ATM Charges Hike
ATM Charges Hike देशातील एटीएम वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा बदल १ मे २०२५ पासून लागू होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर एटीएम इंटरचेंज शुल्कात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास ग्राहकांना अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
ATM Charges Hike काय असतील नवे दर?
१ मेपासून दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, रोख रकमेच्या व्यवहारासाठी शुल्क आता प्रति व्यवहार १९ रुपये आकारले जातील (पूर्वी १७ रुपये). बॅलन्स तपासणीसारख्या गैर-आर्थिक व्यवहारासाठी शुल्क:
यासाठी ९ रुपये आकारले जातील (पूर्वी ७ रुपये).
बँका आपल्या ग्राहकांना प्रत्येक महिन्यात इतर बँकांच्या एटीएमवर काही मोफत व्यवहारांची मुभा देतात. मात्र ही मर्यादा ओलांडल्यावर नव्या दरांनुसार शुल्क आकारलं जाईल.
ATM Charges Hike ग्राहकांवर काय परिणाम होणार?
या बदलांचा सर्वाधिक फटका अशा ग्राहकांना बसू शकतो जे वारंवार दुसऱ्या बँकांच्या एटीएमचा वापर करतात. विशेषतः अशा बँकांचे ग्राहक जिथे एटीएमचे स्वतःचे नेटवर्क मर्यादित आहे, त्यांना इतर बँकांच्या एटीएमचा वापर करावा लागतो, त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार अधिक वाढू शकतो.
शुल्क वाचवण्यासाठी काय करावे?
ग्राहकांनी शक्यतो आपल्या होम बँकेचे एटीएम वापरणे फायदेशीर ठरेल, कारण त्यावर व्यवहारांवर कमी किंवा शून्य शुल्क आकारले जाते. यासोबतच, UPI, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट्स यांसारख्या डिजिटल माध्यमांचा वापर वाढवणे हा ही एक स्मार्ट पर्याय ठरू शकतो. यामुळे व्यवहार अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित होतील, शिवाय एटीएम शुल्कही वाचेल.
१ मेपासून लागू होणारे हे बदल ग्राहकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजन करताना एटीएम व्यवहारांवरचा खर्च विचारात घेणे आता आवश्यक ठरेल. डिजिटल व्यवहारांची सवय लावून या वाढीव शुल्कापासून सुटका मिळवता येऊ शकते.