भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी | Birthday Wishes for Brother in Marathi

आपल्या आजोबा पणजोबांच्या काळात मोठ्या भावाला, अप्पा, अण्णा, भाऊ असं म्हटलं जायचं. कारण मोठा भाऊ हा वडिलांसारखाच समजला जायचा… भाऊ मोठा असो वा लहान त्याची जबाबदारी ठरलेली असते… कुटुंबात त्याचं एक स्थान ठरलेलं असतं. जबाबदारीचं! म्हणूनच आम्ही Marathipost.in च्या मदतीने घेऊन आलो आहोत तुमच्या साठी

मोठ्या भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा! Birthday wishes for brother in marathi, लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy birthday little brother तसेच जुळ्या भावांना वाढदिवसीय शुभेच्छा आणि भावाभावांनी एकमेकांना द्यायच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! बहिणीने भावाला द्यायच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! दादाला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा! Happiest 50th birthday dear brother.

 

चला तर मग तुमच्या प्रिय भाऊरायाला त्याच्या खास दिनी शुभेच्छांची बरसात होऊद्या!

 

मोठ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ banner

 

प्रिय अबक, तुला कधीच आम्ही ‘दादा’ म्हटले नाही. तू नेहमी आमचा अबक होतास. कारण रक्ताचं नातं असूनही त्यात मैत्रीचं नातं जास्त वरचढ होतं. तुझ्या हलक्या फुलक्या स्वभावात आम्ही सगळी भावंड सामावून गेलो आहोत. अशा या आमच्या मोठ्या दादास दिर्घ आयुष्य लाभो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

 

मोठा भाऊ म्हणून कधी मिरवलास नाही. नावाने हाक मारली तरी कधी ओरडला नाहीस. तुझ्यासारखा समजुतदारपणा माझ्यात कधी आला नाही. प्रिय दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

अनुभवी आणि निरपेक्ष अस तुझ वागणं आमच्यासाठी मार्गदर्श ठरत. तुझ्या अनमोल सल्ल्यानेच आमचं गाडं पुढे ढकलतं. असाच आनंदी रहा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

दादा, तुला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!. दीर्घायुषी, शतायुषी हो. तुला तुझ्या आयुष्यात भरभरून सुख मिळू दे, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

 

तुझ्या मेहनतीच्या जोरावर आज तू या पदावर उभा आहेस. याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. तुझ्या यशाची शिडी अशीच उंचावत राहो. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्यासोबत माझ्या संकटांशी दोनहात करणाऱ्या, माझ्यावर अतोनात प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

तुझ्या संस्कारात आम्ही वाढलो, शिकलो, सवरलो. तुझ्या मायेचा ओलावा आजही तसाच आहे. आम्हाला जगण्याचं बळ कायम तुझ्याकडून असच मिळत राहो. आमच्या मोठ्या भावा तुला दीर्घायुष्य लाभो. वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

तुझ्यासोबत घालवलेले क्षण मी विसरु शकत नाही, तुझ्यासोबतची प्रत्येक भांडणं आजही माझ्या ओठांवर हसू उमटवतात, अशा या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

प्रत्यक्ष कृती करण्यावर विश्वास ठेवायला शिकवल, आळसाच्या दुनियेतून बाहेर आणलस, अशा या माझ्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

तुझ्यासोबतचे क्षण मला गोड कुपीत बंद करायचे आहेत. हवे तेव्हा आठवणीत रमायचे आहे. त्यासाठी तुझ्या प्रेमाच्या वर्षावाची अशीच बरसात होवो, तुला दीर्घायुषी निरोगी आयुष्य लाभो, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!



Also Read: मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Birthday wishes for friend in marathi

लहान भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा बॅनर

तुझ्यासाठी फटाक्यांची आतीषबाजी करण्यात मला आनंद मिळाला, तुझ्यासाठी घोडा-घोडा खेळण्यात मला आनंद मिळाला, लाडोबा, असाच हसत-खेळत रहा. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

दूर तू कधी गेला नाहीस की वाट पहावी लागेल, आपल्यातल लहान-मोठेपणाचं अंतर तू सांभाळत आलास माझ्या लाडक्या लहान पिल्ला, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

 

माझ्या जीवनातील आनंदाचा दिवस म्हणजे तुझा वाढदिवस. तुझा आनंद असाच उत्तरोत्तर वाढत जावो हीच सदिच्छा. लाडोबा तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

लहान असलास तरी कर्तव्य कधी विसरत नाहीस, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचं धाडस मला स्वस्थ बसू देत नाही. तूच आहेस माझा सखा, भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

इंद्रधनुतल्या रंगाप्रमाणे तुझं आयुष्य आनंदानं उजळून निघावं, सूर्याच्या किरणांचा तुझ्या आयुष्यात वर्षाव होवो, भाऊ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझं दुडूदुडू पळण, बोबडे बोल अजूनही मला आठवतात, तू म्हणजे आमचं हास्य आहेस, कधी मोठा झालास कळलच नाही, असाच तंदुरुस्त, मस्त रहा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

वयान लहान असलास तरी मोठ्यांसारख तुझ वागण आहे. एखादी गोष्ट तू पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीस. अशा या आमच्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

सूर्यकिरणांनी तुझे आयुष्य सोनेरी व्हावे काजव्यांच्या प्रकाशाने उजळून निघावे तुझ्या या जन्मदिनी तूला हवं ते सगळे मिळावे लहान भावाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!

 

कामानिमित्त दूर असलो तरी मनाने एकत्र आहोत, तुझ्यातला गोडवा अजूनही तसाच कायम आहे, तुझ्या आठवणींशिवाय एकही दिवस जात नाही, लहान भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

कितीही मोठा झालास तरी माझ्यासाठी तू लहानच आहेस. माझा लाडोबा-ससोबा आहेस, प्रिय पिल्लू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

Also Read: बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi

लाडक्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ banner

केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे’ याची प्रचिती आम्हा लहानग्यांना सतत देणारा तू, आज स्वबळावर भक्कम उभा ठाकला आहेस,

 

तुझ्या यशाच्या किर्तीचे गीत असेच आम्ही गात राहू, लाडक्या दादा तुला वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा!

 

तुझ्याशिवाय माझ्या जीवनात आनंद नाही, तूझ असणं माझ्यासाठी खास आहे, लाडक्या भावा, तुला वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा!.

 

प्रत्येक पावलावर तुला उदंड यश मिळो, यशाची शिडी अशीच पार करत रहा, सर्वांना हसत ठेवण्याचं बळ तुला मिळो, लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!.

 

आमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण तू घेऊन आलास, हास्याचे फवारे तुझ्या वलयात निर्माण होतात, प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आमच्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण तू घेऊन आलास, हास्याचे फवारे तुझ्या वलयात निर्माण होतात, प्रिय भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझ्यामुळे माझे जीवन आनंदी झाले आहे. तुझ्या असण्यानं माझ्या आयुष्याला आधार आहे. असाच आनंदी रहा, तुझ्या आयुष्यात भरभराट होवो, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्या भरकटलेल्या दिशांना योग्य न्याय मिळवून दिलास, नव्या पहाटेची जाणिव करून दिलीस, प्रिय भावा असाच माझ्या पाठीशी रहा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

पित्याचे प्रेम मला नेहमी तुझ्यात दिसत आले. सुस्कांरांनी माझ्या आयुष्याशी दोर तू सांभाळलीस. असाच माझा पाठीराखा रहा, लाडक्या दादा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

तू शतायुषी, दीर्घायुषी व्हावास हीच माझी सदीच्छा, तुझ्या पुढील भावी वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा!.

 

तुझ्या आनंदाच्या क्षणांचे सोहळे साजरे व्हावेत, तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, लाडोबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

माझ्या ध्येयाची वाटचाल सुनिश्चित करणाऱ्या माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो. तुला जगातील सर्व आनंद मिळो, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

 

Also Read: निरोप समारंभ शुभेच्छा | Farewell Quotes in Marathi

बहिणीकडून भाऊरायाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तूच आहेस माझ्या जीवनाचा शिल्पकार आणि कर्ता-करवितामाझ्या लाडक्या भाऊराया तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तूच आहेस माझ्या जीवनाचा साथी, सखा, सोबती. भावापेक्षाही खूप काही दिल आहेस तू मला. माझ्या लाडक्या भाऊराया तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

 

पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तुझ्या आयुष्यात हास्य यावं, तुला भरभरुन प्रेम मिळावं. सर्वांच्या लाडक्या भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

चांगलं वाईट ओळखण्याची ताकद तू माझ्यात निर्माण केलीस, आयुष्याशी दोनहात करण्यास शिकवलस, असाच खंबीरपणे नेहमी पाठीशी रहा, लाडक्या भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

तुझ्या भक्कम आधाराशिवाय आज मी उभी राहू शकले नसते. माझी संकटं तू तुझी म्हणून झेललीस. मला नेहमी आनंद ठेवण्याचा तुझा प्रयत्न मला सुखावून जातो. लाडक्या दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

पानीपुरी, शेवपुरी आणि रगडा पुरी या साऱ्या पदार्थांवर माझ जेवढ प्रेम आहे तेवढचं त्याहून काकणभर तुझ्यावर आहे. लाडक्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

सुंगधीत फुलांचा सडा तुझ्या आयुष्यात उमलू दे, कस्तुरीच मृगजळ तुला लाभू दे, माझ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला अर्थ आहे. माझ्या कठीण काळात मला लाभलेली तुझी मोलाची साथ अमूल्य आहे, लाडक्या भाऊराया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

भाऊबीज आणि रक्षाबंधन या सणांपेक्षाही तू भाऊ म्हणून प्रिय आहेसच. तू दिलेली ओवाळणी मला मौल्यवान आहे. तुझा आशीर्वाद पाठीशी राहो, दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तू काहीतरी खास करतोस… आज माझी टर्न आहे…आज तुझ्या वाढदिवसाला तुझ्या आवडीची भेट मी तुला देत आहे. माझ्या लाडक्या भाऊराया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

 

तुझ्या किर्तीचे गोडवे आसमंतात पसरावे, यशाची शिखरं तू पादक्रांत करावीस, दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

लाखो जणांचे आशीर्वाद तुला लाभो. आजच्या दिवस तुला अविस्मरणीय ठरो. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

एक छान मित्र तू आहेसच, पण वडीलकी जास्त करतोस. असाच कायम हसतमुख रहा, दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

शिक्षकाच्या भूमिकेत राहून मार्गदर्शन उत्तम करतोस. माझ्या आयुष्याला योग्य वळण लावलेस. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

माझ्या यादीतील सर्वोकृष्ट भावाचे स्थान तू पटकावले आहेस. माझ्या हृदयात तू अव्वल स्थानी आहेस. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

तुझ्या मनीच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत ही आईच्या चरणी प्रार्थना. तू दीर्घायुषी व्हावेस हीच सदिच्छा. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

बालपणीच्या आठवणीत मी रममाण होऊन दंग होतो. तुझ्या आठवणींची गोड साखर मला नेहमीच खुणावत असते. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

तुझ्या मौल्यवान दिनचर्येत तू मला स्थान दिलंस, हेच माझ्यासाठी खूप आहे. माझ्या भल्याचा विचार करतोस यातच मला आनंद आहे. असाच प्रेम देत रहा, दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

कुटुंबातल्या सगळ्यांचा लाडका आहेस तू, तुझ्यावर प्रेम करणारी माणसं तुझेच कोडकौतुक करत तुझे गुणगान गातात. हे सारं मला विलोभनीय आहे. माझा आदर्श तू आहेस. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!


तुझ्या सहवासात मला कधीच भीती वाटली नाही. अंधारात प्रकाशाची वाट तू मला दाखवलीस. सदैव खूश रहा. दादा तुला वाढदिवसानिमित्त हार्दीक शुभेच्छा!

 

लाडक्या दादाला वाढदिवसाच्या मजेशीर शुभेच्छा!

 

दोस्तीतल्या दुनियेतला राजा आहेस तू, माझा सखा भाऊराया आहेस तू, तुझ्या सारखं काहीपण करण्याची जिद्द आहेस तू, भाऊराया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझ माझ नातं असच दिवसेंदिवस फुलावं, तुला भरपूर आनंद मिळावा, मित्रमैत्रीणींनी तुझे आयुष्य भरुन निघावे,तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझा वाढदिवस आणि माझा आनंदाचा दिवस. गोडाधोडाने भरलेल्या आनंदात आज तू न्हाऊन निघणार आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझा भाऊ म्हणून तू आहेस खास. आज वाढदिवस तुझा असला तरी आनंदात असतो मी. तुझ्यासाठी साजरा करण्यात गुंग असतो मी. प्रिय भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आज तू बाप झालास तरी आमच्यासाठी दादाच आहेस. तुझ्या मार्गदर्शनावर आमची वहीवाट आहे. भावा तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

लाडक्या भावाला वाढदिवसाच्या खोडकर शुभेच्छा!

 

माझ्यासोबत नेहमी भांडायच असतं,गप्पांमध्ये विरघळून जायच असतं,राग आला तरी किती गोड आहेस की तू हेच शेवटी बोलायचं असतं…, माझ्या लाडक्या भावास वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

दूर असलास तरी पॉकेटमनी देण्याचं विसरत नाहीस, तुझी चांगली शिकवण मला फार खर्चही करू देत नाही, लाडक्या भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

तुझ्या वाढदिवसाचा क्षण हा आमच्यासाठी खासच असतो कारण खाऊची रेलचेल असते. त्यावर ताव मारत तृप्तीचा ढेकर देत दादा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

तू घातलेले वाद अजूनही माझ्या लक्षात आहेस, मी फेडलेली उधारीचे बील तू अजूनही मला दिलेल नाहीस, तरीही तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्या सगळ्या चुका तू पोटात घालीत आलास, तरीही प्रेम कधी कमी केले नाहीस, माझा भाऊ कमी मित्र जास्त आहेस. पाठीशी सदैव असेच उभे रहा, दादा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

सशासारखा गोरापान तुझा रंग आणि घारे डोळे, माझ्यापेक्षा जरा जास्तच सुदंर दिसायला तू, म्हणूनच गुर्मीत राहतोस. तरीही ससुल्या माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

माझ्या आयुष्याला, सुतासारखं सरळ करणाऱ्या, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

दीर्घायुषी, शतायुषी हो, अथांग सागराचे प्रेम तुला लाभो. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा, भावा तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तू माझा लाडका भाऊ आहेस हे तुझं भाग्य आहे. तरीही मला त्रास देणं तू कमी करत नाहीस. भरभरुन प्रेम करतोस माझ्यावर म्हणूनच तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुला.


आज इतका मोठा झालास हे कळलच नाही, लहानपणीचे ते दिवस विसरता येत नाही. तुझं लुडबुड करणं अजूनही आठवतं, असाच लहान रहा, भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

जुळ्या भावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तू आणि मी- मी आणि तू या आपल्या जोडगोळीत सापशिडीचा डाव तूच जिंकत आलास, तू-तू मै-मै करत माझा रडीचा डाव उधळून टाकलास, तरीपण माझ्या झेरॉक्स कॉपीला, भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

गप्पांमध्ये रमण्यापेक्षा तू कृतीत जगायला शिकवलसं, माझ्यासारखाच तू आणि तुझ्यासारखी मी. जन्माचा दिवस एक असला तरी प्रिय दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

माझ्यातले गुण तू शोधतोस आणि उणिवांवर मात करायला शिकवतोस. माझ्या नंतर तुझा जन्म झाला तरी मोठ्या भावासारखाच वागतोस. जुळ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तू आंबट कैरी तर मी आंबट चिंच आहे. तुझे आणि माझे गुणधर्म सारखेच आहेत. तरीही दादुल्या तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

आपल्या दोघांच्या भांडणात नेहमी मीच जिंकतो, जन्मदिन सारखाच असला तरी मीच जास्त भाव खाऊन जातो, तरीही तुला शुभेच्छा! देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझं चालणं, बोलणं,वागणं माझ्यासारखं असल तरी मी तुझा मोठा भाऊ आहे हे विसरु नकोस, आपल्यातल नातं मैत्रीसारखं राहण्याकडे तू जास्त कल देतोस याचा मला आनंद आहे, दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

शाळेतल्या प्रत्येक परीक्षेत तू अव्वल होतास आणि मागे. पण खाण्याच्या स्पर्धेत मात्र तू मागे आणि मी अव्वल. तुझा चेहरा माझ्यासारखा आहे अस मी सगळ्यांना सांगतो, जुळ्या भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

भाऊ म्हणून आपण कधीच वागलो नाही. मैत्रीची बंधन कधी ओलांडली नाहीत. जीवाला जीव देणारा तू आज माझ्याएवढाच वयाने मोठा झालास. तरीही आपल्यातलं प्रेम कमी होणार नाही. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

कुलदेवीच्या कृपेने आपल्या दोघांचा जन्म झाला. तू मोठा आणि मी लहान. एकसारखे असलो तरी तू मला मायेसारखं जपतोस. तुझ्या छायेखाली ऊबेची चादर घालतोस. भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.


जन्मखुणा वेगवेगळ्या असल्या तरी चेहरे मात्र सारखे आहेत. तू माझ्यापेक्षा मोठा आहेस हे तू मला कधीच विसरू देत नाहीस, आज आपल्या दोघांचाही जन्मदिवस. असाच सदैव आनंदी रहा, भाऊ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

भावाकडून भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

बंधूराजे, वाढदिवसाच्या शुभेच्छा!. असाच हसत-खेळत रहा. पुढील आयुष्यात तुला चांगल्या संधी मिळोत आणि तुझी भरघोस प्रगती होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

 

माझ्यासारखा भाऊ सर्वांना असावा असच मला वाटतं कारण भावापेक्षाही तू वरचढ आहेस. प्रेमळ दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

राम-लक्ष्मणाच नातं आपलं, तू रामाप्रमाणे वागत आलास. आता मी लक्ष्मणाप्रमाणे वागेन याची ग्वाही देतो, दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्या एकलकोंड्या आयुष्यात साथ द्यायला तू आलास, आणि माझं आयुष्य भरभरून निघालं. तुझ्या येण्यानं आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. लाडोबा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

भावाने भावाला दिलेला शब्द कधीच मोडला नाही. मोठ्या भावाच कर्तव्य तू नेहमीच करत आलास. पितासमान भावा तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

भांडत राहण्यापेक्षा भांडण मिटवण्यात तुझा जास्त रस होता, खेळण्यापेक्षा पुस्तक वाचण्यात दंग होतास, म्हणूनच आज या उंचीवर आहेस. भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझ्याबद्दल काय बोलू, तू माझा सखा-सोबती आहेस. माझ्या सुख-दु:खातला वाटेकरी आहेस. तुला भरपूर आशीर्वाद आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

माझं आयुष्य सावरण्यात बंधू, तुझा खूप सिंहाचा वाटा आहे. आपुलकी, माया, प्रेम, माया या साऱ्या शब्दांमध्ये तू मला खेळवल आहेस. आज मी तुझ्यामुळेच उभा आहे. प्रिय बंधु, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!. शतायुषी व्हा.

 

तुझ्या अफाट प्रेमात मी न्हाऊन निघालो आहे. माझ्या हृदयात तुझेच चित्र आहे. तुझ्याशिवाय जगण्याचा विचार मी करू शकत नाही. दीर्घायुषी हो, भावा वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुझ्यासारखा हुशार, गुणवान भाऊ मला लाभला यासाठी मी देवाचे आभारच मानतो. माझ्या प्रत्येक गोष्टीत तुझी मोलाची साथ मला मिळते. मला अजून काय हव. तू सदैव खूश रहा. वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

भावाला २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तू दाखवलेल्या रस्त्यावर मी आत्तापर्यंत चालत आलेलो आहे असाच माझ्या पाठीशी राहा,दादा तुला २५ व्या वाढदिवसाच्या खूप  शुभेच्छा!

 

आयुष्याच्या अथांग सागरात तुझं न संपणारं प्रेम मी अनुभवलं, तुझी कधीच न आटणारी माया आजही तशीच आहे, तुझ्यामुळेच माझं अस्तित्व आहे, आज २५ वर्षांचा झालास, दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!. 

 

नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय ? गाण्याचे बोल माझ्या काळजात रुतून बसलेत, आणि यासाठीच मला तुझ्यावर रागावणं फार आवडतं. दादा तुला, २५ व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!.

 

हसणं जगणं रडणं सगळं तुझ्याकडून शिकण्यासारख आहे. तू दाखवलेल्या मार्गावर सहज सोपं जाणं शक्य आहे. असाच हसतमुख सदैव रहा, भाऊराया तुला २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझ असणं हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे. विचारांचा भक्कम पाया नसणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या आयुष्याची प्रगती तू घडवून आणलीस. २५ वर्षाचा झालास तरी मित्रासारखाच वाटतोस,दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

कॉलेजात जाणारा तू आज नोकरी करू लागलास, आणि आम्हां लहानग्यांच्या खिशाला आधार मिळाला, दादा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!.

 

खूप मोठी प्रगती आयुष्यात करत रहा, सदानकदा हसत रहा, तुझ्या आयुष्याला कुणाचीही नजर लागू नये, दादा, २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझा आदर्श तूच आहेस. तुझ्यासारखं निर्मिळ, नितळ राहणं मला पसंद आहे. माझ्यासाठी तू माझा सखाच आहेस, दादा तुला २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

माझ्यासाठी भाऊ, दादा, वडील, मित्र सारकाही तूच आहेस. हाच विश्वास असाच ठेव. दादा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

तुझी सर्व स्वप्ने साकार होवोत, अथांग प्रेम तुला मिळो. अशीच उत्तमोत्तम प्रगती करत रहा, भाऊ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

भावाला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

दूरदृष्टी आणि समजावण्याची कला हे तुला लाभलेला वरदान आहे ज्याचा सदुपयोग तू आमच्यासारख्या लबाड भावंडांवर करतोस, तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भाऊ, तुला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

माझ्या भूतकाळातल्या सगळ्या चुका तू पाठीशी घातल्यास, वर्तमान आणि भविष्याची सांगड घालण्याचे मार्गदर्शन तू आम्हाला करतोयस, तूच सर्वेसर्वा आहेस. अजून काय सांगू तुला ? दादा तुला ५० व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

 

सुखाचे क्षण विस्तारण्याचे संधी तू प्रत्येक वेळी मला देत आलास, दुःख बाजूला सारून पुढे जाण्याचा बळ तू देत आलास असाच पाठीशी कायम रहा. दादा, तुला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

नात्यातला विश्वास तू कायमच सांभाळत आलास, माणसं जोडत आलास. तुझ्या वलयात नेहमीच हास्याचा फवारा असतो.दादा तुला ५० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

उंच कड्यावरून पडणाऱ्या धबधब्याचे गणित समजावून सांगितलं, सुखदुःखाचं ताळमेळ समजावून सांगितलास, अजून काय हवं तुझ्याकडून, माझ्या पामराकडून तुला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

वर्दळीच्या रस्त्यावर नेहमीच तुझा हात हातात होता, उन्हा पावसाच्या खेळात तू पाठीशी भक्कम उभा होतास, दादा तुला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

मला सांगा सुखं म्हणजे नक्की काय असतं ? तुझ्यासारखा वडीलतुल्य भावाचं चांगंल मार्गदर्शन आणि छत्रछायेखाली वाढलेला मी, चांगलाच सुखावून गेलोय. दादोबा तुला ५० व्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा!.

 

पितृछाया हरवल्यावर पहाडासारखा उभा राहिलास, किती संकट आली तरी डगमगला नाहीस, पितृतुल्य दादा तुला ५० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

सदाफुलीच्या गुणधर्माप्रमाणे सदा बहरणारं तुझं आमच्यावरील प्रेम कधीच आटत नाही, वडीलांच्या जागेवर आम्ही तुला नेहमीच पाहतो, तुला दीर्घायुष्य लाभो, ५० व्या वाढदिवसाच्या भाऊ तुला शुभेच्छा!.


आबोली फुलाच्या गोडवा आणि रातराणीच्या सुगंधाप्रमाणे तुझा स्वभाव आम्हांला नेहमीच ईर्षीत करत आला आहे. असचं भरभरून आयुष्य जग. भाई तुला ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!

 

मित्रासारख्या सख्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

सख्खा भाऊ जरी असलास तरी मैत्री त्यात खूप आहे, मैत्रीच्या नात्याची गुंफण अतूट आहे…. मनाच्या इतक्या जवळ आहेस की आपल्या नात्यात विश्वास कायम आहे. माझ्या भाऊराया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

नात्यातला संबंध मैत्रीतुल्य ठेवलास इतका की, भांडणं जरी झाली तरीही नातं मात्र कायम राहील. मैत्री असो वा नातेसंबंध, मैत्रीतला तू मला नेहमीच आवडतोस, भाऊ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खूण, ही अंतरीची खूण मला तुझ्या मैत्रीत दिसते. भावापेक्षा मित्रत्व जपलस. सख्या, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!

 

तुझ्याशी साधलेला संवाद हा तुझ्या-माझ्यातच असतो. सगळे बंध हे विश्वासावरच बांधलेले आहेत म्हणूनच तू माझा मित्र आहेस. भावा, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

 

सख्या नात्यापेक्षा मैत्रीची कदर तू जास्त करतोस, गुपीतं जपतोस म्हणून तू मला नेहमीच आवडतोस, भावा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

चांगल्या काळात नेहमीच सोबत राहिलास तसा वाईट काळातही पाठीशी राहिलास, मनकवड्याप्रमाणे समजून घेतोस, मित्रासारखा वाटतोस. दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

मैत्रीचा गोडवा तू अनुभवायला शिकवल, आयुष्याशी मैत्री करायला शिकवलस, म्हणून मी ठामपणे उभा आहे, दादा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

आयुष्यातला खरे-खोटेपणा ओळखायला – अनुभवायला देणारा तू, कृतीयुक्त सल्ल्यांवर मार्गदर्शन करणारा तू, मित्रासारखा जपणारा तू भाऊ तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

तुझ्याशी मैत्री करण्यात खरा आनंद मिळवला मी. ही मैत्री अशीच राहो आणि तुला दीर्घायुष्य लाभो. दादा तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

मित्रासारखा वागतोस आणि मित्राप्रमाणेच सल्ले देतोस. मैत्रीच्या नात्याची सर भावाच्या नात्याला येत नाही. म्हणून, मित्रा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.

 

आम्हाला आशा आहे की, भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी , Happy Birthday Bhau, भाऊराया, या पोस्ट मधील दादाचा वाढदिवसाचे क्षण सुंदर करणारे हे मॅसेज तुम्हाला नक्कीच आवडले असतील.

 

Marathipost.in वरील दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy Birthday Dada, शुभेच्छा… या फक्त शुभेच्छा नाहीत तुमच्या भावना आहेत ज्या आम्ही शब्दबद्ध केल्या आहेत..

 

या पोस्टमध्ये दिलेले Birthday Wishes for Brother in Marathi, Funny Birthday Wishes For Brother in Marathi, Heart Touching Birthday Wishes for Brother in Marathi आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका .

Also Read:

Marriage Anniversary Wishes in Marathi | लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

धन्यवाद वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल  | Thank you for Birthday Wishes in Marathi

1st Birthday Wishes For Baby Boy In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळा