत्येक जन्मात तूझीच साथ लाभाली

तुच माझी बायको व्हावी.. .ही एकच सदिच्छा

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. आपलं नातं जगावेगळं… कारण तू आहेस मैत्रिण माझी

प्रत्येक परिस्थिती साथ देतेस बनून सहचारिणी माझी

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. माझ्या आयुष्यात आलीस आणि जगणं सुंदर केलंस

कसं सांगू प्राणसखे तू आयुष्यच बदलून टाकलंस

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. सोबत होती तूझी म्हणून संसाराचा हा गाढा ओढता आला

तुझ्यासारख्या कुशल गृहलक्ष्मीचा सहवास मला लाभला

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. संसार सुखाचा दोन जीवांचा

तू मला नेहमी समजून घेतलंस

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. सोबत होती तुझी म्हणून कुटुंबात प्रत्येकाचं मन राखता आलं

माझी बायको सर्वगुणसंपन्न आहे असं मला सांगता आलं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. आजचा दिवस खास आहे, वर्षाव सुखाचा व्हावा तुझ्यावर

संसार केलास माझा सुखाचा… पुर्ण हक्क आहे तुझा सुखावर

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. कधी दिलिस प्रेमळ हाक सखे

कधी प्रेमाचा ओरडा

तरीही माझं तुझ्यावरच प्रेम आहे कारण

तू माझी म्हैस मी तुझा रेडा…

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. साथ तुझी होती म्हणून संसार सोपा झाला

तुझ्या असण्याने तर जगण्याचा आनंद खरा झाला

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. माझ्या सहित माझ्या कुटुंबियांची आपुलकीने काळजी घेणाऱ्या

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. हसणं तुझे प्रेमळ रागावणं तुझे प्रेमळ

इतकी समजूतदार बायको मिळाली मला

लोकांची होतेय हळहळ

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. स्वभावाने गुणी, हिशोबात काटकसंर

अन्नपुर्णा माझी बायको

जेवण बनवते रुचकर…

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. कोणी इतकं समजूतदार कसं असू शकतं

कित्येकदा मला प्रश्नच पडतो

तुझ्याकडे पाहिल्यावर मात्र

सगळ्याच प्रश्नांचं उत्तर सापडतं

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. स्वभाव लाजरा, सोज्वळ अंदाज

कितीवेळा संगू तुला वागत जा बिंधास्त

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. स्वकर्तृत्वाने उंच भरारी घे

मी आहे सोबत तुझ्या

मला विश्वास आहे तुझ्यावर

अपेक्षा पुर्ण करशील तू सर्वांच्या

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. माहेरी सर्वांची लाडकी होतीस

सासरी येताच सर्वांची मने जिंकलीस

समजूतदार स्वभावाची मला बायको भेटली

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. कुटुंबातील लहानग्यांशी प्रेमाने वागते

थोरा मोठ्यांना आदर देते

इतकी सद्गुणी बायको, माझ्या घरात नांदते

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. आस्था तुझी नात्यांवर

श्रद्धा मात्र देवावर

रोज नित्यनियमाने पाणी घालते, तुळशीच्या रोपावर

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. घराचं गोकूळ केलंस घरात पाऊल टाकताच

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. प्रिय सखे आज तुझा खास दिवस

तुझ्या आनंदी असण्याचा दिवस

तुला काय हवं ते माग…

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. माझ्या वास्तूला जिवंत करुन

त्यांचे घरात रुपांतर करणाऱ्या माझ्या

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तुझी माझी साथ जन्मोजन्मीची

नवरा बायकोच्या नात्याची

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. गर्दितही उठून दिसणारं Couple आपलं

प्रत्येक जन्मी असंच रहावं हिच सदिच्छा

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. परिस्थिती कशीही असू दे

सोबत खंबीर उभी राहिलीस,

कसे आभार मानू तुझे

तूच माझी अर्धांगिणी शोभलीस

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. अक्षदा पडल्या डोक्यावर

साथ लाभली जन्मोजन्मीची

तुझ्या रुपाने लाभली मला

सुंदर सोबतील आयुष्यभराची

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. फुलपाखरांचे रंग टिपावे

तुझ्या हसण्यात रंग भरावे

तुझे प्रत्येक स्वप्न सखे, मागायच्या आधिच पूर्ण व्हावे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. दिसव संपतात तसे ऋतूही बदलतो

तुझ्या रुपाने रंग उधळत श्रावण येतो

माझ्या आयुष्यात इंद्रधनूप्रमाणे

रंग प्रेमाचे भरू पाहतो

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तू माहेरी जातेस तेव्हा कळतं मी किती एकटा आहे

तुझ्याविणा घरात प्रत्येक क्षण माला मात्र पोरका आहे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. बायको तुझ्याविणा माझे जीवन आहे उदास

तुझ्या बोलण्याने होतो माझा प्रत्येक दिवस खा

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. देवाचे लाख लाख धन्यवाद की, त्याने तुझी माझ्याशी गाठ बांधली

तुझ्या प्रेमळ स्वभावाने तू सर्वांची मनो जींकली

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तू माहेरी गेलीस की तुझ्याविणा मन रमत नाही

नजरे समोर असतेस तेव्हा मात्र,

तुझ्यावरचं प्रेम सांगायला जमत नाही..

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तू माझ्या आयुष्याचा भाग आहेस

हेच माझे भाग्य आहे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

तू हसतेस तेव्हा जीव आनंदी होतो

तू रुसतेस तेव्हा मन कासावीस होते

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. सावलीसारखी सोबत रहा

इतकीच तुला विनंती आहे

तू घरात असतेस म्हणून माझ्या आयुष्यात शांती आहे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. दिवस आजचा खास आहे

तुझ्या जन्मदिनी माझा उपवास आहे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. साथ तुझी लाभावी प्रत्येक जन्मात सखे

तू माझीच व्हावी प्रत्येक जन्मात सखे

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. तुझ्या प्रेमळ स्वभावाने तू

कुटुंबातल्या प्रत्येकालाच आपलंसं करुन घेतलंस

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. जीवनात प्रत्येक क्षणी असो तुझा हात हातात

अगदी संकटाच्या वाईट परिस्थितही असेल माझी तुला साथ

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. बायको म्हणजे सोबत आयुष्याची

प्रवास सोबत करणारी व्यक्ती भरवश्याची

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

 1. माझ्या ओठावरचं गीत तू

माझ्या हृदयांतली प्रीत तू

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

१००. फुलांच्या पाकळीतला सुगंध आहेस तू

पानांवरील मनमोहक दवबिंदू आहेस तू

प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!

आम्ही अशा करतो की आमच्या marathipost.in या संकेतस्थळावरील  Happy birthday wife in marathi / birthday wishes for wife in marathi/ बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश आवडल्या असतील. आणि तुम्ही आपल्या पत्नीसाठी / बायकोसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणून उत्तम मराठी शुभेच्छा संदेश शोधले असतील. या शुभेच्छांचा वापर करुन तुम्ही तुमचे पतीपत्नीचे नाते अधिक मजबूत करा.. एकमेकांना शुभेच्छासंदेश द्या! वैवैहिक जीवनाचा आनंद घ्या.