अभिषेक बच्चनसोबत सेल्फी शेअर करत ऐश्वर्या रायने घटस्फोटाच्या चर्चांवर फुल स्टॉप लावला; लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी दिला खास संदेश

Sourabh Patil

Aishwarya Rai

Aishwarya Rai gets divorce talk to a full stop

Aishwarya Rai बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्यात तणाव असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बॉलीवूड बातम्या जोर धरत होत्या. मात्र, 20 एप्रिल रोजी त्यांच्या 18व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ऐश्वर्याने एक गोड सेल्फी पोस्ट करत सर्व अफवा खोट्या ठरवल्या.

या फोटोमध्ये ऐश्वर्या, अभिषेक आणि त्यांची मुलगी आराध्या तिघेही पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये झळकत आहेत. अभिषेकने घातलेली लाल रंगाची स्टायलिश अ‍ॅक्सेसरी आणि ऐश्वर्याच्या लिपस्टिकचा रंग एकसारखाच असल्याचं चाहत्यांनी लक्षात घेतलं. तिघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Aishwarya Rai divorce चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव

या फोटोवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला. एकाने लिहिले, “खूप दिवसांनी तुम्हा तिघांना एकत्र पाहून खूप आनंद झाला.” तर दुसऱ्याने म्हटलं, “या पोस्टने घटस्फोटाच्या सगळ्या अफवांना उत्तर दिलं.” आणखी एका युझरने लिहिलं, “हे चित्र पाहून मी खूप आनंदी आहे.” Bollywood couple

मागील काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय काही कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित राहिल्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. पण त्यांनी नंतर काही सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकत्र हजेरी लावली होती, ज्यामध्ये पुण्यातील एका नातेवाइकाच्या लग्नात ‘कजरा रे’ गाण्यावर नाचतानाही त्यांना पाहिलं गेलं.

ऐश्वर्या-अभिषेक यांची कारकीर्द

ऐश्वर्या राय बच्चन शेवटची मणिरत्नमच्या ‘पोन्नियिन सेल्वन: पार्ट 2’ या तमिळ चित्रपटात नंदिनीच्या भूमिकेत दिसली होती. या भूमिकेसाठी तिला खूप प्रशंसा मिळाली. सध्या तिच्याकडे कोणताही नवीन प्रोजेक्ट नाही, असं समजतंय.

अभिषेक बच्चन नुकतेच ‘बी हॅपी’ या चित्रपटात नोरा फतेहीसोबत दिसले होते. लवकरच ते ‘हाऊसफुल 5’ मध्ये अक्षय कुमार, रितेश देशमुख, संजय दत्त, चित्रांगदा सिंग, नरगिस फखरी आणि जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहेत. शिवाय, शाहरुख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटात ते खलनायकाची भूमिका साकारणार आहेत.

Leave a Comment